पोस्ट्स

राजा हरिशचंद्र ते सैराट

इमेज
भारतात भारतीयाने तयार केलेला चिञपट म्हणजे दादासाहेब फाळके यानी तयार केलेला चिञपट  राजा हरीशचंद्र हा होय . हा मुकपट 3मे 1913रोजी प्रदर्शीत झाला ती बॉलीवूडची सूरवात मानली जाते . हा चिञपट आणि या नंतरचे प्रभात चे चिञपट हे संस्कृतीप्रधान पुराणातील कथनकावर आधारीत होते . नंतर हिंदीचा प्रभावाखालील कौटोंबिक चिञपटाचा कालखंड सूरु झाला . मध्यंतरी तमाशा चिञपटांची पण लाट मराठी चिञपट सृष्टीत येवून गेली . जी आता टाईमपास सैराट आदी निव्वळ करमणूक प्रधान चिञपटांपर्यत येवून ठेपली आहे . गेल्या 103  वर्षाचा आढावा घेतल्यास आपणास अजून एका बाबीकडे लक्ष द्यावेच लागते ते म्हणजे चिञपट निर्मितीचे बदलेले केंद्र . पुर्वी कोल्हापूर आदी ठिकाणी चालणारी चिञपट निर्मिती कालांतराने मुंबईत येवून स्थिरावली . सध्या नाशिक परिसरात चिञीकरण होत आहे चिञपट तंज्ञाच्या अंगाने विचार करावयाचा झाल्यास पिस्टर कलर ते सध्याचे आधूनिक थ्री डी पर्यतचा विचार करावा लागतो  .दूर्देवाने माञ हिंदीत स्थिरावलेले हे तंञज्ञान अजूनही मराठीत वापरले गेले नाही . ज्या व्यक्तीने या मोठ्या व्यवसायाची मुर्तमेठ रोवली . त्या व्यक्तीच्या मातृभ...

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्याने एप्रिल २३, २०१६

इमेज
आज २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणी पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा आज पुस्तकाचे विश्व खुप मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे अॉडीयो बूक ई बुक्स किंवा पारंपारिक छापील पुस्तके आदी प्रकारात सध्या  सध्या पुस्तके वाचायला उपल्बध आहेत पुर्वी न चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयावर सध्या पूस्तके निघत आहेत मराठीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास नॉनफिक्शन (मराठीत ज्याला ललीत साहित्य म्हणतात) पुस्तकांचे विश्व फिक्शन  ( मराठीत ज्याला वाङमय साहित्य म्हणतात )पुस्तकांपेक्षा अधिक प्रमाणात विस्तारत आहे मराठीत अॉडीयो बुक हा प्रकार अजून तरी फारसा प्रचलीत नाही असे माझे निरीक्षण आहे माझे निरीक्षण परीपूर्ण असेलच असे नाही त्याच प्रमाणे ईबुक हा प्रकार सुध्दा मराठीत स्थिरावतो आहे पुस्तकांचे विश्व खरोखरच अनभूत आहे त्यातील मजा औरच आहे अनेक प्रसिध्द व्यक्तीनी त्याचा वाटचालीत पुस्तकांचे महत्व सांगितलेलच आहे  तर पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाचा शुभेच्छा देवू...

मान्सूम

इमेज
आगामी काळात मान्सूम समाधानकारक पडेल असा अंदाज हवामानखात्याकडून व्यक्त करण्यात आलाआहे ही खरोखर आनंददायी गोष्ट आहे तसे पाहिले तर भारतीय मान्सूमवर परीणाम करणारे १७ घटक सध्या माहीती आहेत मी माहीती आहे असे म्हणतोय हे लक्षात घेणे आवश्यक आहे  माहीती नसणारे काही दुसरे घटक पण असू शकतात भारतीय मान्सूम सजण्यास  प्रचंड अवघड गोष्ट आहे सध्या एल निओ व ला निओ या घटकांविषयी प्रचंड अहापोह होत आहे माञ १७ घटकापैंकी तो एक आहे त्यावरच संपुर्ण मान्सूम अवलूंबून नाही जेट स्टीम हाही घटक सध्या काही प्रमानात  चर्चेला जात आहे अवकाळी पाऊस का पडला ? याचा विषयी आलेल्या घटकात हा घटक आपण अभ्यासला असेलच विषवव्रुतापासून दोन्ही गोलार्धात साडे तेवीस अंशापर्यत असणार्या Tropical (I am apologized to use English word in Marathi but this whole subject  I studied in English so not known  Marathi word) पट्टयात मार्च मे दरम्यान किती चक्रीवादळ होतात त्याची तीव्रता किती असते हाही घटक महत्वाचा आहे आता वर्तवलेले पावसाचे भविष्य या घटकाचा आधार घेऊनच सांगितले आहे युरोपातील आल्पस पर्वतावर किती बर्फ ...

