पोस्ट्स

वंदन महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला !

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच सर्वांची छाती महाराष्ट्रीयन छाती छाती गर्वाने फुलूनयेते  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्य सर्वाना मनःपूर्वक खूप खूप  शुभेच्छा      तेराव्या शतकात यादवी साम्राज्य लयास गेल्यावर सुमारे साडेतीनशे वर्ष स्वतःचे सत्व विसरलेल्या समाजास गतवैभवाची आठवण त्यांनी करुन दिली .त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत , मध्ययुगीन भारतीय ईतीहासातील आरमार उभारणारा एकमेव राज्यकर्ता हा बहुमान देखील मिळवला . राजेंखेरीज समुद्रापर्यत आपले राज्य नेणारे काही राज्यकर्ते आपणास मध्ययुगात सापडतात. मात्र आरमार उभारले ते छत्रपती शिवाजी  महाराजांनी .अजमल कसाब आणि मार्च 1993 च्या स्फोटामुळे समुद्राचा धोका आपणास लक्षात आलाच आहे .  भविष्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी होती . छञपती शिवाजी महाराजांनी हे टोपीवाले दिसतात तेव्हढे साधे नाहीत त्यांचापासून जपून राहिले पाहिजे ,असे इंग्रजांबाबत मत व्यक्त केले होते. आणि या पुढील काळात हल्ले समुद्रामार्गे होतील तिही सिध्दता आपण करायला पाहिजे असेही मत व्यक्त केले होते .इंग्रजांनी केलेले नुकसान सर्वश्रुत आह...

मी बघीतलेला बदलता ग्रामीण महाराष्ट्र

इमेज
      मनुष्याला अनुभवातून, प्रत्यक्ष बघून जे ज्ञान होते. ते शंभर पुस्तके वाचून होणाऱ्या ज्ञानापेक्षा कैकपटीने उत्तम असते, असे आपणाकडे म्हटले जाते.याचा अनुभव मी नूकताच 14 फेब्रुवारीरोजी केलेल्या नाशिक ठाणे प्रवासादरम्यान घेतला. तो आपणापर्यत पोहोचवून आपणास देखील त्यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी आजचे लेखन .     तर मित्रांनो, गेल्या रविवारी 14 फेब्रुवारी रोजी मी फिरण्याचा उद्द्येश्याने नाशिक -जव्हार - भिवंडी -ठाणे - इगतपूरी -नाशिक असा एसटीने चक्री मार्गाने प्रवास केला. या सबंध प्रवासात रस्ता छोटा असो अथवा मोठा असो तूरळक अपवाद वगळता सर्व रस्ते खड्डे विरहीत होते. अगदी मोखाडा, वाडा, या आदीवासी समजल्या जाणाऱ्या भागातील रस्तेसुद्धा खड्डेविरहीत होते. तसेच पुर्वी या भागातील ज्या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत असे, त्या ठिकाणी जसे, भिवंडी शहर , कल्याण फाटा आदी सर्व ठिकाणी मुंबई महानगर विकास प्राधीकरण (MMRDA) च्या माध्यमातून उड्डाणपूल बांधून नागरीकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली आहे. ज्यामुळे वाहतूक सुद्धा जलद झाली आहे. जलद वाहतूक झाल्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होत आहे, हे नाकार...

महाराष्ट्र एस टी जिंदाबाद !

इमेज
      दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मी जव्हार मार्गे नाशिक ते ठाणे प्रवास केला . या प्रवासादरम्यान मला नव्याने जाणवलेल्या  सर्वसामान्यांप्रती असणाऱ्या आपल्या एसटीच्या बांधिलकीवर  प्रकाश टाकण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो, आपल्या एसटीचे अनेक मार्ग हे कोणत्याही व्यवसाईक गणिताचा विचार न करता निव्वळ लोककल्याणाचा हेतूने आखलेले असतात. अन्य खासगी वाहतूकदार ज्या मार्गाने कधीही सेवा देणार नाही. अस्या मार्गावर देखील आपली एसटी सेवा देते. जसे  नाशिकच्या ठक्कर बझार स्टँडहुन दुपारी दोन वाजता सुटणारी नाशिकहुन ठाण्याला मोखाडा वाडा मार्गे जाणारी बससेवा होय. गरीबातील गरीब देखील नाशिकहुन ठाण्याला जाण्यासाठी ही बससेवा वापरणार नाही. शहराच्या व्यक्तींना जवळच्या खेड्यात जाण्यासाठी किंवा खेड्यातील व्यक्तींना जवळच्या शहरात येण्यासाठी या प्रकारची सेवा वापरली जाणार , हे निश्चित .या प्रवासात जव्हार या ठिकाणी मी बसस्टँडवर बघीतलेली जव्हार -कसारा- मोखाडा ही सेवा देखील याच प्रकारात मोडणारी .जर आपण नकाशा बघीतला तर मोखाड्याहून जव्हारला सरळ रस्ता आहे. मात्र वाट वाकडी ...

दादासाहेब फाळके एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व!

