आऊट लुक मे २५

 
सध्या वाचनासाठी खूपच मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध हे . जर तुमच्याकडे जागा कमी असेल तुम्ही प्रवास्यात असाल तर ईबुक या अत्याधुनिक साधनांच्या आधार तुम्ही आपली वाचनाची भूक भागवू शकता अर्थात पारंपरिक वाचनाच्या तुलनेत ईबुकमध्ये वाचनाचा आनंद काहीसा कमी प्रमाणात मिळत असला तरी अगदीच मिळत नाही असे नाही काही प्रमाणात मिळतो दुधाची तहान ताकावर भागावणे या प्रकारचा आनंद आपणास मिळतो .तर वाचक मित्र- मैत्रिणींनो असाच मर्यादित स्वरूपाचा का होईना मात्र प्रवासात असताना एक वाचनाचा उत्तम अनुभव मला काही दिवसापूर्वी घेता आला.  निमित्त होते माझ्या एका मित्राने मला पाठवलेला आऊट लुक या साप्ताहिकाचा हिंदी भाषेतील २५ मे च्या अंकाची पीडीएफ 

या साप्ताहिकाला  आपण दोन भागात विभाजन करु शकतो. साप्ताहिकाच्या एकुण ५२ पृष्ठांपैकी पहिल्या ३९ पानांचा पहिला भाग आणि उर्वरीत १३ पृष्ठांचा दुसरा भाग असे सरळसरळ विभाजन होईल. पहिल्या भागात राजकीय विषयांवरील लेखन आहे.तर दुसऱ्या भागात चित्रपटसृष्टीविषयक लेखन आहे. माझ्यामते या दोघांचा स्वतंत्र्यपणे विचार करणे संयुक्तिक होईल.

पहिल्या भागाचा विचार  पुढील मुद्द्यांचा आधारे केल्यास, योग्य होईल असे माझे मत आहे.

* साहित्यिक लेखनशैली 
 
* माहिती मांडण्याची लेखनशैली 


* माहितीतील काठीण्य पातळी 

* मांडण्यात आलेल्या विचारांचा कल 

साहित्यिक लेखनशैलीचा विचार करता, पहिल्या भागात छापण्यात आलेल्या वाचकांचा पत्रव्यवहातील भाषेतील शाब्दिक वैविधता खुप उत्तुंग  पातळी गाठणारी आहे‌. तर लेखातील शाब्दिक वैविधता खुपच सामान्य दर्जाची आहे. हिंदी भाषेतील शब्द संग्रह वाढवायचा असल्यास पत्रव्यवहार वाचणे फायद्याचे ठरू शकते.
माहिती मांडण्याची शैलीचा विचार करता पहिल्या भागात छापण्यात आलेल्या लेखांपैकी, 'पश्चिम बंगाल विषयक लेखांचा अपवाद वगळता अन्य सर्व लेख हे वृत्तलेख स्वरूपातील आहेत.जिथं फक्त माहिती देण्यात आलेली आहे.  लेखातील माहितीचे  पृथ्थकरण, विश्लेषण करुन कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. तथापी पश्चिम बंगालविषयक लेख मोठ्या प्रमाणात निष्कर्षापत पोहोचणारे आहेत.
माहितीतील काठीण्य पातळी या संदर्भात पहिल्या भागातील लेखांचा विचार करता पश्चिम बंगालचा अपवाद वगळता अन्य सर्व लेखात सांख्यिकी माहितीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. या लेखात कुठेही आकडेवारी देण्यात आलेली नाही. पश्चिम बंगाल विषयक लेखात मात्र खुपच मोठ्या प्रमाणात सांख्यिकी आकडेवारी मांडण्यात आलेली आहे.मात्र या सांख्यिकी आकडेवारीचा स्त्रोत लेखात नमुद करण्यात आलेला नाही.मांडण्यात आलेल्या विचारांचा कल हा पुर्णपणे भाजपाला समर्थन देणारा आहे. भाजपाच्या विरोधी पक्षावर अनाठायी टिका केल्याचे लेख वाचताना जाणवणते.
भाग दोन विषयी सांगायचे झाल्यास यामध्ये कृष्णधवल काळातील तसेच पिस्टमन कलर काळातील  चित्रपटांविषयी सांगण्यात आले आहे.लेखनशैली काहीसी कंटाळवाणी, संस्कृतच्या प्रभाव असलेल्या हिंदीशी साधर्म्य साधणारी आहे.माहितीची सखोलता या विषयी बोलायचे झाल्यास मध्यम श्रेणीत मोडेल इतक्या
काठीण्य पातळीची  आहे.या भागातील विषय व्यक्तीकेंद्रीत असल्याने पहिल्या भागात असणारे अन्य मुद्दे येथे गैर लागू ठरतात असे मला साप्ताहिक वाचून वाटले
ईबुकमुळे माझा प्रवास कंटाळवाणा न होता, उत्तम झाला आपण देखील आपणस मिळणारा वेळ नक्कीच वाचनात गुंतवावा असे माझे आपणास अनुभवातून सांगणे आहे कारण जग कितीही ए आय बाबत प्रगती करो वाचनाला पर्याय नाही वाचाल तर वाचाल हे त्रिकालाबाधित सत्य आहे 
 


टिप्पण्या