पोस्ट्स

पाकिस्तान राजकीय अस्थिरतेच्या कडेलोटावर

इमेज
  पाकिस्तान राजकीय अस्थिरतेच्या कडेलोटावर , असल्याचे तेथून येणाया बातम्यांमधून  स्पष्ट होत आहे . इम्रान खान यांचे आंदोलन चिरडण्याची पूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे आजमितीस पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये  ठिकठिकाणी रस्त्यावर कंटनेरच्या भिंती उभ्या केल्या आहेत रस्ते खणून त्याठिकाणी मोठमोठे खिळे रोखण्याचे काम सुरु आहे . पाकिस्तानच्या केंद्रीय सरकारतर्फे इस्लामाबाद पोलीस आणि सिंध प्रांतीय पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणत सुरक्षादले तैनतीचे नियोजन सुरु आहे . प्रसंगी आंदोलनकांवर ड्रोनच्या मदतीने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरु आहे या प्रकारच्या बातम्या आंतराष्ट्रीय माध्यमात येत आहेत इस्लामाबाद शहारत येणारे सर्व रस्ते बंद करण्याचे नियोजन सुरु आहे            इम्रान खान यांच्या राजकीय प्रचार सभांना मोठ्या प्रमाणत पाठिंबा मिळत आहे समस्त पाकिस्तानी जनता इम्रान खान केव्हा आंदोलनाची हाक देतात याकडे लक्ष देत आहे इम्रान खान यांनी माझे फोन सुद्धा रेकॉर्ड होत असल्याने आंदोलनाचे नियोजन करतांना क...

मना सज्जना !.....

इमेज
          मन , मानवाच्या बहुतांश सर्व क्रियांवर प्रतिक्रियांवर नियंत्रण असलेला मात्र तरीही सहजपणे दाखवता न येणारा मनुष्याच्या अविभाज्य भाग . किंवा मनुष्याच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं मात्र ज्याविषयी फारच कमी बोलले जाते लिहले जाते तो घटक म्हणजे मन . मानवाच्या या अविभाज्यअत्यंत महत्त्वाच्या   घटकांवर , बोलण्याचा लिहण्याचा समाजात मन आणि त्यास होणारे विविध विकार याविषयी जनजागृती करण्याच्या दिवस म्हणजे   १० ऑक्टोबर अर्थात जगातील मानसिक आरोग्य दिन .  १९९२ पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो            १९९२ पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस १९९४ पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो २०२२ सालाची संकल्पना आहे " Make Mental Health & Well-Being...

नांदूर नाका परिसरात झालेल्या अपघाताने उपस्थित झालेले प्रश्न

इमेज
      नाशिककरांची शुक्रवार ८ ऑक्टोबरची सकाळ उघडली ती नांदूर नाका परिसरात झालेल्या एका मोठ्या जीवघेण्या अपघाताच्या बातमीने . एका खासगी बसवातूकदारच्या यवतमाळ ते मुबई दरम्यान धावणाऱ्या एका बसला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अपघात होऊनआग  लागण्याने होरपळून १० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची ती बातमी होती . वरातीमागून घोडे या न्यायाने याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र या चौकशीतून काही चुका समोर आल्यातर त्या चुकांची पुनरावर्ती टाळण्यासाठी काही उपाययोजना होतात का ? हे बघणे महत्त्वाचे  आहेत . याच्या आधी देखील अश्या प्रकारचे अनेक अपघात झाले आहेत त्यांच्या अपघाताची देखील चौकशी झाली आहे मात्र या  चौकशी अहवालात जे  सांगितले आहे याची अंमलबाजवणी न झाल्याने सदर अपघात झाला असे माझे स्पष्ट मत आहे       मुळात आपल्याकडे बस बांधणीत खूपच फरक दिसतो उदाहरणादाखल आपण महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात , नॉर्थ वेस्ट कर्नाटक , या चार एसटी महामंडळाच्या बसेस बघूया मी जरी या चार बसेसचे उदाहरण देत असलो तरी पळसाला पाने तीनच  या न्यायाने आपण भारतातील ...

बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

इमेज
          आपल्या बाँलीवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सुखी सुखी गुलाबी चित्रे रंगवणारी अनेक चित्रपटे आढळतात . आपल्या आयुष्यातील वास्तविकतेपासून चित्रपटातील दृश्ये खुप दुर असतात .  मानवी आयुष्यातील दुःखे आपल्या चित्रपटातून मांडणारे फारच कमी मोजके , सिने निर्माते , सिने दिग्दर्शक आपल्या बाँलीवूडमध्ये आढळतात . या हाताच्या बोटांवर मोजता येतील अस्या सिने निर्माते , दिग्दर्शकांमध्ये वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरूदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल . आपल्या बाँलीवूडमध्ये पुर्वी कार्यरत किंवा आता कार्यरत असणाऱ्या सिने दिग्दर्शक , सिने निर्मात्यांपैकी काही मोजकेच सिने निर्माते सिने दिग्दर्शक असे आहेत की ,  ज्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट कितीही वेळा बघीतले तरी कंटाळवाणे न होता , काहीतरी नविन बघत आहोत असे वाटते . दरवेळी चित्रपटातील कोणता तरी नवा पैलू आपणास गवसतो . अश्या मोजक्या सिने दिग्दर्शक सिने निर्मातांपैकी एक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे वसंतकुमा...