पोस्ट्स

ख्रिस्तीबहुल राज्यातील हिंदुत्व

इमेज
              ११ डिसेंबर २०१८ रोजी भारतातील ५ राज्यातील विधानसभेच्या   निवडणुकीचे   निकाल   लागले  .  आणि   समस्त   वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत काँग्रेसची घोडदौड आणि भारतीय जनता पार्टी ची पीछेहाट यावर चर्चा सुरु झाल्या . मात्र या मध्ये किमान   मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सुटलेला मुद्द्यावर वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच                    या निवडणुकीत जवळपास १०० % लोकसंख्या   ख्रिस्ती धर्माच्या   असलेल्या मिझोराम मध्ये भारतीय जनता    पार्टी या हिंदुत्व या विचारसरणीवर असलेल्या पक्षाचा झालेला प्रवेश . काही जण म्हणतील मिझोराम मध्ये किती खासदार आहेत त्या राज्यातील घडामोडींचा देशाच्या राजकारणावर कितीसा तो परिणाम होणार ?      त्यांना मी सांगू   इच्छितो की , भलेही मिझोरामची राजकीय ताकद अत्यल्प असली तरी , त्यातील समाजजीवनातील हिंदूंचे ...

सुयोग्य व्यक्तीला मतदान, भष्ट्राचाराला मुक्ती

इमेज
माझ्या या आधीच्या दोन ब्लॉग पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यावर  फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये लोकप्रतिनिधींवर प्रचंड प्रमाणांत राग व्यक्त करण्यात आला होता . ते प्रचंड भष्ट्राचारी असल्याचा सर्वसाधारण सूर होता . या प्रतिक्रियांबाबबत विचार करताना " क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे " या वचनाला जागून काय करता येईल याबाबत विचार करताना मला सुचलेलले उपाय तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन         आजची निवडणूक प्रचंड प्रमाणात खर्चिक झाली आहे. मात्र सध्याच्या कायदान्वये मान्य असणारा  खर्च अत्यंत तुटपुंजा आहे ,  त्यामुळे लोकप्रतीनिधीद्वारे मान्य असणाऱ्या खर्चापेक्षा जो अतिरिक्त खर्च केला जातो त्यातून काळ्या पैशाची निर्मिती होते. हा काळा  पैसे निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अनुचित मार्गाचा अवलंब केला जातो , ज्यास आपण भष्ट्राचार असे म्हणतो . माझ्यामते हे दुष्ट चक्र भेदायचा असल्यास कायदान्वये मान्य  असणारा खर्च  सध्याचा तुलनेत वाढवण्यात यावा . उमेदवारांना जास्त पैसे का खर्च करावे  लागतात ,  याचा विचार केल्यास आपणास सहज लक्षात येते की निवडणु...

का हवा रॉबिनहूड

इमेज
माझ्या कालच्या नाशिक महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांच्या विषयी पोस्टवर फेसबुकवर झालेल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी ही पोस्ट आहे.कालच्या लेखाची  लिंक तुम्ही या लेखाच्या खाली बघू शकता . बहुतेक लोकांनी माझ्यावर मी राजकारणी लोकांची बाजू घेत असून प्रामाणिक पणाला तिलांजली देत असल्याचा आरोप केलाय . त्यांना मी सांगू इच्छितो की  मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही . त्यामुळे राजकारणी लोकांची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही . तर सपर्धापरीक्षेची  तयारी करणारा विद्यार्थी आहे. माझ्या फेसबुकवरील पोस्टचा सर्वसाधारण सुर मुंढेंच्या कडक शिस्तीला कंटाळून नगरसेवकांनी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केल्याने नाशिकचे भले करणारा अधिकारी नाशिक सोडून गेला त्यांना मी सांगू  इच्छितो की , ज्या प्रमाणे आत्मविश्वास (कॉन्फिडन्स ) आणि अति आत्मविश्वास९ओव्हर कॉन्फिडन्स ) यात फरक असतो त्याचा प्रमाणे कडकपणा आणि हेकेखोर पणा यात फरक असतो . मुंढेंचा कडकपणा हा अतिरेक होता आणि "अति सर्वत्र वर्जयत्ये "या संस्कृत सुभाषितांप्रमाणे तो त्याजच होता . माझ्या कालच्या लेखनावर दुसरा आक्षेप असा घेतला गेला...

