पोस्ट्स

आरामदायी आसने

 आरामदायी प्रवासासाठी प्रवासात कोणत्या प्रकारची व्यवस्था असावी असे आपणास वाटते मी वारंवार प्रवास करतो त्यामुळे माझया अनूभवांचा   आपणास फायदा होईल असे मला वाटल्याने खास तूमच्यासाठी हे लेखन माझया मते जर आपणास योग्य सीट मिळाल्यास   कितीही लांबचा प्रवास असला तरी तो सुखकर होतो हा त्यामूळे   योग्य सीट मिळायलाच हवी एसी वगैरे गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत माझया मते चांगल्या सीट मध्ये पूढील गुणधर्म असायला हवे सीटची जमिनीपासूनची योग्य उंची साधरण्‍ स्थीतीत   बसलो असता पाय सरळ कुठेही बाक न येता सरळ जमिनीला लागल्यास त्यास योग्य उंची म्हणता   येइल   सीटची लांबी आपल्या मांडी पेक्षा एक एक वित जास्त्‍ असावी सीटचा खोलगटपण आपल्याला सोइचा ठरेल अशा असावा जास्त्‍ असल्यास आपल्या मांडीला गरसोइचे वाटू शकते

भारताची प्रगती

सध्या भारताची प्रगती झाली की  नाही यावर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत . त्यासाठी विविध देशांचा  दाखल देण्यात येतोय . अमुक देशाने इतक्या वेळात प्रगती केली भारत अजून या समस्येशी लढतोय  मला त्यांना सांगावीशी वाटते की प्रत्येक देशाची प्रगती मोजण्यासाठी एकाच परिणाम लावणे चुकीचे आहे. प्रत्येक देशाची आव्हाने वेगवेगळी असतात , प्राप्र्त नैसर्गिक संसाधने भिन्न असतात . त्यामुळे सिंगापूरच्या शासनकर्त्यांनी दहा वर्षात  देशाची प्रगती केली भारतातील शासनकर्त्यांनी फक्त स्वतःची तुंबडी भरली या विधानाला माझ्यामते काही अर्थ नसतो . सिंगापूर मध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार नाहीत चीन मध्ये लोकशाहीचे हक्क नाहीत . सिंगापूर चे अन्य देशांनी ज्यात त्यांचा जनक  देश मलेशियाशी सुद्धा तंटा नाहीये . इस्राईल ला अमेकरीक प्रचंड मदत करते मात्र आपण अणुस्फोट केल्यावर हीच अमेरिका आपल्यावर प्रचंड बंधने लादते हि गोष्ट मात्र या लोकांकडून दुर्लक्षिली जातेय . भारताची वाटचाल बघताना आफ्रिकी देश किंवा पाकिस्तान अथवा बांगलादेश यांच्या स्थितीकडे मात्र या लोकांचे दुर्लक्ष होते . 

काय फरक पडीतो बुवा

इमेज
नुकताच मी पुणे ते नाशिक प्रवास महाराष्ट्राच्या एशियाड प्रकारच्या बसने केला . त्याचे 365 रुपये इतके भाडे होते. मी या आधी एका ब्लाँग पोस्टमध्ये नाशिक पुणे साध्या गाडीचे भाडे 271 असल्याचा  उल्लेख केल्या असल्याचे आपणास स्मरत असेलच. प्रवाशादरम्यान  मला अनुभवयास आलेल्या अनुभवाचे कथन करण्यासाठी हा लेखनप्रंपंच  मलातरी एशियाड आणि सध्याची सुधारीत लालपरी अर्थात परीवर्तन मध्ये फारसा फरक जाणवलेला नाही. मात्र या दोघांमध्ये तब्बल 94 रुपयाचा फरक आहे. 1984 साली नवी दिल्ली येथे भरलेल्या एशियाड खेळाच्या पाश्वभुमीवर जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्र परीवहन महामंडळाकडून देशाला आरामदायी प्रवासासाठी एशियाड या सेवेची ओळख करुन देण्यात आली. त्या वेळेस साधी गाडी आणि या आरामदायी सेवेमध्ये फरक असेलही  मात्र त्या नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय . सध्या पुर्वीच्या लाल डब्यात लांक्षणीय सुधारणा झाल्या आहेत . त्यामुळे पुर्वीच्या दर्जातील तफावत खुप प्रमाणात कमी झालीये . मात्र भाड्यातील तफावत तशीच राहलीये . ती कमी व्हायवास हवी . असे मला वाटते .आपणास काय वाटते ?

