पोस्ट्स

बदलत्या तंत्रज्ञानाची सखोल सविस्तर माहिती देणारे पुस्तक 'इंडस्टी 4.0

इमेज
सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे. आता जगात तूमच्या शारिरीक शक्तीपेक्षा अधिक महत्व तंत्रज्ञानाचे आहे हे आपण रोजच्या जगण्यात पदोपदी अनुभवतोच, या सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण मागे पडू नये यासाठी आपण सर्वच जण आपल्यापरीने प्रयत्नशील देखील असतो .मी देखील या प्रयत्नात असताना मला एक खजिना गवसला तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या आय.बी एम.सारख्या प्रख्यात कंपनीत काही काळ कार्यरत असणारे डॉ .भुषण केळकर सरांनी लिहलेले इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक.       केळकर सरांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने पुस्तकाला परीपुर्ण केले आहेच हे सांगायला नकोच. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.केल्यामुळे डॉ.भूषण केळकर सरांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रेष्ठत्व वेगळे सांगायलाच नको. डॉ.भूषण केळकर सरांनी लोकमतच्या ऑक्सिजन या तरुणाईसाठीच्या पुरवण्यांसाठी लिहलेल्या लेखांचे पुस्तकस्वरुपात पुनर्प्रकाशन म्हणजे हे पुस्तक .डॉ.भुषण केळकर सरांच्या त्या लेखमालिकेला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील लेख...

शनी ग्रहाविषयी या बाबी आपणास माहिती आहेत ना !

इमेज
शनी नाव ऐकताच अनेकांना धडकी भरणारा ग्रह. साडेसातीमुळे ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध असलेला ग्रह. मात्र हा शनी ग्रह खुपच रंजक आहे‌. गेल्या काही दिवसांमध्ये  खगोलशास्त्राचा विचार करता दोन गोष्टीमुळे हा ग्रह विशेष चर्चेत आलायं. त्या गोष्टी आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन           तर मित्रांनो साडेसाती वगळता शनी म्हटल्यावर जी गोष्ट लगेच समोर येते,ती म्हणजे त्याचे कडे. शनीखेरीज गुरु, युरेनस, नेपच्युन या ग्रहांना देखील कडे असले तरी कडी असलेला ग्रह म्हटल्यावर नाव समोर येते ते शनीचेच.माझे खगोलशास्त्रप्रेमी मित्र आहेत ते जेव्हा जाहीर आकाशदर्शनाचे कार्यक्रम करतात तेव्हा लोक त्यांना शनीच्या कडी दुर्बिणीतून दाखवा असी मागणी करत असतात. ही कडी निर्माण होण्याचा दोन शक्यता सांगितल्या जातात.त्यातील पहिली म्हणजे काही कारणाने लाखो वर्षापुर्वी शनीचा एका उपग्रह काही अज्ञात कारणाने खुपच जवळ आला त्यामुळे त्या उपग्रहावरील शनीचे गुरुत्वाकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले या वाढलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या उपग्रहाचे तूकडे झाले जे आपण शनीच्या कड्याचा रुपात बघत आहोत.एखादा खगोलीय...

एसटी महामंडळाची उलट गंगा!

इमेज
    सध्या आपल्या भारतातील सर्वच सार्वजनिक बसवाहतूक महामंडळे  प्रवाश्यांना अधिकाधीक उत्तम सेवा कोणत्या प्रकारे देता येईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.राजस्थान, उत्तर प्रदेश सारख्या गरीब राज्यांचे  महामंडळ सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीये.मात्र म्हणतात ना, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा या नियमाला एक अपवाद आहे.आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ. आपले महामंडळ घडाळ्याचे काटे मागे फिरवत आपणास 2008 सालची अनुभुती देण्यासाठी पुढे सरसरावले आहे. महामंडळाने 4मार्च रोजी पुर्णत: तयार असलेल्या  बसची खरेदीची ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो  आपल्या भारतात सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्थेत सर्वप्रथम 2×2 या पद्धतीची आसने बसवून  प्रवाश्यांना आरामदायी प्रवाश्याची अनुभुती देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाने पुन्हा एकदा 3×2 बसेस चालवण्याचे ठरवले आहे‌.4 मार्चच्या काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता  हवेच्या दाबाने उघडणारे न्युमटिक दरवाजे ही बसेससाठी सर्वसामान्य बाब झाली असताना, या बसेससाठी पुर्वीप्रमाणे खटकीच...

नेपाळमधील लोकशाही धोक्यात

इमेज
नेपाळ, भारताखेरीज हिंदू बहुसंख्य असलेला भारताचा शेजारी. भुतानखेरीज भारतीयांना कायमस्वरुपी व्हिसा फ्री प्रवेश असणारा देश हा नेपाळ सध्या मात्र राजकीय आंदोलनात गटंगळ्या खातोय. तस बघायला गेलो तर नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो. मात्र ही व्यवस्था मोडीत काढत देशात सौदी अरेबिया सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  नेपाळमध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे तसी या प्रकारची राजेशाही समर्थन करणारी आंदोलने नेपाळला नवी नाहीत या आधी अनेकदा या प्रकारची आंदोलने नेपाळमध्ये झालेली आहेत. मात्र सध्याचे आंदोलन या आधीच्या आंदोलनापेक्षा खूपच व्यापक आहे मागच्यापेक्षा अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाली आहेत        2001 जून 3 रोजी नेपाळचा भावी राजा दिपेंद्र याने आवडत्या मुलीशी राजघराण्यातील व्यक्ती लग्न करु देत नाहीत, या रागातून राजपरीवाराच्या केलेल्या हत्येनंतर निर्माण झालेल्या पोकळीपासूनच नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.  त्या हत्याकांडानंतर राजा बनलेल...

सांगा कसं जगायचं ?

इमेज
आपल्या मराठीत उत्तमोत्तम कवितांची मोठी परंपरा आहे.फक्त मनोरंजन करणाऱ्याच नव्हे तर जीवनाचे सार मांडणाऱ्या कविता आपल्या मराठीत आढळतात.याच सर्वोत्तकृष्ट कवितेत समाविष्ट होणारी कविता म्हणजे ज्येष्ठ कवि मंगेश पाडगावकर यांनी लिहलेली कविता  'सांगा जगायच कसं, कण्हत कण्हत की गाणे म्हणत' ही पावणेतीन मिनीटात पुर्णत: गावू शकणारी कविता. मंगेश पाडगावकरांनी जेमतेम पावणेतीन मिनीटात जगण्याचे तत्त्वज्ञान या कवितेत मांडले आहे‌. ऐकणाऱ्याला पुर्णत: सकारात्मता शिकणारी कविता प्रत्येकाने मुखोग्गद करून, जेव्हा जेव्हा त्याच्यावर अडचणी येतील, तेव्हा ती म्हटल्यास आत्महत्या नक्कीच टळतील.नैराश्यावरचे रामबाण औषध म्हणून या कवितेकडे बघता येवू शकते.        हे सांगायचे कारण व्यवसायाने मुख्याध्यापक असलेल्या, ज्यांचे पती वन खात्यात उच्चपदस्थ आहेत अस्या जळगाव शहरातील एक भगिनी.ज्यांचे कर्करोगाने नुकतेच दुर्देवी निधन झाले आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मिडीयात विशेष चर्चित आलेली पोस्ट.स्वत:चा मृत्यू समोर दिसत असताना , लोकांना लिहिलेली ती पोस्ट हाच सक...

निखळ आनंद देणारे पुस्तक,' माझा बायकोचा नवरा'

इमेज
      विनोदाचे मानवी जिवनातील‌ स्थान अत्यंत महत्तवाचे आहे. जिवंतपणी जाळते,तीला चिंता म्हणतात. मनुष्याने चिंतेपासून दुर राहण्यासाठी आनंदी राहिले पाहिजे.संकटे येतात आणि जातात.मानवाने आनंदी राहिले तर  या संकाटाचा तो सहजतेने तोंड देवू शकतो. या प्रकराची विधाने आपण अनेकदा वाचतो ,ऐकतो. आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय योजता येतात.त्यात अनेक व्यक्तींकडून वापरण्यात आलेला उपाय म्हणजे, विनोदी साहित्य वाचणे.आपल्या मराठीला मोठ्या प्रमाणात विनोदी साहित्याचा वारसा आहे.पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, चि.वि.जोशी अस्या अनेक लेखकांनी विनोदाला एका उत्तम उंचीवर नेवुन ठेवला आहे.याच परंपरेतील एक पुस्तक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ साहित्यीक नरेश महाजन सरांनी लिहलेले आणि शद्बमल्हार प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक माझा बायकोचा नवरा'हे पुस्तक. मी नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय 'सार्वजनिक वाचनालय नाशिक' अर्थात सावानाच्या मदतीने नुकतेच वाचले.         160 पानी या पुस्तकात 13 विनोदी कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.विनोद म्हटला की टिव्हीवरील कार्यक्रमांमुळे  सध्याचा काळात आपल्या...

भारताच्या वैभवशाली वारश्याची ओळख करुन देणारे पुस्तक, 'सिंधू -हरवलेली संस्कृती'

इमेज
आपल्या भारताला आदिम काळापासून मोठा वैभवशाली वारसा मिळालेला आहे.  आहे.मानवाला लेखन कला अवगत नव्हती त्या म्हणजेच इतिहासकारांचा मते pre history काळ असो किंवा मानवाला लेखनकला अवगत होती मात्र अद्याप तीचा उलगडा मानवाला झालेला नाही अस्या कालखंडात अर्थात proto hostory कालखंड असो किंवा इतिहासकारांच्या मते ज्याला history peroid  (ज्याचे accient ,mideverial, modern असे तीन भाग पडतात) म्हणतात त्या कालखंडातील असो या सर्वच कालखंडात भारताला वैभवशाली वारसा  मिळाल्याचे इतिहासाच्या शास्त्रीय पद्धतीने संशोधनातून  वारंवार सिद्ध झाले आहे.याच विस्तीर्ण कालखंडातील एक महत्तवाचा टप्पा म्हणजे सिंधु सरस्वती संस्कृतीचा कालखंड होय. आपल्या दुर्दैवाने भारताच्या या प्राचीन वारस्याची माहिती  देणाऱ्या पुस्तकाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वानवा आहे.मात्र काळकुट्ट अंधारात मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड निर्माण करते त्याचप्रमाणे हा अभाव दुर करण्याचे काम सनय प्रकाशनतर्फे प्रकाशित अनुवादीत पुस्तक 'सिंधू हरवलेली संस्कृती' हे पुस्तक काही प्रमाणत करते . मुळातील लंडन येथील Reaktion Publishication चे T...