पोस्ट्स

स्मरण जग बदलणाऱ्या त्या तीन दिवस तीन .रात्रीचे

इमेज
               भारतातील कोणत्याही राज्यातील रहिवासी असो, स्वामी विवेकांनद यांचे नाव ऐकताच नतमस्तक होतोच . स्वामी विवेकानंद यांचे शिकागो , येथील सुप्रसिद्ध भाषण त्याला मिळालेला प्रतिसाद याविषयी प्रत्येकाने कधीना कधी ऐकले असतेच कन्याकुमारी येथील शिलास्मारकाला पण आपल्यापैकी अनेकांनी भेट दिली असेल . स्वामी विवेकांनदानी आपल्या पारिजावर्क अवस्थेत असताना भेट दिलेल्या अखेरच्या काही ठिकाणांपैकी एक असणाऱ्या कन्याकुमारी येथे त्यांनी दिन दिवस तीन रात्र ध्यान केले होते . हे ध्यान करत असतानाच त्यांना , अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत जाण्याविषयी , त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या दृष्टांत झाला , अशी आख्यायिका सांगण्यात येते . स्वामी विवेकांनद यांनी हे ध्यान 25 ते 27 डिसेंबर 1892रोजी केले होते . या 2019 ला या घटनेला 127वर्षे पूर्ण होईल . ध्यानात स्वामी विवेकानंदाना आपले कार्य  कोणत्या दिशेने   नेता येईल , असे समजले आणि त्यांनी सेवा कार्यासाठी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केली .  या ध्यानाच्या आधी त्यांनी समस्त  भारतातील परि...

द्वितीय दशकपुर्ती विमान अपहरणाची

इमेज
        प्रत्येक माणसाच्या आणि देशाच्या वाटचालीत काही कटू दुःखद प्रसंग येतच असतात . आपल्या भारताच्या वाटचालीत सुद्धा आजपासून वीस वर्षांपूर्वी असाच  कटू प्रसंग आला होता , तो होता इंडियन एअरलाईन्स या कंपनीच्या आयसी 814 या काठमांडू ते दिल्ली येथे जाणाऱ्या विमानाचे लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेले अपहरण हा होय . . यामध्ये रुपेण कटियाल या प्रवासाचा बळी गेला आणि आपण आपल्या तुरुंगात असलेल्या हाफिज सय्यद या दहशतवाद्याला सोडून दिले . याच हाफिज सय्यद याने पुढे भारतीय संसदेवर हल्ल्याची योजना आखली . सुदैवाने त्या  नंतर आपल्या एकाही विमानाचे अपहरण झालेले नाही . त्या वेळेस केंद्रात माननीय अटलबिहारी यांचे सरकार होते .               काठमांडू  येथून 24 डिसेंबर1999 ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण भरलेल्या या विमानाचे अपहरण करण्यात आले होते . यातील प्रवाशी सात दिवसांनी दिल्लीत परतले . आपण बाजूच्या नकाश्यात याचा मार्ग बघू शकतात . यातील काळ्या ठिपक्याच्या स्वरूपात जो मार्ग दिसत आहे तो...

शताब्दी अग्रलेख आणि कायद्याची

इमेज
            आज 23 डिसेंबर 2019 ,आजच्याच दिवशी 100 वर्षापुर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 1919ला भारतात एक वादळ उठले होते, या वादळाचे नाव होते माँटेग्स्यु -चेम्सफर्ड लाँ . याच कायद्याविरोधात लोकमान्य टिळकांनी त्यांचा "उजाडले पण सुर्य कुठे आहे " हा सुप्रसिद्ध अग्रलेख लिहला होता .त्या घटनेला आज 100 वर्ष पुर्ण होउन 101वे वर्ष सुरु झाले . मित्रांनो ही एक ऐतिहासिक घटना आहे .मात्र या घटनेची म्हणावी अशी    दखल घेण्यात आली नाही ,असे माझे निरीक्षण आहे, असो                 सन 1909 मध्ये  भारतीय नागरीकांना घटनेचा सुधारीत भाग दर दहा वर्षांनी देण्याचे ठरले त्यानुसार देण्यात आलेल्या या सुधारणा .पहिल्यांदा  देण्यात आल्या त्या मार्ले मिंटो सुधारणा .नंतरचा सुधारणा या माँटेक्स्यु चेस्मफर्ड सुधारणा त्यातील माँंटेक्स्यु हा भारतमंत्री तर चेस्मफर्ड हा व्हाँइसराँय होता .या दोघांनी एकत्रीत केलेला सुधारणेचा मसुदा म्हणजे माँटेक्स्यु चेमस्फर्ड सुधारणा . या नंतर देण्यात आलेल्या सुधारणा म्हणजे सायमन कमिशन .       ...

