पोस्ट्स

आपल्या शेजारी हे घडत आहे.

इमेज
आपल्या मराठी वृत्तवाहिन्या विविध ख्यातनाम लोकांच्या घराची दिवाळी दाखवत असताना आपल्या भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तानातील गिलगीट बाल्टीस्तान या भागात रविवार 15नोव्हेंबरला विधीमंडळाच्या निवडणूका होत आहे.  गेल्या काही दिवसांपर्यत प्रशासकीय रचनेनूसार हा प्रदेश केंद्राच्या नियंत्रणाखालील प्रदेश होता (गेल्या काही वर्षापर्यत  पाकिस्तानात केंद्राच्या नियंत्रणात दोन भाग होते. एक हा ज्याला आता आतापर्यत फेडरली अँडमिस्टेटीव्ह नाँर्दन एरीया {संक्षिप्तरुप फाना } म्हणत तर दुसरा म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरचा फेडरली अँडमिस्टेटीव्ह ट्रायबल एरीया {संक्षिप्तरुप फाटा } हा होता, जो काही वर्षापुर्वी खैबर ए पश्तूनवा{वायव्य सरहद्द प्रांत} यात विलीन केला) त्याला पाकिस्तानी संसदेने प्रांत {प्रांत आणि राज्य यात राजशास्त्रादृष्ट्या काही फरक आहेत. प्रांताला राज्याचा तूलनेत कायदेशी अधीकार कमी असतात. मात्र रचना 90ते95% सारखीच असते)म्हणून मान्यता दिल्यावर पहिल्यांंदा या निवडणूका होत आहेत. तेथील प्रांतीय विधीमंडळाची एकूण सदस्य संख्या 33आहे , त्यापैकी 9सदस्य केंद्रातून नियुक्त केले जातात तर 24सदस...

लक्ष्मी पुजन विशेष

इमेज
आज दिवाळीचा   तिसरा दिवस . दिवाळीचा पाच दिवसांपैकी सर्वात महत्तवाचा दिवस अर्थात लक्ष्मी पुजन . या दिवशी आबालवृद्ध   धनाची देवी अर्थात लक्ष्मीची पुजा करतात . या   दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके उडवून आनंद साजरा करण्याची प्रथा आहे . सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे ; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे . हा दिवस शुभ मानला आहे ; पण तो सर्व कामांना नाही ; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात . आम्हाला समृध्द करणारी दिव्यता , ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे . भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते . घर असो किंवा कार्यालय …. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे . लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते . दिवाळीचा सण मोठा , नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण म...

नरक चतूर्दशी विशेष

इमेज
     आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात नरक चतूर्दशी . आजच्या दिवशी पहाटे लवकर  सुर्योदयापुर्वी उठून सुवासिक उठणे तेल आदी लावून स्नान करण्याची प्रथा आहे .आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या  नरकासुराचा वध केला , अशी आख्याईका आहे या बाबत श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे की                प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला , ‘ आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील , त्याला नरकाची पीडा होऊ नये. ’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्व...

नमन आधुनिक भारताच्या निर्मात्याला

इमेज
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक भारताची उभारणी करण्याचे शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलले , अश्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वांपैकी एक असणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 14नोव्हेंबर ही जयंती, त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र आदरांजली. 1947च्या सुमारास एखाद दोन वर्षे मागे पुढे  जगभरातील 90 हुन अधिक देश पारतंत्रातून स्वतंत्र झाले, त्या देशातील आजची स्थिती आणि भारताची सद्यस्थिती याचा मागोवा घेतल्यास आपणास पंडीत नेहरु यांचे योगदान लक्षात येते. भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी अनेक ब्रिटीश आणि पाश्चात्य विचारवंतांनी भारताच्या भवितव्याबाबत अत्यंत प्रतीकुल मते व्यक्त केली होती. ती मते खोटी ठरवली गेली, ती पंडीत नेहरुंमुळेच. एखाद्या वर्गात जर 60 विद्यार्थी असतील, तर वर्गातील सर्वच विद्यार्थी  पहिल्या क्रमांकावर उतीर्ण होत नाही, एखाद दुसराच पहिलाच क्रमांकाने उतीर्ण होतो, मात्र यामुळे पंधरा अथवा विसाव्या क्रमांकाने उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला कमी लेखणे चूकीचे असते. तसेच भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांचे आहे. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांपैकी काही देश प्रगतीबाबत भ...

धनत्रयोदशी विशेष

इमेज
बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात , ज्याच्या बाबतीत दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा ,असे म्हटले जाते , त्या दिवाळीचा आज पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी . त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवशी वैद्यकशास्त्राची देवता असलेल्या धन्वंतरीची पुजा करुन आपल्या चांगल्या आरोग्याची मनोकामना केली जाते. धन्वंतरीकडे ,दिर्घायूसाठी प्रार्थना केली जाते .काही समाज घटकात आज धनाची देवता असणाऱ्या कुबेराचे पुजन केले जाते.  दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्यौेकी एक म्हणजे  या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा, राणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही. तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो. त्यावेळी यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने-चांदी, मोहरांनी त्यांचे ड...

भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकणारी रेल्वे

इमेज
आपल्या अजस्त्र असणाऱ्या भारतीय रेल्वेत सध्या अनेक बदल होत आहेत. हे आपण जाणतातच त्यातील काही बदल सकारात्मक  स्वरुपाचे आहेत . तर काहींना काहीसी नकारात्मक छटा आहे. हेही आपणास ज्ञात असेलच . याच सकारात्मक आणि नकारात्मक बदलाच्या खेळात दोन महत्तपुर्ण बदल भारतीय रेल्वेत नुकतेच झाले. अन्य बातम्यांमध्ये मुख्य धारेतील माध्यमे गुंतून गेली असल्यामुळे त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. मात्र हे बदल सगळ्यांना माहिती असणे आवश्यक असल्याने ते सांगण्यासाठी आजचे लेखन सर्व प्रथम नकारात्मक छटा असणारे लेखन बघूया . तर मित्रांनो, भारतीय रेल्वेच्या 16 उपकंपन्या आहेत. (या उप कंपन्याची माहिती या आधी 2ब्लाँग पोस्टद्वारे शेअर केली आहेच. ज्यांना ती परत वाचायची त्यांचासाठी या लेखाच्या खाली त्याचा लिंक परत देत आहे.) त्यातील एक महत्त्वाची उपकंपनी म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेड होय. RVNL  ही  उपकंपनी रेल्वे संरचनेची क्षमता तयार करणे आणि वाढविणे. बहुपक्षीय / द्विपक्षीय निधी संस्थांच्या माध्यमातून आणि प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी घरगुती मार्केटद्वारे संसाधने एकत्रित करणे, यासाठी 2003 साली स्थापन करण्यात ...

भारताचा इतर देशात डंका

इमेज
                         सध्या आपल्या भारतातील मुख्य धारेतील माध्यमे अनेक काहिस्या निरुपद्रवी, मुद्यांवर चर्चेची गुऱ्हाळे चालवत असताना,समस्त भारतीयांची मान गर्वाने ताठ व्हावी , अस्या दोन घटना घडल्या. त्याविषयी पारंपारीक माध्यमांमध्ये फारसी चर्चा न झाल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                  तर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने मोक्याचा ठिकाणी वसलेल्या आणि सन 2008 पासून चीन ज्या क्षेत्रात विविध गोष्टींमार्फत आपले अस्तिव दाखवून देत आहे, अस्या लाल समुद्र आणि एडनच्या आखात तसेच अरबी समुद्र  यांच्या मध्ये नकाश्यामध्ये  गेड्यांचा शिंगाप्रमाणे भासणाऱ्या  भुप्रदेशातील अर्थात हाँन आँफ आफ्रिका या भागातील नागरीकांना  भारताच्या नौदलामार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली.भारतीय नौदलाच्या आय एन एस ऐरावत या जहाजामार्फत हाँन आँफ आफ्रिका भागातील नागरीकांना 155 मेट्रीक टन गव्हाचे पीठ, 65 मेट्रीक टन तांदूळ आणि 50 मेट्रीक टन साखर असा एकदंरीत 270 मेट्रीक टन अन्नसाठा नु...