पोस्ट्स

बांगलादेशात जाण्यासाठी तिसरा रेल्वेमार्ग सुरु !

इमेज
       सरकार भारताच्या शेजारील देशांशी भारताच्या संपर्क वाढवण्यावर विशेष भर देत आहे त्याअंतर्गत नेपाळ आणि बांगलादेश या दरम्यान रेल्वे वाहतूक  वाढण्यासाठी विशेष प्रयत्न भारताकडून करण्यात येत आहे भारत बांगलादेश या दरम्यान सध्या २ प्रवाशी गाड्या चालवल्या जातात कोलकत्ता  ते ढाका आणि कोलकत्ता ते खूणला या या दरम्यान या गाड्या चालवल्या  जातात ज्यामध्ये १ जून पासून न्यू जलपाईगुडी ते ढाका या दरम्यान चालल्या जाणाऱ्या प्रवाशी गाडीची भर पडणार आहे  कोलकत्ता ते ढाका दरम्यान चालवण्यात येणाऱ्या रेल्वेला मैत्री एक्स्प्रेस कोलकत्ता ते  खूणला या दरम्यान चालवण्यात येणाऱ्या रेल्वेला बंधन एक्स्प्रेस तर नव्याने  न्यू जलपाईगुडी ते ढाका दरम्यान चालवण्यात येणाऱ्या एक्स्प्रेसला मैथिली एक्स्प्रेस असे संबोधतात  स्वातंत्र्यापूर्वी त्या वेळेच्या पूर्ण बंगाल (आताच बांगलादेश ) आणि आताच्या पश्चिम बंगाल ) या दरम्यान ७ रेल्वेमार्ग अस्तित्वात होते . फाळणी झाल्यावर हे मार्ग कालांतराने टप्याटप्याने बंद करण्यात आले . जे आता  दोन्ही देशातील संवाद वाढवण्यासाठी पुन्हा ...

अस्थिरतेच्या चक्रव्युहात पाकिस्तान

इमेज
    भारताबरोबर सीमा शेअर करणाऱ्या देशांचा विचार केला असता, भुतान वगळता सर्वत्र लोकशाहीचा नावाने खोळखंडोबा झाल्याचेच दिसून येत आहे. आपल्या बरोबर स्वातंत्र्य मिळालेल्या पाकिस्तानात छर जन्मापासूनच लोकशाहीचा खेळखंडोबा सुरु आहे. जो आज2022 साली देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मे2022 जेव्हा मी हा लेख लिहीत आहे तेव्हा पाकिस्तानात दोन महिन्यापुर्वीच सत्तेतून पायउतार झाल्याने प्रमुख विरोधी पक्ष झालेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षातर्फे देशात नव्या निवडणूका घेण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी मोठे आंदोलन सुरु आहे.पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी 26 मे रोजी तेथील सरकारला 6 दिवसात नव्या निवडणूकांची घोषणा करावी, अन्यथा होणाऱ्या परीणामाला तेच जवाबदार असतील असा इशारा दिला आहे.     पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादच्या बाहेर मुख्यतः पेशावर येथून आंदोलक राजधानीत येवू नये यासाठी रस्त्यावर मोठ मोठे कंटेनर, वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अस्या पद्धतीने गाड्या लावून मार्ग अडवण्यात आला.  रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणा...

वंदन समाजसुधारक स्वातंत्र्यवीरांना

इमेज
   आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची   जर आपण यादी केली   तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या   गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम   निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?  याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .        महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात . त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही , महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात . स्वातंत्र्यवीर ...

पंडीत नेहरु एक देशाच्या प्रगतीसाठी झपाटलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व

इमेज
                 यावर्षी अर्थात 2022  साली पंडीत नेहरु यांचे निधन होवून 58  वर्षे पुर्ण होतील . कोणत्याही देशाच्या वाटचालीत नसला तरी मानवी आयुष्यात अर्ध शतकाचे विशेष अन्ययसाधारण महत्व आहे . मानव पन्नासीत आला की मागे वळून पाहतोच . त्या अनुषंगाने भारताकडे बघीतल्यास आपणास पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले दिसते . त्यावेळी राजकारणात असणारे कोणीच जिवंत नाही . सध्याचे राजकारण पुर्णत : त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे . आणि कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्या व्यक्तीची जयंती अथवा पुण्यतिथी शिवाय उत्तम दिन तो कोणता असणार ? येत्या गुरुवारी त्यांची 57 वी पुण्यतिथी असल्याने त्यांच्या कार्याचे मी माझ्या अल्पमतीनुसार केलेले मूल्यमापन आपणासमोर मांडत आहे   मित्रानो   नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास ख...