मुंढे पर्वचा अस्त

इमेज
             ज्याचे कुणाशीच पटत नाही , अश्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातच दोष असतो . या अर्थाचे एक दासबोधात वचन आहे. हे सांगायचे कारण की नुकतेच माजी झालेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे . यांची झालेली बदली .                आपल्या भारतात लोकशाहीचे ४ स्तंभ आहेत . श्री तुकाराम मुंढे ज्या यंत्रणेचे भाग आहेत ती प्रशासन व्यवस्था ,त्यातीलच एक . मात्र त्यांचे त्यांनी जिथे इथे कार्य केले  त्या प्रत्येक  स्थानिक लोकप्रतिनिधींसी  व्यवस्थेशी त्यांचे खटके उडाले . जे माझ्या मते सर्वथा अयोग्य आहे. एका ठिकाणचे लोकप्रतिनिधी सडके असू शकतात . मात्र सर्वच लोकप्रतिनिधी चुकीचे हे सर्वथा ना पटणारेच आहे. भारताच्या ४ लोकशाही स्तभांपॆकी एका स्तंभाच्या हा पूर्णपणे अपमान ठरतो .                     भलेही तुकाराम मुंढे चांगले करण्यासाठी धडपड असतील मात्र कोणतेही कार्य करण्याची एक प्रक्रिया असते . जी नाशिक महानगरपालिकेत पाळली गेली नाही  द्योतक आहे ...

कुनाचा गणपती उत्सव भारी र बाबा पुण्याचा की मुंबईचा ?

इमेज
एकदा सहज मिञांबरोबर गप्पा मारत बसलो होतो बोलता बोलता गाडी गणपती उत्सवावर आली .काही काळ मुंबईत राहीलेल्या माझ्या मिञाने मुंबईतील गणपती उत्सव म्हणजे सर्वौत्तम गणपती असे सांगितल्यावर काही कालावधी साठी पुण्यात राहीलेल्या मिञांनी पुण्यातील गणपती उत्सव सर्वौतक्रूष्ट असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?माझ्या मते महाराष्ट्रातील महत्वाचे गणपती उत्सव म्हणून पुण्यातील आणी मुंबईचे गणपती उत्सव ओळखले जातात . त्यांची स्वतंञ्य असीे व ैशिष्टे आहेत . पण जर तूलना करायचीच झाली तर मी पुण्याला झुकते माप देइल . मी स्वत:ला पुण्यातील मिरवणूकीत सलग 23 तास स्वयंसेवक म्हणुन काम केले आहे( त्या वेळी आपले पोलीस बांधव कोणत्या परीस्थीतीत बंदोबस्त करतात हे जाणवले त्या वेळी मला पुण्यात येवून सव्वा वर्ष म्हणजे तसा बराच काळ झाला होता .आणी मी जिथे होतो तो लक्ष्मी रोड ही माझ्या त्या वेळच्या राहण्याचा ठिकाणाहून म्हणजेच टिळक रोड पासून जवळच होता त्यामुळे परीसराला परीचिञ होता मी दूरदर्शनवर जे काही मुंबईच्या गणपती विसर्जनाची द्रूष्ये बघीतली त्यावरुन बोलत आहे . नूसत्या गंगनचुंबी मुर्ती म्हणजे भव्य गणपती उत्सव असे मी त...

त्या दहा वर्षातील गुरुदत्त

इमेज
गेल्या काही दिवसांपासून मी हिंदीतील एक असामन्य निर्माते दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांचा जीवनावर आधारीत मुळचे इंग्रजी भाषेतील म ाञ मराठीत अनुवाद झालेले " त्या दहा वर्षातील गुरुदत्त " हे पुस्तक वाचत होतो . आताच ते वाचून संपले . मुळचे इंग्रजी पुस्तक सत्या सरन यांनी लिहलेले आहे . तर मिलींद चंपानेरकर यांनी त्याचा अनुवाद केला आहे . पुस्तकात गुरुदत्त याच्या बरोबर काम केलेल्या अबरार अल्वी त्यांचा आठवणी लेखीकेबरोबर शेअर ( सामाईक ) केल्या आहेत . अर्थात हे पुस्तक एकाने सांगीतले दुसर्याने लिहून घेतले अश्या प्रकारचे नाही . अबरार अल्वी यांनी सांगितलेल्या कथनावर लेखिकेने ( अनुवादक जरी पुरुष असला तरी मुळ लिखाण करणारी स्ञी आहे त्यामुळे लेखीका ) भाष्य केले आहे . आणी कथन आणी भाष्य हे लिखाण वेगवेगळ्या फॉन्ट ( टंक ) मध्ये केल्याने ( निदान अनुवादित पुस्तकात तरी मुळ पुस्तकाबाबत माहीती नाही ) सहज समजते , भाष्य कोणते अणी कथन कोणते ते . पुस्तक प्रकरणांंमध्ये विभागले आहे . प्रत्...