पोस्ट्स

मना सज्जना

इमेज
       १८ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली . आईने मोबईल खेळायला न दिल्याने एका १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची ती घटना होती . उद्याचे भविष्य ज्या व्यक्तींच्या हाती आहे तिची मनोवस्था कोणत्या  परिस्थितीत  आहे याचा हा ठसठशीत पुरावाच म्हणता येईल .  हे फक्त एका प्रातिनिधिक उदाहरण आहे जर आपण रोज वर्तमानपत्राचे वाचन केले तर आपणस अश्या अनेक घटना वाचावयास मिळतील .  एक गंभीर समस्या असून देखील आपणाकडे याकडे दुर्दैवाने फारशे काही बॊलले जात नाही . अशी एखादी घटना ऐकल्याने  आई वडिलांनी अति लाड केल्याने त्या मूलने मुलीने असे पाऊल उचलले असे म्हणून सोडून देण्यासारख्या या घटना नाही अति लाडाने १०० मुलामुलींपैकी एखादा असे टोकाचे पाऊल उचलेल मात्र जेव्हा अश्या घटनांची संख्या प्रचंड वाढते तेव्हा ती समस्या फक्त काही लोकांची वैयक्तिक समस्या राहत नाही तर सामाजिक समस्या होते  लहान मुळा मुलींची आत्महत्या  हि सुद्धा अशीच सामाजिक समस्या आहे     पूर्वी कधीही होत  नव्हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात आता सुजाण पालकत्वाब...

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा

इमेज
तिर्थस्वरुप डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार      डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20   आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 9 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना   पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला   शोधण्याचा प्रयत्न केला . पण उपयोग शुन्य झाला . त्या बद्दल आम्हाला माफ करा   ? काही महिन्यांपूर्वी   कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्येची प्राथमिक चौकशीसरकारकडून पूर्ण झाल्याविषयी    बातमी वाचली .   तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. डॉक्टर तुमच्या   हत्येचे मारेकरी पकडले तरी त्याना शिक्षा होण्यासाठी किती कालावधी लागेल . महात्मा फुल्यांचा निर्मीकासच ठाउक असेल कदाचित ? तुमच्या हत्येचे मारेकरी म्हणून . का...

पर्यावरणपुरक गणपती उत्सव

इमेज
   निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या   अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत...

वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

इमेज
                  भगवान श्रीकृष्ण यांची   जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात   साजरी   करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण   यांना   विविध रूपात पुजले जाते . रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण , ही भगवान श्रीकृष्ण   ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा   इतिहासाच्या पौराणिक आणि   भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण   हे   जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा   मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात .     माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली   भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग...