पोस्ट्स

का आहे २०२३ वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे ?

इमेज
         पुढील वर्ष २०२३भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे   कारण एस .  सी .  ओ . या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या   शांघाय को ऑपरेशन   ऑर्गनझेशन   तसेच जी २० या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुढील वर्षी २०२३ साली भारताच्या गळ्यात पडेल . २०२३ या वर्षी एक वर्षासाठी भारत या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदी असेल . ज्यामुळे भारताला विविध देशांशी आपले व्यापारी आर्थिक संबंध दृढ करण्यास मदत होईल . ज्यामध्ये मध्य आशियातील   पाच इस्लामिक राष्ट्रांपैकी   तुर्कमेनिस्तान वगळता अन्य चारही देश तसेच दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना ब्राझील , उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको , कॅनडा , आशिया खंडातील दक्षिण कोरिया , इंडोनेशिया , युरोप खंडातील फ्रांस युनाटेड किंगडम ( इंग्लंड ) आदी देश प्रमुख आहेत सुमारे २८ देशांशी प्रत्यक्ष व्यापारविषयक विविध करार करायची संधी त्यामुळे भारताला   मिळेल   जगात जरी २१० देश असले तरी आर्थिक ताकद...

ए मेरे वतन के लोगो

इमेज
"  ऐ मेरे वतन के लोगों , तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा ' कुठे ऐकल्यासारखे वाटतंय ?  देशभक्त   कवी प्रदीप यांनी लिहलेल्या आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतातील या ओळी आहेत जे गीत स्वर्गीय   लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकल्यावर त्या वेळचे पंतप्रधान   पंडित नेहरू यांनी बच्ची रूला दिया अशे भावनोदगार काढले होते येत्या गुरुवारी २० . ऑक्टोबर रोजी या  प्रसंगाला  कारणीभूत असलेल्या भारत चीन युद्धाला ६०   वर्ष   पूर्ण होतील त्या निमित्याने   या युद्धात प्राणास मुकलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली        त्या वेळी तत्कलीन शासनाच्या काही चुकांमुळे आपण या युद्धात हरलो . गेल्या ६० वर्षात चीन आणि भारत हे दोन्ही देश आणि समस्त जग खूप पुढे गेले आहे . मात्र चीनची जमिनीची हाव काही संपत नाहीये . आपल्या पूर्वीच्या इतिहासाचा दाखल देत शेजारील अनेक देशाशी चीनने सीमावाद सुरु केला ...

राजकीय आणि आर्थिक समस्येच्या चक्रव्हयूयात सापडलेला देश पाकिस्तान

इमेज
               आपला शॅजारील देश पाकिस्तान मधून ज्या बातम्या सध्या ऐकायला वाचायला मिळत आहेत ते बघता ,"  राजकीय आणि आर्थिक समस्येच्या चक्रव्हयूयात सापडलेला देश पाकिस्तान " असे पाकिस्तानचे वर्णन केल्यास ते वावगे ठरू नये . अशी तेथील स्थिती आहे        विजेच्या वाढत्या दरामुळे देशातील शेतकऱ्यांबरोबर देशातील निर्यातीत अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जवळपास ७० त योगदान असेलेल्या वस्त्रोद्योगाने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर   काहीच दिवस होत नाही तोच   देशाच्या दक्षिण भागात काही तांत्रिक कारणास्तव २४ तासाहून काहीसा अधिक काळ वीजपुरवठा पूर्णतः खंडित होते ज्या मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहराचा देखील समावेश आहे . देशातील परकीय चालनसाठा अत्यंत न्यूनतम पातळीवर पोहोचला आहे मित्र देशांनी दिलेल्या मदतीचा टेकू काढताच देश दिवाळखोर जाहीर करण्याच्या स्थितीत पोहोचला आहे पाकिस्तानात गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी झालेल...