पोस्ट्स

जागतिक अंतराळ सप्ताहाच्या निमित्याने

इमेज
     आपण अंधाऱ्या रात्री आकाशात नजर टाकल्यास आपल्यास अथांग अश्या स्वरूपात पसरलेल्या स्वरूपात तारे दिसतात ज्याला आपणाकडे अवकाश असे म्हणतात मानवाला फार अशं युगापासून या अंतराळाचे आकर्षण आहे या अंतराळातील विविध ताऱ्यांना आपल्या काल्पनिक रेषेने जोडत त्याचे विविध नक्षत्रात रूपांतरण केले आपण केलेला अभ्यास दुसऱ्या व्यक्तींना समजण्यासाठी त्या संदर्भात विविध कथा रचल्या त्यांचे पृथीवरून सातत्याने निरीक्षण केले त्याचा विविध नोंदी ठेवल्या अर्थात हे सारे पृथ्वीवरून सुरु होते पृथीच्या हवामानाचा परिणाम या निरीक्षणांवर होत असे मात्र  मनुष्यप्राणी गुहेत राहत असल्यापासून सुरु असणारा मानवाचा अंतरालाविषयी जाणून घेण्याचा विचार स्वस्थ बसत नव्हता सतराव्या शतकाच्या सुरवातीला दुर्बिणीचा शोध लागल्यावर या निरीक्षणात काहीशी सुसूत्रतत आली मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा मानवास समजू लागल्या जसे शनीचे कडे शनिपाश्चात असणारे सौरमालिकेतील ग्रह अनेक तारकासमूह यांचे आतापर्यंत न झालेले दर्शन मानवाला होऊ लागले       १९५७ ऑक्टोबर ४ रोजी युनाटेड सेव्हियत सो...

बदलणारे पर्जन्य अणि भारतीय

इमेज
     आपल्या भारतात १ जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूमचा कालावधी मानण्यात येतो . त्यामुळे दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी भारतीय हवामान खात्यातर्फे दरवर्षी   ३० सप्टेंबर रोजी देशभरतत    मान्सूमचा पाऊस किती पडला ? याची आकडेवारी जाहीर करण्यात येते . तशी ती याही वर्षी जाहीर करण्यात आली मात्र यावर्षी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी नेमेची येतो पावसाळा या म्हणीनुसार दुर्ल्क्ष   करण्यासारखी नाही   देशात दरवर्षी पडणारा   सरासरी पाऊस जर १०० % समजला तर या वर्षी तो १०६ % पाऊस पडलेला आहे . मात्र त्याचे वितरण अत्यंत विषम आहे   बिहार राज्यात सरासरीपेक्षा 31%, उत्तर प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा 28% , झारखंडमध्ये सरासरीच्या 20% आणि मणिपूरमध्ये 48% तर , त्रिपूरा आणि मिझोराममध्ये अनुक्रमे 24%, 22% पाऊस कमी पाऊस झाला आहे तर आपल्या महाराष्ट्रमध्ये सरासरीपेक्षा 23% , मध्यप्रदेशात 23% , गुजरात राज्यात 27 तर , तेलंगाणा आणि , तामिळनाडू अनुक्रमे 46 आणि 45% जास्त पाऊस झाला आह...

भारताचे लक्ष आता पॅसिफिक महासागराकडे

इमेज
     सध्या भारताकडून विविध देशांशी संबंध अधिक मैत्रीपूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे ऑगस्ट  आणि सप्टेंबर महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ . एस जयशंकर यांचा  जपान , युनाटेड अरब अमिरात , सौदी अरेबिया या देशात आणि भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग याचा जपान , मध्य आशियातील पाचही इस्लामधर्मीय देशांचा आणि आग्नेय आशियातील देशाचा दौरा हेच सुचवत आहे या देशांशी शाश्त्रात्रे विक्री तसेच व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध वृद्धीला राजकारणाचा विचार करता  साह्य होतील याबाबत करार केल्यानंतर भारताने आता आपला मोर्चा पॅसिफिक महासागरातील देशांकडे वळवला आहे       जागतिक राजकारणाचा विचार करता जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू पश्चिम युरोप आणि अमेरिका या भागातून जाऊन भारताच्या आसपासच्या समुद्रकिनारा तसेच पॅसिफिक महासागरातील विविध बेट स्वरूपातील देश आणि पॅसिफिक महासागराला किनारा असणाऱ्या देशाभोवती केंद्रित झाला आहे भू राजनॆतिक शास्त्राचा विचार करता या भागाला इंडो पॅसिफिक म्हणतात.  याच इंडो पॅसिफिक भागातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ऑस्ट्र...

क्रीडांगण झाले युद्धभूमी

इमेज
     खेळाडूंनी कोणताही खेळ खिलाडूवृत्तीने खेळावा , त्यात वैरभावना नसावी , अशी सर्वसाधारण मान्यता आहे . खेळ संपल्यावर खेळाडू एकमेकांचे हस्तालोंदन देखील याच भावनेने करतात की खेळ संपला आहे खेळात यशस्वी होण्यासाठी जी वैरभावना बाळगली होती ती मी सोडून देत आहे तू देखील सोडत आहे आपण सर्व मानवजात म्हणून एकत्र होऊया .  खेळाच्या सुरवातीला   जेव्हा देशाचे राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा खेळाडूंच्या समोर लहान मुलांची रांग याच न्यायाने असते कि   मी या लहान मुलांसारखा निरागसतेने खेळणार आहे लहान मुले ज्याप्रमाणे क्षणात भांडतात दुसऱ्या क्षणाला एकत्र येतात मनात कोणतीच वैरभावना ठेवत नाही त्या प्रकारे मी समोरच्या खेळाडूंशी फक्त या सामन्यापर्यतच वैरभावना ठेवेल   सामान संपल्यावर मी त्याच्याशी मित्रत्वाची भावना ठेवेल असे खेळाडू अप्रत्यक्षरीत्या खेळाडू लहान मुलाच्या   मार्फत कबूल करत असतो असे समजण्यात येत असते खेळाडू देखील हे अप्रत्यक्षरीत्या हे बंधन मान्य ...

ज्वालामुखीच्या तोंडावर पाकिस्तान

इमेज
     आपल्या शेजारील देश पाकिस्तान  ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातून रेकॉर्ड केलेले संभाषण डार्क नेटवर उपलब्ध असल्याचे आणि या संभाषांत अनेक गंभीर बाबी उघड झाल्यामुळे पाकिस्तानात गोंधळ उडाला असताना देशातील महागाईमुळे शेती करणे अशक्य झाले आहे परिणामी शेतीसासाठी आवश्यक असणाऱ्या खतांवर आणि शेतीपंपासाठी आवश्यक असणाऱ्या डिझेलवर सरकारने शेतकऱयांना सूट द्यावी या प्रमुख मागणीसह सध्याच्या पुरामुळे उध्द्ववस्त झालेल्या शेतीला सरकारने मदत करावी यामागणीसरदर्भात शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारने ऐकावे या मागणीससाठी  पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे   शेतकरी  गेल्या तीन दिवसापासून आंदोलन  करत असताना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका अत्यंत महत्त्ववाची घडामोड घडली.  इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अवमान केल्याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच पाकिस्तानच्या केंद्रीय सत्तेच्या विचार करता प्रमुख विरोधी पक्ष...