आयुष शेटी : भारतीय बॅडमिंट क्षेत्रातील नाव उगवता तारा
१७ ऑगस्ट २०२६ हा दिवस भारतासाठी सुवर्णक्षणांनी नोंदवण्यात येईल कारण नवी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशप मध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी अत्यंत चमकदार कामगिरी केली. बुद्धिबळ या वैयक्तिक खेळात भारतीय गेल्या कित्येक वर्षापासून चमकदार कामगिरी करत होतेच त्यामध्ये ॲथलेटिक्स ची भर पडल्याची आपण या कॉमनवेलमध्ये बघितलेच आता यामध्ये बॅडमिंटनची सुद्धा भर पडलेली आहे हे आपण या बॅडमिंटन चॅम्पियनशॉपमध्ये बघता आहोतच. तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असाल मोदीविरोधक असाल मोदीचे समर्थक असाल भारतीय खेळाडूंकडे ज्या पद्धतीने सध्या लक्ष देण्यात येत आहे हे नाकारू शकत नाही भारतीय खेळाडू विविध स्पर्धांमध्ये जी कामगिरी करत आहेत ती खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि त्याची ही झलक आपणास विविध स्पर्धांमध्ये भारतीयांनी घेतलेल्या पदकांमध्ये दिसत आहेच
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटनशिपमध्ये पहिल्या दिवशी सर्वचभारतीय खेळाडूंनी आपले सामने खिशात घातलेले असले तरी यामध्ये उठून दिसला तो 21 वर्षीय आयुष शेट्टी गेल्या काहीही स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत असणाऱ्या आयुषची कामगिरी याही स्पर्धेत अत्यंत उठावदार होत आहे त्याची झलकत्याने पहिल्या दिवशी दाखवली सध्याचा वर्तमान बॅडमिंटन विश्वविजेता जो रँकिंग मध्ये पहिल्य स्थानावर आहे असे चीन या देशातील शी यू-ची यास आयुषने पराभवाचे पाणी चाखायला लावले गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये हे दोघे एकमेकांसमोर आले होते त्यावेळेस सातत्याने आयुष हरत होता मात्र प्रत्येक पराभवाचे तो सखोलपणे विश्लेषण करत असल्याने आपल्या खेळातील चुका उणीवा यावर तो कष्ट घेत होता त्यामुळे त्याचा खेळ सुधारत असल्याचे सातत्याने जाणवत होतेच स्पर्धेपूर्वी त्याच्या प्रशिक्षकांशी 17 ऑगस्ट 2020 हा दिवस सध्याच्या वर्तमान विश्वविजेता चीनचा नागरिक असलेल्या शी यू-ची याच्यासाठी वाईट असेल असे विधान केले होते आणि ते खरेच ठरले त्बयाद्दल आयुष आणि त्याचा प्रशिक्षकांचे दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन
आयुष शेट्टी हा भारताचा युवा बॅडमिंटनपटू असून तो पुरुष एकेरी प्रकारात खेळतो. त्याचा जन्म ३ मे २००५ रोजी कर्नाटकातील करकळा येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षी वडिलांना बॅडमिंटन खेळताना पाहून त्याला या खेळाची आवड निर्माण झाली. सुरुवातीचे प्रशिक्षण कर्नाटकात घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी तो चांगल्या प्रशिक्षणाच्या संधींसाठी बंगळुरूला गेला. पुढे त्याने प्रकाश पादुकोण बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेतले.
Iआयुषची उंची सुमारे १.९५ मीटर असून त्याच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे आक्रमक फटके, दमदार स्मॅश आणि कोर्टवरील चांगली हालचाल. बचावात्मक खेळ अधिक मजबूत करण्यासाठीही त्याने विशेष मेहनत घेतली आहे.
२०२३ मध्ये आयुषने जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवून दिली. त्यानंतर २०२५ मध्ये त्याने US Open Super 300 स्पर्धेचे विजेतेपद मिळवून वरिष्ठ स्तरावरील पहिले मोठे विजेतेपद पटकावले.
२०२६ हे वर्ष आयुषच्या कारकिर्दीतील विशेष ठरले. बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. या स्पर्धेत त्याने तीन टॉप-१० खेळाडूंना पराभूत करत अंतिम फेरी गाठली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची जागतिक क्रमवारीतही झपाट्याने प्रगती झाली.
काल१७ ऑगस्ट, २०२६ ला, दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत त्याने जागतिक क्रमवारीतील अव्वल आणि गतविजेता चीनच्या शी यू-ची याचा २१-१४, १३-२१, २१-१९ असा पराभव केला. हा विजय त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो



टिप्पण्या