पोस्ट्स

तुम्ही शिकवाल हो‌ हिंदी !

इमेज
                                  नुकताच आपल्या राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी हि भाषा एक विषय शिकवण्यास सुरवात करण्यात येणार असल्याचा, निर्णय घेतल्याचे एव्हाना तुम्हाला आता माहिती झाले असेलच. . या विषयावर आता वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरु आहे ज्यात उत्तरेतील राज्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारतात का ?  भाषावार प्रांत  रचनेचा मूळ हेतू काय  ? हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा आहे का ?  ऊत्तर भारतीयांच्यी सोइ करण्यासाठी ही खेळी आहे . दक्षिणेकडील राज्यात अशा निर्णय घेऊन दाखवा , अश्या विविध उपविषयांच्या आधारे करण्यात येणारे दावे प्रतिदावे आरोप प्रतिआरोप करण्यात येत आहेत .मात्र या सर्व गदारोळात एका महत्वाच्या मुद्द्यावर मात्र फारच कमी बोलले जात आहे . किमान माझे तरी तसे निरीक्षण आहे तो म्हणजे ज्या मुलांना हिंदी भाषा शिकवण्याबाबत हे सर्व आकांडतांडव सुरु आहे त्यांच्या भावविश्वाचा !                               ...

रामायणातील महत्त्वाचे स्थान ' शबरीधाम'

इमेज
                      रामायण , आपल्या भारतीयांच्या मनामनात वसलेले महाकाव्य . प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ. प्रभू श्रीराम असंख्य भारतीयांचे श्रद्धा स्थान. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थस्थानांची यात्रा अनेकजण भक्तिभावाने करतात. मला सुद्धा या पैकी एक महत्वाचे तीर्थस्थान असलेल्या 'शबरीधाम' या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्याची संधी  मिळाली त्यावेळी मला आलेय अनुभवांचे अनुभव कथन                   तर मित्रानो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असण्याच्या हे संभव आहे की मी गेल्या काही वर्षापर्यत माझा ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीत एसटी बसच्या मदतीने एकदिवशीय  तीर्थाटन , पर्यटन करत असे  या पर्यटनात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र , गुजरातचा काही भाग इंदौर , गोवा  कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी फिरलो आहे. मात्र जून २०२३ला माझ्या वडिलांच्या अकस्मित अपघाती निधनानंतर त्यास मोठा ब्रेक लागला. तो ब्रेक मोडीत काढत,  पुन्हा नव्या जोमने माझा हा उपक्रम सुरु करण्याची म...

भारत म्यानमार मैत्रीचा सेतू आणि बॉलिवूड

इमेज
माझ्या जपान आणि बॉलिवूड यांच्यातील सहसंबंध दाखवणाऱ्या गाण्याविषयीच्या लेखानंतर अनेकांनी मला या सारखी अजून काही या सारखी गाणी असतील तर त्याविषयी तू लिहिलेले मला वाचायला आवडेल असे सांगितल्याने त्या विषयी सांगण्यासाठी प्रस्तुत लेखन .       मित्रांनो या प्रकारचे अजून एक गाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरवातीला चित्रीत करण्यात आले.1949 साली प्रदर्शित झालेल्या पतंगा या चित्रपटातील 'मेरे पिया गये हे रंगून, वहासे किया हे टेलिफोन' हे राजिंदर कृष्ण लिखित आणि सी रामचंद्र यांच्या संगिताने सजलेले हेच ते गाणे.शमशाद बेगम आणि सी रामचंद्र यांनी गायलेल्या या गाण्यातून नवरा बायको यांच्यातील अतूट प्रेम दाखवले गेले आहे.          सव्वा चार मिनीटांच्या कृष्णधवल गाण्यातूनच नव्हे तर पतंगा या चित्रपटातून त्यावेळच्या भारताच्या मित्र राष्ट्रांबाबत खुप माहिती मिळते‌.भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले तर म्यानमारला 4 जानेवारी 1948 ला स्वातंत्र्य मिळाले .दोन्ही देशातील राजकर्त्यांना ब्रिटीश राजवटीत लयास गेलेल्या आपल्या देशाला विकसीत करण्याचे आव्हान होते. स्वातंत्र्य म...

पक्षीय राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारे साप्ताहिक, 'सरकारनामा'

इमेज
एका ठिकाणी 3 व्यक्ती एकत्र आल्यावर राजकारणाला सुरवात होते. असे सुप्रसिद्ध राजशास्त्रातले  समीकरण आहे.मनुष्याचा उपजत असलेल्या स्वहित बघण्याचा स्वाभाव वैशिष्ट्यामुळे राजकरणाची निर्मिती होते.मनुष्याने कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मनुष्याची कधीच पाठ न सोडणारी गोष्ट म्हणजे राजकारण असेही म्हटले जाते‌.तर असे हे राजकारण व्यक्तीगत स्वरुपाचे देखील असू शकते.किंवा समान एका ध्येयासाठी वेगवेगळी माणसे एकत्र आल्याने वेगवेगळ्या लोकांचा एक समुह या न्यात्याने विविध पक्षांचे देखील असू शकते‌.     आपल्या भारतासारख्या खंडप्राय लोकशाहीप्रधान, आणि विविध प्रकारची विविधता असलेल्या देशात व्यक्तीगत राजकारणापेक्षा पक्षीय राजकारण अधिक यशस्वी होवू शकते ,हे नेत्यांचा लक्षात आल्याने आज  भारतात अनेक पक्ष स्थापन झालेले आहेत.नेते त्यांचा त्यांचा पक्षाच्या मार्फत राजकारण खेळत आपले इसिप्त साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. या पक्षीय राजकारणाचा देशाच्या प्रगतीवर मोठा परीणाम होत असल्याने त्याची काही प्रमाणात माहिती देशातील जागरुक जागृत नागरिक म्हणून आपणास असणे अत्यावश्यक ठरते.आणि या कामी मदतील...

