तू. जाता मागे उरेल काय !
आपल्या मराठी भाषेतील एक प्रतिभान कवी भा.रा तांबे त्यांची एक सुप्रसिद्ध कविता आहे. 'जन पळभर म्हणतील हाय हाय तू जाता राहील काय'. माणसाचा मृत्यूनंतर त्याचे अस्तित्व काय, असते? जगात तो नसल्याने कोणाचेही काही अडत नाही जग त्याच्या रहाटीला नित्यनियमाला कर्माला सुरूच ठेवते. तेव्हा माणसाने कोणत्याही गोष्टीचा विनाकारण गर्व करू नये. हे या कवितेत सांगण्यात आले आहे. आज 30 ऑगस्ट 2026 रोजी ही कविता मला एका वेगळ्या अर्थाने आठवते आहे. कारण आज 30 ऑगस्ट 2026 रोजी पेशवाईचा विचार करता अत्यंत कमी काळासाठी राजेपदावर बसलेल्या नारायणराव पेशवे यांचा त्यांचाच काकांनी रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबा दादांनी मारेकरी घालून शनिवार वाड्यातच हत्या केल्याच्या घटनेला 243 वर्षे पूर्ण होत आहेत.
रघुनाथराव हे अत्यंत पराक्रमी होते. त्या वेळेच्या लोकांचा विचार करता रघुनाथराव हेच पेशवे पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार होते. रघुनाथरावांनी मराठेशाहीला अनेक लढाईत असामान्यरीत्या विजय मिळवून दिले, हे सर्व
मान्य केले, तरी आज रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांच्या विचार केला असता ती हत्याच चटकन येते. त्यांनी केलेला पराक्रम हा काहीसा मागे पडतो.
भा.रा. तांबे यांच्या जनपळभर म्हणतील हाय हाय या कवितेच्या ध्रुवापदातील शेवटचा अर्धा भाग मला याबाबत काहीसा महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे 'तू जाता राहील काय?; पेशवाई बुडवण्याचे महापातक आज राघोबा दादांचा माथ्यावर मारले जाते. कारण ही हत्या झाल्यानंतर अवघ्या 35 वर्षात पेशवाई संपली. ब्रिटिशांचा मराठ्यांचा राजकारणात प्रवेश करण्यासाठी कारणीभूत ठरलेली तीन युद्धे ही रघुनाथराव पेशवे उपाख्य राघोबा दादा यांचीच करामत. स्वामी विवेकानंदांचा एक विचार सुप्रसिद्ध आहे तो म्हणजे लोकांचे नेते होण्याचा ऐवजी लोकांचे अनुयायी व्हा. लोकांचे नेते होण्याचा स्पर्धेत अनेक जहाजे बुडाली आहेत. वाढदिवस एकाच दिवशी असल्याने (१०ऑगस्ट ) माझे आवडते झालेले पेशवे नारायणराव पेशवे यांच्या हत्येमागचे महत्त्वाचे सुत्रधार रघुनाथराव उपाख्य राघोबादादा यांचा हा लाजीरवाणा पराक्रम बघता स्वामी विवेकानंद यांचा हा विचार खरा ठरतो.
इतिहासात फक्त वस्तूस्थितीला महत्त्व असते .असे झाले असते तर तसे झाले नसते, याला इतिहासात फारसे महत्त्व नसते. हे क्षणभर मान्य केले तरी, राघोबादादांना खरे लायक असुन देखील पेशवेपद मिळाले नसते फारफरक पडला नसता किमान त्यांचा कौतूक करण्याचा गुणवत्तेवर पुतण्याचा खुन करण्याचा डाग पडला नसता .या डाग पडण्यामुळे त्यांचे कर्तृत्व मागे पडले, समोर आला तो सत्तेला चिकटण्याचा त्यांचा स्वाभाव. म्हणून जाता जाता मला म्हणावेसे वाटते . आपण नेहमीच पुढील वाक्याचा विचार करायला हवा.कारण आपण गेल्यावर आपली बाजु खरी प्रामाणिक असली तरी जगासमोर त्याच पद्धतीने येइलच असे नाही किंबहुना आपली ऋणात्मक बाजूच पुढे येउ शकते जसी रघूनाथरावांची येते आहे,ते वाक्य म्हणजेजन पळभर म्हणतील हाय हाय तू जाता राहील काय'.




टिप्पण्या