माझ्या गुजरातच्या एस टी प्रवासाची हकिकत

नुकताच मी आरक्षण करुन गुजरात राज्य परीवहन महामंडळाच्या बसने नाशिकहून पुण्याला प्रवास केला . या दरम्यान आलेले अनुभव तूम्हाला सांगण्यासाठी हे लेखन. मला GSRTCची आवडलेली गोष्ट म्हणजे बस ट्रँकिंग प्रणाली . गुजरातच्या सर्व बसेसवर जि पी आर एस बसवलेले आहेत . त्यामुळे GSRTCच्या अँप्लीकेशनमध्ये तूमचा पि आर एन अथवा बस क्रमांक टाकला की तूमची बस कुठे आहे हे समजते . जी सुविधा मला तरी आपल्या एस टी मध्ये आढळत नाही .   माझे निरीक्षण अपुर्ण असल्यास सांगावे मला आनंदच होईल. मी मध्ये गाडी ब्रेकफास्टसाठी थांबली असता डायव्हरांबरोबर प्रवासी भाड्याचा विषय काढला असता त्यांनी सांगीतलेल्या उत्तरामुळे मी अनुत्तरीतत झालोय .ते म्हणाले तूम्ही गूजरात राज्यात अत्यंत स्वस्त फिरु शकतात. मात्र महाराष्ट्रात आम्हाला तूमच्य बरोबर दर ठेवावे लागतात. मागच्या वेळेस तूम्ही 225 रुपयात प्रवास केला आता 270 रुपये लागतात याला तूमचे प्रशासन जवाबदार आहे . तूम्हाला काय वाटते यावर ?

नव्या मराठी वाहिनीच्या निमित्याने

१९ ऑगस्ट पासून मराठीत एक नविन वाहिनी सुरु होत आहे, सोनी मराठी नावाची. त्यामुळे काही जणांना वाटू शकतंय किती या वाहिन्या . त्यांना वस्तुस्थितीती सांगण्यासाठी हा लेखप्रपंच .  भारतात  खूप वाहिन्या  असल्या तरी वस्तूस्थिती तशी नाहीये . भारतात १० ते १२ कंपन्यांकडून हि चॅनेल्स चालवली जातात  जसे एन डि टिव्ही गृप कडून चार वाहिन्या चालवल्या जाते .जर प्रत्येक कंपनी एकच वाहिनी दाखवते असे मानले तर  ते बारा चँनेलस् दिसू  शकतील 

युगांन्त अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

इमेज
2018 सालच्या आँगस्ट महिन्याची 16 तारीख भारतीय राजकारणात ठळकपणे नोंदवली गेलीये .या दिवशी भारतीय राजकारणात एका युगाचा अंत झालायं . माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा निधनाने भारतीय राजकारणाची कधीही भरुन न येणारी हानी झालीयं. भारतीय राजकारणातले अजातशत्रू म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच नाव घ्यावच लागेल.1978 साली जनता पार्टीच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत असणारे अटलजी पुढे तीनदा देशाचे पंतप्रधान झाले . कवीमनचा या पंतप्रधानाने ही भुमीका अत्यंत चोख बजावरली. सध्या पंतप्रधानपदी आरुढ असणाऱ्या तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना अर्थात नरेद्र मोदी यांना गुजरातच्या दंगलीबाबत खडे बोल यांनीच सुनावले होते. पाकीस्तानशी लाहोर करार , कारगील युध्द , संसदेवर हल्ला , आय सी 814 या विमानाचे अपहरण, पोखरणचा अणूस्फोट याकाही  त्यांच्या  कार्ळयकाळातील प्रमुख घटना . भाजपाची वाटचाल दोन खासदारापासून सत्ता स्थापनेपर्यत झाली यात त्यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे . युनाटेड नेशनमध्ये त्यांनी हिंदीत केलेले भाषण गाजले.त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचीच एक कविता  ठन गई! ...

मानवी भूगोलाच्या निकषावर भारताची प्रगती आणि मी

इमेज
                सध्या भारताच्या प्रगतीविषयी विविध दावे केले जातंय . त्यातही बहुसंख्य  ठिकाणी पक्षीय राजकारण केलं जातंय . त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मान्य  होईल अश्या मार्गाचा विचार केला असता शात्राचा विचार करणे संयुक्तिक  होईल असे वाटून मी हा लेखन प्रपंच करत आहे .  " मानवी भुगोल" या भुगोलाचा उपशाखेच्या सिध्दांतांवर भारताच्या प्रगतीचे मुल्यमापन केल्यास भारताच्या प्रगतीचे खरेचित्र समोर येते. असे मला वाटत असल्याने त्यावर मी केलेले हे विवेचन आहे.             मानवी भूगोलाची उपशाखा असलेल्या लोकसंख्या भूगोलाच्या लोकसंख्या सिद्धान्तानुसार लोकसंख्या वाढीचे ५  टप्पे असतात . पहिल्या टप्यात खूप लोक जन्माला येतात आणि तितकेच लोक विविध आजारांनी मृत होत असतात. दुसऱ्या टप्यात देशाची स्थिती सुधारली असल्याने   कमी लोक साथीच्या आणि अन्य रोगांनी मारतात  मात्र जन्माला अधिक लोक येतात परिणामी देशाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते देशाच्या साधन संपत्तीवर प्रचंड ताण येत...