इमेज
             आज 2021 फेब्रुवारी 16 अर्थात भारताच्या चित्रपटश्रुष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा 75वा स्मृती दिन . त्यानिमित्ताने आज अब्जावधीची उलाढाल करणाऱ्या भारतीय चित्रपटश्रुष्टीच्या जन्मदात्यास विनम्र आदरांजली.            समाजात कोणतीही नविन गोष्ट रुजवणे कधीही कठीणच असते, मात्र एकदा रुजली की तीची वाढ होण्यास तितकासा त्रास होत नाही. हा निसर्गाचा नियम भारतीय चित्रपटश्रुष्टीला देखील लागू होतोच. त्यामुळे दादासाहेब फाळकेंना भारतात ही कला रुजवण्यासाठी प्रचंड कष्ठ घ्यावे लागले. त्यांना या नविन कलेबाबत लोकांनी नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडले. त्यांचाबरोबर काम करण्यास नकार दिला, जे आपण हरीश्चंद्राची फँक्टरी या चित्रपटात बघीतले आहेच.  त्र्यंबकेश्वर सारख्या आजही धार्मिक कार्यासाठी विख्यात असणाऱ्या आणि क्षेत्रफळाचा विचार करता जेमतेम असणाऱ्या गावात त्यांचा जन्म झाला होता, ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही. एखाद्या मोठ्या महानगरातील व्यक्तीने भारतीय चित्रपटश्रुष्टीची निर्मिती  केलेली नाही. तर आजही प्रचंड धार्मिक पगडा असणाऱ...

जीना इसीका नाम है!

इमेज
          आज सकाळीच गोष्ट आहे. सकाळी एके ठिकाणी चहा पित असताना एका जून्या हिंदी चित्रपटाची धून कानावर ऐकू आली." जिना इसिका नाम है!" आयुष्य कसे जगावे हे सांगणारे हे गाणे असेच या गाण्याच्या बाबतीत म्हणावे लागेल .      राज कपूर यांच्या अनारी या 1959 साली आलेल्या चित्रपटातील मुकेश यांंनी  गायलेले हे गाणे. ललीता पवार  आणि शोभा खोटे या मराठमोळ्या अभिनेत्रींनी काम केलेला हा चित्रपट मुकेश यांनी त्यांचा कारकिर्दीत जी दुःखी भावनेच्या व्यतिरीक्त जी गाणे गायली त्या पैकी एक असणारे हे गाणे. ज्याला शंकर जयकिसन यांनी संगीत दिलेल्या या गीताचे बोल शैलेंद्र यांचे होते. स्वतःच्या दुःखांंना कुरवाळत बसण्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात आनंद झटण्यातच खरा आनंद आहे, हा अत्यंत महत्तवाचा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे.            गाण्यामध्ये नायकाकडे पैसे नसतात मात्र तो भिकाऱ्याला आनंद देतो, त्यामुळे तो भिकारीच स्वखुशीने त्याला त्याचाकडचे पैसे देतो. मात्र थोड्या वेळाने त्याला एका अंधभिकाऱ्याला रस्त्याने जाताना एका वेगाने जाणाऱ्या ...

11 वर्षापूर्वीची भळभळती जखम

इमेज
     आजपासून 11 वर्षापुर्वीची गोष्ट आहे. स्थळ पुणे कँम्प परीसरातील जर्मन बेकरी नामक शंभर वर्षाहुन अधिक काळ जूनी असणारी प्रसिद्ध  बेकरी. वेळ सायंकाळी साडेसातची . वीक एंड असल्याने तरुणाईच्या गर्दीने बेकरी भरलेली. अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसतान बेकरीच्या एका आसानाखालील एका वस्तूचा अर्थात बाँम्बचा स्फोट झाला.  ज्यामध्ये पुण्यामध्ये शिकायला आलेल्या बंगाल राज्यातील विद््यया नागरीकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर काही ज्युधर्मीय आणि काही स्थानिक नागरीक जखमी झाले. आणि पुण्याची नोंद सुद्धा  दहशतवादी हल्ला झालेल्या शहरात झाली.या दहशतवादी हल्ल्याला आपण  आज जर्मन बेकरी बाँम्फस्फोट म्हणून ओळखतो.आज या घटनेला 11 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या घटनेत आप्तेष्ट गमवलेल्या, अथवा शाररीक आर्थिक नुकसान झालेल्या सर्वांचा दुःखाप्रकरणी  ह्रुद्यापासून संवेदना.  हा दहशतवादी हल्ला इंंडीयन मुुहाजदीन या दहशतवादी संघटनेतर्फे करण्यात आला होता. यातील  तळातले गुन्हेगार पकडले गेले, त्यांना शिक्षाही झाल्या. मात्र या कटाचे मुख्य सुत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहे. त्या दोषीं...

जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या घटनेनंतरची 42 वर्षे!

इमेज
   आज 2021 फेब्रुवारी 11 अर्थात .जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या इराणच्या सुप्रसिद्ध क्रांतीला 42 वर्षे पुर्ण होण्याचा दिवस .आजच्याच दिवशी 42वर्षापुर्वी अर्थात 1979 फेब्रुवारी 11 रोजी इराणमध्ये सुप्रसिद्ध खोमोनी क्रांती झाली. याच वर्षी सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले, ज्याची किंमत आज देखील अफगाणिस्तान भोगतोय.असो.       आधुनिक मुल्यांवरील इराणची पायाभरणीचे स्वप्न घेवून त्याप्रमाणे सन 1961 पासून वाटचाल करणाऱ्या तत्कालीन इराणचे राजे शाह मोहमद्द  यांची सत्ता उलथवून टाकत , रुढिवादी धार्मिक विचारांचा प्रभाव असणारी राजवट ज्या दिवश्यापासून इराणमध्ये सुरु झाली, तो म्हणजे 1979 फेब्रुवारी 11. ज्याला आज 42 वर्षे पुर्ण होत आहे.त्यावेळच्या सरकारच्या काही धोरणांमुळे समाजात बेरोजगारी , आर्थिक विषमता वाढणे, या दोषांबरोबरच  इराणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदा अमेरीका देश घेत आहे. इराणला त्याचा काही फायदा होत नाही  तसेच आपण अमेरीकेचे गुलाम आहोत अशी भावना निर्माण झाली.ज्याचा फायदा तत्कालीन सरकारच्या विरोधात असणाऱ्या कट्टर मानसिकतेच्या लोकांन...