इथेही 56

इमेज
विद्यमान सत्ताधिकारी वर्गाकडून या पुर्वी अनेकदा 56इंच छाती आहे आमची, असे सांगितले जात असल्याचे वाचकांना आठवत असेलच .स्व अभिमान सांगण्यासाठी वापरण्यात येणारा 56 हा आकडा सत्ताधारी वर्गाला खुपच प्रिय असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्याकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच देण्यात आला आहे. मुळातच तूटपुंजा असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार  कमी केल्याने त्यांचा समोर जीवन मरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.        एसटी महामंडळाच्या या दुखण्यावर काय उपचार करायचे ? हे माहिती आहे पण राजकीय इच्छा शक्तीच्या अभावी योग्य ते उपाय होत नाहीये‌.सध्या एसटी महामंडळाला अतिशय मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. वरवरची मलमपट्टी स्वरूपात आर्थिक मदत देवून वेळ मारली जाते ती पुन्हा एकदा मदत देण्याची स्थिती येण्यापर्यत.हे चक्र भेदणे हे संकट दुर करण्यासाठी अत्यावश्यक आहे. देशातील इतर एसटी महामंडळे देत नाहीत अस्या कित्येक सवलती आपल्या महामंडळाकडून देण्यात येतात ,समाजसेवेच्या नावाखाली,जसे या सवलती देण्याचा ठेका महाराष्ट्र एसटी महामंडळानेच घेतलाय‌....

भारत बुद्धिबळातील महासत्ताच !

इमेज
        भारत बुद्धिबळातील महासत्ताच  ! होय,  भारत बुद्धिबळातील महासत्ता आहे,  आणि मी आंधळा देशप्रेमी म्हणून म्हणत नाहीये.  बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या फिडे या  संघटनेतर्फे एप्रिल २०२५ मधील टॉप १०० खेळाडूंची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्याच्या आधारे  मी हे  विधान करतोय .       तर मित्रानो  फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  फेडरेशन इंटरनॅशलनल डी इचेस या बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या संस्थेमार्फत एप्रिल २०२५ च्या टॉप १००  पुरुष खेळाडूंच्या यादीतील पहिल्या १५ मध्ये ५  खेळाडू भारतीय आहेत. फिडेकडून खेळाडूंचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या खेळाच्या प्रदर्शनावर आधारित काही गुण दिले जातात ज्याला इलो रेटिंग म्हणतात या इलो रेटिंगच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे .  या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विद्यमान विश्वविजेते ग्रँडमास्टर डी गुकेश,   चवथ्या क्रमांकावर ग्रँडमास्टर अर्जुन इरेगसी सातव्या क्रमांकावर ग्रँडमास्टर आर प्र...

जपानी कार्य कुशलतेवर अचूक भाष्य करणारे बॉलीवूड मधील गाणे

इमेज
व्यवस्थापन क्षेत्रात जपान आणि जपानी तंत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जपानी कारखन्यात तयार झालेल्या वस्तू कितीही काटेकोरपणे तपासणी केली तरी चूक सापडणार नाही या प्रमाणात अचूक झालेल्या असतात, असे सहजतेने म्हटले जाते. जपानने हा मान मोठ्या कष्टाने मिळवला आहे.,हे सांगायला कोणत्याही तज्ञ व्यक्तीची आवश्यकता नसावी.सातत्याने होणाऱ्या भुकंपाला सक्षमपणे तोंड देत दुसऱ्या महायुद्धानंतर शद्बश: राख झालेल्या देशाने ही गौरवास्पद कामगिरी केली आहे.        जपानची ही कामगिरी किती उच्च दर्जाची आहे,हे आपण 1955 साली आलेल्या श्री 420 या चित्रपटातील राज कपुर यांच्यावर चित्रीत झालेल्या 'मेरा जूता है जपानी....फिर भी दिल है हिंदुस्थानी या सव्वाचार मिनीटात आपण सहजतेने बघू शकतो.  या गाण्यातील अन्य वाक्यांचा संदर्भ घेतल्यास आपणास त्या वेळच्या भारताच्या परराष्ट्र धोरण आणि जागतिकीकरणाविषयी बोलता येवू शकते जसे पॅट इंग्लडची आणि टोपी रशियाची मात्र मन मात्र पुर्णत: भारतीय या प्रमाणे. मात्र ते आपण क्षणभर बाजुला ठेवून परत येवूया जपानवर.     चित्रपटाची पटकथा आणि इतर...