भ फक्त आणि फक्त भाकरीचा भावनेचा कदापि नव्हे

इमेज
ध्या नागपुरी वडाभात खाणार्या काहि व्यक्तींच्या मतांमुळे मराठी जगत ढवळून निघत आहे . महाराष्ट्राच्या विभाजनासंबधी त्यांनी सांगितलेली मते काहि जणांना अप्रिय वाटत आहे . या प्रश्नाला  वाचा फोडणार्यांना अखेर त्यांना कार्यमुक्त व्हावे लागले . जे माझ्या मते अत्यंत अयोग्य आहे . माणसाला जगायला भाकरीच लागते भाव भावनांवर माणसाचे पालन पोषण माझ्या मते तरी शक्य नाहि . जर सद्यस्थितीत महाराष्ट्राचा विकास त्याचा मोठ्या  आकारामुळे होत नसेल तर त्याचे 2(विदर्भ +महाराष्ट्र ) /3(विदर्भ +मराठवाडा+ महाराष्ट्र )/4 किंवा काय पाहिजे तितके तूकडे करायला माझे समर्थन आहे . काहि लोकाच्या भावनेच्या पोटी जावून प्रदेशाचा  विकास जर थांबत असेल तर त्या भावनांना किंमत न देणेच योग्य ठरेल . मला महाराष्ट्रातील 108हूताम्यांविषयी पुरेपूर आदर आहेच . पण त्याचे भांडवल करत   एखाद्या प्रदेशाला अविकसीत म्हणून ठेवायला विरोध आहे . जर तूम्हाला महाराष्ट्र अखंडच ठेवायचा असेल तर हे प्रदेश मागे का राहिले याचा विचार करायलाच पाहिजे आणि त्यांना विकासाबाबत बरोबरीने आणणे आवश्यक आहे . जर हे शक्य नसेल तर वेगळे होण्यात गैर...

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने मार्च २१, २०१६

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो पर्यायाने हवेत गारवा टिकून रहातो ही या मागची कल्पना आहे . मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो . मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे  वृक्षांचे महत्व  आपण अनूभवू पण शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया  पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते  पुणे अधिक प्रमाणात  ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो  . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आसपास ...

लोणार मी बघीतलेले

इमेज
आजच  दिनांक 20मार्च 2016 पञ नव्हे स्मार्ट मिञ असे घोषवाक्य असणार्या एका दैनिकात लोणार विषयक लेखन वाचले अन माझे मन  लोणारला केलेल्या सहली आठवायला लागले. मी आतापर्यत 4 ते5 वेळा लोणारला गेलोय . दर वेळी लोणारला काही बदल झालेले दिसले काहि बदल सकारात्मक होते , काहि नकारात्मक होते असो मी इयत्ता आठवीत असताना सर्वप्रथम लोणारला गेलो . ते खगोल मंडळ या संस्थेमार्फत (ही पोस्ट वाचणार्रापैकी काहि लोकांना मी या संस्थेबरोबर सोमेश्वर धावत्या (धबधब्याचे छोटेरुप म्हणजे धावत्या  ) नाशिक  येथे केलेले आकाशदर्शन आठवू शकते ) नंतर परत एकदा याच संस्थेबरोबर गेलो . नंतर स्वतंञ ही गेलो . लोणारला प्रसिध्द असणार्या मुख्य सरोवराबरोबर गणेश तळे आणि अंबर तळे ही दोन छोटी सरोवरे देखील आहेत . त्याचा निर्मितीकाळ देखील मुख्य सरोवराच्या समकालीन आहे . तसेच प्रचंड मँगेंटीक पॉवर असलेली की ज्यामुळे चुंबकीय सुई देखील विचलीत होते अशी हनुमानाची उत्तर दक्षीण अशी झोपलेली मुर्ती पण लोणारचे आकर्षण आहे या मुर्तीला उभे करणे सोडाच पुर्व पश्चीम देखील कोणी करु शकत नाही भारतात  असणार्या काहि गोष्टीचा प्रचंड पगड्याम...

लोणार मी बघीतलेले

इमेज
आजच  दिनांक 20मार्च 2016 पञ नव्हे स्मार्ट मिञ असे घोषवाक्य असणार्या एका दैनिकात लोणार विषयक लेखन वाचले अन माझे मन  लोणारला केलेल्या सहली आठवायला लागले. मी आतापर्यत 4 ते5 वेळा लोणारला गेलोय . दर वेळी लोणारला काही बदल झालेले दिसले काहि बदल सकारात्मक होते , काहि नकारात्मक होते असो मी इयत्ता आठवीत असताना सर्वप्रथम लोणारला गेलो . ते खगोल मंडळ या संस्थेमार्फत (ही पोस्ट वाचणार्रापैकी काहि लोकांना मी या संस्थेबरोबर सोमेश्वर धावत्या (धबधब्याचे छोटेरुप म्हणजे धावत्या  ) नाशिक  येथे केलेले आकाशदर्शन आठवू शकते ) नंतर परत एकदा याच संस्थेबरोबर गेलो . नंतर स्वतंञ ही गेलो . लोणारला प्रसिध्द असणार्या मुख्य सरोवराबरोबर गणेश तळे आणि अंबर तळे ही दोन छोटी सरोवरे देखील आहेत . त्याचा निर्मितीकाळ देखील मुख्य सरोवराच्या समकालीन आहे . तसेच प्रचंड मँगेंटीक पॉवर असलेली की ज्यामुळे चुंबकीय सुई देखील विचलीत होते अशी हनुमानाची उत्तर दक्षीण अशी झोपलेली मुर्ती पण लोणारचे आकर्षण आहे या मुर्तीला उभे करणे सोडाच पुर्व पश्चीम देखील कोणी करु शकत नाही भारतात  असणार्या काहि गोष्टीचा प्रचंड पगड्या...