वादगस्त पर्वाची अखेर? (डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छती भाग 3)

इमेज
                 नुकतेच अमेरीकेन काँग्रेसच्या हाउस आँफ रिप्रेझेनटेटिव्ह या सभागृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव संमत करण्यात आला , आणि पुढील कार्यवाहीसाठी सिनेटमध्ये पाठवण्यात आला . डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खरोखरच महाभियोग होतो का? की या आधी तिनदा ज्या प्रकारे महाभियोगाचा प्रस्ताव मतदानाचा टप्यावर बारगळला त्याच प्रकारे बारगळतो ?हे आपणास लवकरच समजेल .मला आपले लक्ष वेधून घ्यायचे आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा आतापर्यतचा कारकिर्दीवर                   डेमोक्रेटीक पक्षाच्या बराक ओबामा यांची मुदत संपल्यावर 2016 साली झालेल्या अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमोक्रेटीक पक्षाच्या  हिलरी क्लिंटन यांना पराभुत  करुन अमेरीकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टिचे  डोनाल्ड ट्रम्प हेे निवडून आले .  आणि एका वादगस्त पर्वाला सुरवात झाली.        मुळात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडीच्या सदोष प्रणालीमुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध...

स्वागत उत्तरायणचे

इमेज
           आपल्या भारतात काही कालावधी अत्यंत महत्वाचे समजले जातात. उत्तरायण हा अशाच महत्वाचा कालावधी म्हणजे उत्तरायण . .जो रविवार 22डिसेंबर 2019 पासून 22 जून 2020 पर्यंत असेल मित्रानो हा कालावधी सूर्याचा भासमान भ्रमणामुळे निर्माण होणारा एक भौगोलिक चमत्कार आहे  पृथ्वी सूर्याभोवती फिरते , हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान . सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो . मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात . आपण शेजारील चित्रात तो बघू शकतात .  या भासमान भ्रमणात सूर्य  जेव्हा त्याच्या डाव्या  हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो . ज्या बिंदूपासून तो परत    उजवीकडे भासमान भ्रमण सुरु करतो तो दिवस म्हणजे उत्तरायण सुरु होण्याचा दिवस जो  या वर्षी रविवार 22डिसेंबर 2019  रोजी आहे . ...

सृष्टीचा विलोभनीय चमत्कार सूर्यग्रहण

इमेज
         मित्रानो , येत्या गुरुवारी अर्थात 26 डिसेंबर 2019 ला आपल्या भारतात सृष्टीचा विलोभनीय चमत्कार  अर्थात सूर्यग्रहण होणार आहे .  हे ग्रहण कोणत्या प्रदेशात दिसणार आहे . हे आपण बाजूच्या नकाश्यात बघू शकता . मित्रानो हे  ग्रहण भारतातील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा अपवाद वगळता सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे . तर केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती दिसणार आहे त्यामुळे पूर्ण सूर्यग्रहणात दिसते , त्या प्रकारचे नाट्य या वेळी दिसणार नसले तरी हा सृष्टीचा चमत्कार  आपण बघायलाच हवा . मात्र चंद्रग्रहण आपण ज्या प्रकारे उघड्या डोळ्याने बघू शकतो . तसे ना होता , योग्य ती काळजी घेऊन अर्थात विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरून हे नाट्य बघायला हवे . जर उघड्या डोळ्याने बघितल्यास डोळ्याला जबर हानी होऊ शकते                                            हे नाट्य सुरु होईल, भारतीय   प्रमाणवेळेनुसार सकाळी 8वाजून 4 मिनिटांनी,  तर ...

टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण ? सायरस मिस्त्री की अन्य कोणी ?

इमेज
                           सध्या देशाचा पूर्व भाग नागरिकत्वाचा विधेयकावरून आणि गुजरात राज्य,  गुजरात लोकसेवा आयोगाचा कार्यप्रणालीमुळे धुमसत असतान,   भारतालीच नव्हे तर जगातील एक मोठा उद्योगसमूह असणारा टाटा उद्योगसमूहाच्या उत्तराधिकाऱ्यांच्या बाबतीत आलेल्या एका बातमीने भारताच्या आर्थिक विश्वात नव्याने वादळाला प्रारंभ केला . ही बातमी होती टाटा उद्योगसमूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा एकदा सायरस मिस्त्री यांची नेमणूक करण्याचा नॅशनल कंपनी लॉ अँप्लिकेन्ट ट्रिब्यूनन  ने दिलेला निर्णय . यामुळे   टाटा उद्योगसमूहातील  सन 2016पासून सुरु असलेल्या   वादाने नवीन वळण घेतले आहे .                                                                         मित्रानो मिठापासून ते  सोने, ...