पोस्ट्स

अखेर ठरलं !

इमेज
  समस्त पाकिस्तान ज्या आंदोलनाची वाट बघत होता त्या इम्रान खान यांच्या हक्कीकी आझादी या आंदोलनाची तारीख अखेरजाहीर झाली आहे . मंगळवार २५ ऑक्टोबर रोज पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी आयोजित बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत इम्रान खान यांनी आंदोलनाच्या तारखा जाहीर केल्या अपेक्षेप्रमाणे   तारीख जाहीर केल्यापासून तीनच दिवसात हे आंदोलन सुरु होणार आहे . लाहोरच्या सुप्रसिद्ध अश्या लिबर्टी चौकातून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी वेळेनुसार सकाळी ११ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेअकरा ) हे आंदोलन सुरु होईल . या आंदोलनात इम्रान खान यांच्या नेर्तृत्वात इस्लामाबादच्या दिशेने मोर्चा काढण्यात येऊन पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे न्ययालयाने आधीच ठरवून दिलेल्या जागेवर येऊन थांबेल . पाकिस्तानमधील महत्त्वाचा   विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरिके इन्साफ या पक्षाचे नेते अझद उमर यांनी विविध ट्विटद्वारे दिलेल्या महितीनुसार   पक्षाचे ...

ऋषी सुनक यांच्या निवडीतून भारताला घ्यावयाचे आदर्श

इमेज
             अत्यंत अवघड अश्या स्थितीतील युनाटेड किंग्डम या देशाची सूत्रे ऋषी सुनक यांनी स्वीकारली फाळणीपूर्व ब्रिटिश भारतातून प्रथमतः आफ्रिका खंडातील विविध देशात वास्तव्यास असलेल्या आणि सरतेशेवटी युनाटेड किंगडम मध्य स्थिरावलेल्या सुनक यांच्या घरातील ऋषी यांनी युनाटेड किंगडम या देशाची सूत्रे हाती घेतल्याने समस्त भारतीय उपखंडाला आनंद होणे स्वाभाविकच आहे .या भागातील प्रत्येक जण त्यांच्या रूपाने स्वतःचा अंश त्या ठिकाणी बघत आहे जे सुद्धा स्वभावविक आहे मात्र हे प्रकरण एकेकाळी आपल्याला गुलामीत ढकलणाऱ्या देशावर आपल्या भागातील लोकांचे राज्य आले इतकाच या गोष्टीचा अर्थ नाही         ऋषी सूनक यांची पंतप्रधानपदी निवड करण्याची पद्धत भारतीयांनी अभ्यासण्याची गरज मला वाटते . पक्षांर्गत लोकशाहीद्वारे त्यांची निवड झाली त्याचे पूर्वसुरी  लिझ ट्रस यांच्या निवडी दरम्यान ऋषी सूनक आणि   लिझ ट्रस  यांच्या दरम्यान झालेच्या टीव्ही डिबेट या ब्रिटिश सरकारी वृत्तवाहिनी बीबीसीवर दाखवण्यत आल्या . या चर्चा फक्त त्यांच्या ध्येयधोरणावर आधारि...

बदलत्या जागतिक राजकारणात भारताची भूमिका

इमेज
                    सध्या जगाचे राजकारण वेगाने बदलत आहे . या बदलणाऱ्या जागतिक राजकारणात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे . किंबहुना बदलत्या जागतिक राजकारणाचा इकेंद्रबिंदू भारत असणार आहे , असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी आज   जगाची    स्थिती आहे . गेल्या वर्षभरात विविध देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती यांचे वाढलेले भारत दौरे याचीच साक्ष    देतात असे मम्हटल्यास वावगे ठरू नये                  या २०२२वर्षात ,. १९ आणि २० मार्च रोजी जपानचे पंतप्रधान फुमिओ किंशिंदा यांची दोन दिवशीय भारत भेट झाली   २ एप्रिलला . इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट   भारताच्या तीन दिवशीय भेटीवर येणार होते मात्र वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या दौरा रद्द झाला . मात्र त्यांनी आपला प्रतिनिधी भारतात पाठवला . पूर्वनियोजित दौरा नसताना चीनच्या परराष्ट्र...