पोस्ट्स

जपानी कार्य कुशलतेवर अचूक भाष्य करणारे बॉलीवूड मधील गाणे

इमेज
व्यवस्थापन क्षेत्रात जपान आणि जपानी तंत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जपानी कारखन्यात तयार झालेल्या वस्तू कितीही काटेकोरपणे तपासणी केली तरी चूक सापडणार नाही या प्रमाणात अचूक झालेल्या असतात, असे सहजतेने म्हटले जाते. जपानने हा मान मोठ्या कष्टाने मिळवला आहे.,हे सांगायला कोणत्याही तज्ञ व्यक्तीची आवश्यकता नसावी.सातत्याने होणाऱ्या भुकंपाला सक्षमपणे तोंड देत दुसऱ्या महायुद्धानंतर शद्बश: राख झालेल्या देशाने ही गौरवास्पद कामगिरी केली आहे.        जपानची ही कामगिरी किती उच्च दर्जाची आहे,हे आपण 1955 साली आलेल्या श्री 420 या चित्रपटातील राज कपुर यांच्यावर चित्रीत झालेल्या 'मेरा जूता है जपानी....फिर भी दिल है हिंदुस्थानी या सव्वाचार मिनीटात आपण सहजतेने बघू शकतो.  या गाण्यातील अन्य वाक्यांचा संदर्भ घेतल्यास आपणास त्या वेळच्या भारताच्या परराष्ट्र धोरण आणि जागतिकीकरणाविषयी बोलता येवू शकते जसे पॅट इंग्लडची आणि टोपी रशियाची मात्र मन मात्र पुर्णत: भारतीय या प्रमाणे. मात्र ते आपण क्षणभर बाजुला ठेवून परत येवूया जपानवर.     चित्रपटाची पटकथा आणि इतर...

सहजसोप्या शद्बात अर्थशास्त्राचा संकल्पना सांगणारे पुस्तक ,'अर्थजिज्ञसाा

इमेज
अर्थशास्त्र, आपल्या रोजच्या जीवनात पदोपदी सामोरे जावे लागणारा विषय. रोजच्या जगण्यात आपण भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर गोष्टी विकत घेतो, याचे दर महागाईशी निगडीत असतात.महागाई या घटकाचा शास्त्रीय अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपल्याकडे जरासे पैसे साठले की,ते आपण विविध ठिकाणी गुंतवतो .ही गुंतवणूक करण्याचे मार्ग अपणास अर्थशास्त्र शिकवतो.आपण एखादी गोष्ट खरेदी केल्यावर जी.एस.टी हा कर भरतो. देशातील  कररचनेचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपण रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी वापरतो त्यातील काही आपल्या देशात तयार झालेल्या नसतात तर इतर देशातून आपल्या देशात आयात झालेल्या असतात तर आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू उत्पादक जास्त नफा मिळवण्यासाठी दुसऱ्या देशात निर्यात करतात या आयात निर्यातीचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो‌. आपण शि‌क्षण झाल्यावर रोजगाराचा संधी शोधतो, देशातील रोजगाराच्या संधी निर्माण होण्यात अर्थशास्त्र महत्त्वाची भुमिका बजावते.या आणि या सारख्या असंख्य बाबींमुळे अर्शशास्त्र आपणासी जोडले गेले आहे‌. सध्याचा धावपळीच्या स्पर्धेच्या जगात तर ही जोडणी दिवसोंदिवस अधिकच घट्ट होताना आपल्याला दिसत...

नात्यातील ढोंगीपणा उघड करणारे गाणे

इमेज
      आपल्या भारतातील चित्रपटांतील महत्तवाचा भाग म्हणजे त्यातील गाणी. जगात इतर भागातील चित्रपटांमध्ये गाणी शक्यतो आढळत नाही. भारतीय चित्रपटांत प्रामुख्याने आढळणाऱ्या या गाण्यातून मानवी जीवनाच्या सर्वच अंगाना स्पर्श केलेला आढळतो.  या गण्यातून ज्या प्रकारे मानवी आयुष्यातील रंजकता, सकारात्मक बाजू दाखवण्यात येते त्याचप्रमाणे मानवी आयुष्यातील दाहकता कटु सत्य मानवी आयुष्यातील वास्तविकता देखील तितक्याच प्रभावीपणे दाखवण्यात भारतीय चित्रपटातील गीते यशस्वी झालेली दिसतात.      याच मानवी आयुष्यातील कटू बाजू दाखवणारे एक प्रसिद्ध गाणे म्हणजे श्रेष्ठत्तम  बॉलीवूड चित्रपट निर्माते,दिग्दर्शक, अभिनेते  गुरुदत्त निर्मित  प्यासा या चित्रपटातील 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है!' हे गाणे .तसे बघायला गेलो तर प्यासी मधील सर्वच गाणी मानवी आयुष्यातील ऋणात्मक बाजू आपल्या समोर आणत असली तरी मला 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हे' हे गाणे विशेष मनाला भावते.     मानवी नाते मुख्यत: स्वार्थावर अवलूंबन असतात.त्यात जिव्हाळा ममत्व ...

मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

इमेज
चित्रपट हे मोठे सशक्त माध्यम आहे‌.मनोरंजनाबरोबर चित्रपटातून मोठा संदेश देता येतो, आणि तो देण्यात येतो देखील. निव्वळ टाईमपास फालतू प्रेमकथांचे चित्रपट म्हणून ज्या बॉलिवूडचा उल्लेख होतो ते देखील याला अपवाद नाहीये. बॉलिवूडच्या चित्रपटातून जीवनाविषयक अनेक बाबी आपणास समजतात. याच मालिकेतील  जीवनाबाबत मोठे शिक्षण देणारा एक उत्कृष्ट  चित्रपट म्हणून 25 ऑक्टोबर 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' कडे बघता येईल.         स्वत:च्या निर्णयाची जवाबदारी स्वत:कडे  कोणत्या प्रकारे घेयची‌.ते निर्णय फसले  तरी त्याबाबत दुसऱ्याला  दोष न देता त्याही स्थितीत स्वतः अपयशाची  जबाबदारी घेत, त्याला हसत हसत सामोरे  कसे जायचे.आयुष्यात छंदाचे महत्त्व काय असते? हे महत्त्वाचे संदेश या चित्रपटातून देण्यात आले आहेत.       मनुष्य त्याच्या रोजच्या जगण्यात कितीही व्यस्त असला तरी मनुष्याने त्याच्या छंदासाठी काही वेळ काढला पाहिजे.छंदामुळे वेळ वाया जात नाही, तर व्यक्तीस रोजच्या जगण्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेष बळ मि...

पुन्हा एकदा संतोष माने!

इमेज
.    ती नेहमीप्रमाणे पुण्यातील एक सकाळ होती सुट्टीचा दिवस नसल्याने सर्वजण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते मात्र काय त्यांच्यावर ओढवणार आहे याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. त्यावेळी अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या ठिकाण असणाऱ्या स्वारगेट परिसरात एका एसटी बस ड्रायव्हरने बस भरधाव पणे बस चालवत नऊ जणांना मृत्युमुखी पाडले तर किमान 30 जणांना गंभीरित्या जखमी केली  आज ही  घटना संतोष  माने प्रकरण या नावाने प्रसिद्ध आहे. ही घटना घडली 25 जानेवारी 2012 रोजी त्यानंतर या प्रकरणातील आरोपी संतोष माने यांच्यावर पुणे सत्र न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालला . पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी संतोष माने यांना फाशीची शिक्षा सुनावली मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते हे कृत्य करताना तणावात होते असे निरीक्षण नोंदवात त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. आज संतोष माने येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय . संतोष माने यांनी वरिष्ठांचा जाचाल कंटाळून हे कृत्य केले होते मात्र आज हे वरिष्ठ शांतपणे आपल्या घरात बसले असतील.आणि संतो...

डिजीटल कचराय् नम:

इमेज
सध्याचा अति जलद दळणवळणाचा काळात, आपल्याकडे एका विशिष्ठ प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असतो.कचरा आणि दळणवळण ,चमकलात ना? कचराचा आणि दळणवळणाचा काय संबंध ,आपण काहीतरीच वाचत नाही ना, असे आपणास वाटू शकते.तर सांगतो हा आहे डिजीटल कचरा.आपल्या मोबाईल मेमरीतील नको असणारे मात्र डिलीट न केलेले व्हिडीओ, फोटो, व्हाटसप सारख्या सोशल मिडीयाचा वरील बऱ्याच दिवसात न उघडलेले ग्रुप यातून हा कचरा निर्माण होतो. हे सर्व निर्माण होण्यासाठी प्रगत दळणवळ मोठी सहाय्यक भूमिका बजावते हे आपण जाणताच.या प्रगत दळणवळणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात काढण्यात आलेला व्हिडिओ किंवा फोटो क्षणार्धात आपल्या मोबाईल मेमरीचा भाग होतो.आणि डिजीटल कचऱ्याच्या निर्मितीस भाग होतो.त्याचप्रमाणे सोशल मिडीयातील गेल्या कित्येक दिवसात न उघडलेले विविध ग्रुप देखील डिजिटल कचऱ्याच्या निर्मितीत मोठा हातभार लावतात.जरी ठराविक कालावधीनंतर मेसेज डिलीट करण्याची सोय असली तरी तूम्ही disapring हे फिचर्स वापरल्याने हा मेसेज डिलीट झाला आहे हे दाखवत त्या मेसेजची आठवण आपणास करत हे मेसेज डिजीटल  कचऱ्याची निर्मिती करत आपला फोन विनाकारण हळू करतात ...

बदलत्या तंत्रज्ञानाची सखोल सविस्तर माहिती देणारे पुस्तक 'इंडस्टी 4.0

इमेज
सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे. आता जगात तूमच्या शारिरीक शक्तीपेक्षा अधिक महत्व तंत्रज्ञानाचे आहे हे आपण रोजच्या जगण्यात पदोपदी अनुभवतोच, या सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण मागे पडू नये यासाठी आपण सर्वच जण आपल्यापरीने प्रयत्नशील देखील असतो .मी देखील या प्रयत्नात असताना मला एक खजिना गवसला तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या आय.बी एम.सारख्या प्रख्यात कंपनीत काही काळ कार्यरत असणारे डॉ .भुषण केळकर सरांनी लिहलेले इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक.       केळकर सरांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने पुस्तकाला परीपुर्ण केले आहेच हे सांगायला नकोच. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.केल्यामुळे डॉ.भूषण केळकर सरांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रेष्ठत्व वेगळे सांगायलाच नको. डॉ.भूषण केळकर सरांनी लोकमतच्या ऑक्सिजन या तरुणाईसाठीच्या पुरवण्यांसाठी लिहलेल्या लेखांचे पुस्तकस्वरुपात पुनर्प्रकाशन म्हणजे हे पुस्तक .डॉ.भुषण केळकर सरांच्या त्या लेखमालिकेला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील लेख...