तू. जाता मागे उरेल काय !
आपल्या मराठी भाषेतील एक प्रतिभान कवी भा.रा तांबे त्यांची एक सुप्रसिद्ध कविता आहे. 'जन पळभर म्हणतील हाय हाय तू जाता राहील काय'. माणसाचा मृत्यूनंतर त्याचे अस्तित्व काय, असते? जगात तो नसल्याने कोणाचेही काही अडत नाही जग त्याच्या रहाटीला नित्यनियमाला कर्माला सुरूच ठेवते. तेव्हा माणसाने कोणत्याही गोष्टीचा विनाकारण गर्व करू नये. हे या कवितेत सांगण्यात आले आहे. आज 30 ऑगस्ट 2026 रोजी ही कविता मला एका वेगळ्या अर्थाने आठवते आहे. कारण आज 30 ऑगस्ट 2026 रोजी पेशवाईचा विचार करता अत्यंत कमी काळासाठी राजेपदावर बसलेल्या नारायणराव पेशवे यांचा त्यांचाच काकांनी रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबा दादांनी मारेकरी घालून शनिवार वाड्यातच हत्या केल्याच्या घटनेला 243 वर्षे पूर्ण होत आहेत. रघुनाथराव हे अत्यंत पराक्रमी होते. त्या वेळेच्या लोकांचा विचार करता रघुनाथराव हेच पेशवे पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार होते. रघुनाथरावांनी मराठेशाहीला अनेक लढाईत असामान्यरीत्या विजय मिळवून दिले, हे सर्व मान्य केले, तरी आज रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांच्या विचार केला असता ती हत्याच चटकन येते. त्यांनी के...