पोस्ट्स

यस्टी@74

इमेज
      येत्या मंगळवारी 1जून रोजी आपली महाराष्टाची एसटी 73 वर्षे पुर्ण करुन74 व्या वर्षात पदार्पण करत आहे.त्याबद्दल समस्त एसटी प्रेमीचे मनापासून अभिनंदन .         देशात सार्वजनिक वाहतूकीची रेल्वे वगळता, अन्य कोणतीही व्यवस्था नसताना, नुकत्याच स्वतंत्र्य झालेल्या भारतात सार्वजनिक बससेवेची मुहुर्तमेढ रोवली गेली .ती आपल्या एसटी मार्फत . आपली एसटी सुरु होवून 8वर्षे पुर्ण झाल्यावर केंद्र सरकारकडून देशासाठी  1956 साली सार्वजनिक मोटार वाहतूक नियमन कायदा अस्तिवात आला. 1948 ला त्यावेळचे बाँम्बे स्टेटचे मुख्यमंत्री बी जी खेर यांचे याबाबत अभिननंदन करावे ते कमीच आहे. भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची संख्या प्रचंड असलेल्या आपल्या देशात खासगी कार प्रत्येकजण घेवू शकणार नाही. त्यासाठी काहीतरी सार्वजनिक सोय असली पाहिजे हे लक्षात घेवून लोकांच्या परीवहनाला महत्व देवून तसी सोय करणारे  बि जी खेर म्हणूनच महत्तवाचे  ठरतात. महाराष्ट्रीयन लोकांनी अनेक नविन बाबी देशाला माहिती करुन दिल्या .एसटी सेवाही त्या पैकीच एक . एसटीच्या माध्यमातून सार्वजनिक बसवाहतुकी...

अशांत लक्षव्दीप !

इमेज
             लक्षव्दीप भारताच्या पश्चिमेला लक्षव्दीप असणारा.  केंद्रशासित प्रदेश . इतरवेळी फारशा बातम्यात न येणारा, स्वतंत्र   भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या चातृर्यामुळे  पाकिस्तानच्या नौदलापेक्षा पंधरा मिनिटे आधी आपले  नौदल पोहोचल्यामुळे भारताकडे आलेला मुस्लिम बांधवांची वस्ती अधिक असलेला प्रवाळ या प्राण्यांमुळे तयार झालेला बेटांचा समूह म्हणजे लक्षव्दीप ( अंदमान निकोबार बेटे ही हिमालयाची उपशाखा असणाऱ्या एरोकॉन या पर्वतरांगेतील शिखरे आहेत ) { भारताच्या स्वतंत्रप्राप्तीच्या वेळी लक्षव्दीपकडे सुरवातीला भारत किंवा पाकिस्तान  दोघांचे लक्ष नव्हते मात्र कालांतराने सरदार पटेलांचे याकडे लक्ष घेल्याने त्यांनी नौदल पाठवले जे पाकिस्तानच्या नौदलापेक्षा पंधरा मिनिटे आधी पोहोचले भारताच्या झेंडा बघून पाकिस्तानी नौदल परत गेले    आणि भारताच्या नकाश्यात या बेटांचा समावेश झाला .}  ज्यांची स्वातंत्रप्राप्तीवेळी संख्या 36 होती . मात्र नुकतेच समुद्रामुळे खनन झाल्यामुळे एक बेट  पाण्याखाली गेल्...

6वर्षे ब्युटीफुल माइंडच्या निधनानंतर ची

इमेज
काही योगायोग अत्यंत दुर्देवी असतात लाखो रुग्णांवर हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या नितू मांडके यांच्या मृत्यू हृदयक्रिया बंद पडून व्हावा , मगरींवर प्रचंड संशोधन करणाऱ्या  क्रोकोडाइल मँन असी ख्याती असणाऱ्या स्टिव्ह इरविनचा  मृत्यू मगरींमुळेच व्हावा वगैरे आज पासून 6वर्षापुर्वी असाच एक दुर्देवी योगायोग.अमेरीकेत झाला.      अत्यंत दुर्धर अशा मानसिक रोग समजला गेलेल्या स्किझोफेनिया ( छिन्नमानसिकता ) रोगावर विजय मिळवून गणितातील अवघड समजल्या गेलेल्या गेम थेअरी मध्ये नोबेल मिळवणारा शास्ञज्ञ जॉन नँश (86 )  यांचा ते पत्नीसह कारने जात असताना अपघात होवून स्किझोफेनिया रोगाच्या जागतिक दिनीच त्यांचे  निधन होण्याचा . या अपघातात त्यांचाबरोबर त्यांना जीवनाच्या कठीण प्रसंगी साथ देणारी त्यांचा बायकोचेही (84) निधन झाले . त्यांचा जिवनावर आधारीत ब्यूटीफुल मांइड हा चिञपट  मी अनेकदा बघितला आहे. किंबहुना तो माझा आवडता इंग्रजी चिञपट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मन किती खट्याळ असू शकते ? त्यामुळे आयुष्याची महत्वाची वर्षे कशी वाया जावू शकतात आणी तरी देखील मनुष्य काय करू शकतो? ह...

वंदन धगधगत्या अग्निकुंडाला !

इमेज
आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची   जर आपण यादी केली   तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या   गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंतंञ्यवीर सावरकरांच्या गुणांची जरी यादी करायची म्हटली तरी एखाद्याची झोप उडू शकते   समाजसुधारक विज्ञाननिष्ट भाषातज्ञ ऊक्रूष्ट संघटक प्रखर देशभक्त समयसुचक सिध्दहस्त लेखक भविष्यसूचक बलोपासक त्यांचा गुणांची यादी प्रचंड आहे माञ मी पामर दुर्दैवाने येव्हढीच करु शकलो असो मला सावकरांचा ञुषीतुल्य व्यक्तीमत्वातील आवडलेल्या गुणातील एक गुण म्हणजे त्याचातील समाज सुधारक होय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या ...