पोस्ट्स

बुद्धिबळातील महासत्ता भारत

इमेज
               बुद्धिबळातील महासत्ता भारत आहे ,हे सिद्ध करणाऱ्या घटना सध्या  वारंवार प्रत्ययास येत आहे . नाशिकचे आयकॉन  ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या युरोपीय क्लबमध्ये चमकदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत १० क्रमकांची झेप घेत पुन्हा एकदा जगातील पहिल्या २५ खेळाडूंच्या क्रमवारीत स्थान मिळाल्यामुळे समस्त बुद्धिबळपटू आनंदात असताना , बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशनइंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे कडून जाहीर करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीमुळे दुग्धशर्करा योगाचीच प्रचितीच येत आहे .आजमितीस पुरुष खेळाडूंचा विचार करता जगातील पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ५ खेळाडू आहेत तर महिला खेळाडूंचा विचार करता पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ३ खेळाडूंचा समावेश आहे जर सांघिक कामगिरीचा विचार केला तर भारत पुरुषांचा आणि महिलांचा गटात  तिसऱ्या स्थानी आहे तर या वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांच्या एकत्रित सांघिक कामगिरीचा विचार करता सुद्धा भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे .अनेक भारतीय बुद्धिबळपटूंनी गेल्या काही महिन्य...

मोठ्या दूरगामी बदलाच्या दिशेने पाकिस्तान

इमेज
     मोठ्या दूरगामी बदलाच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरु असल्याचे त्या देशातून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे .पाकिस्तानमधील स्थैर्याचा राजकीय घडामोडींचा दोन्ही देशातील संबंधावर मोठा परिणाम होत असल्याने आणि आपल्या भारताबरोबर पाकिस्तान मोठी सीमा शेअर करत असल्याने आपल्यासाठीही  त्या अत्यंत महत्वाच्या ठरतात      तर  अमेरिकेने फूस लावून पाकिस्तनात या वर्षी  (२०२२ ) एप्रिलमध्ये सत्तानंतरण केले  आहे त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही  तरी पाकिस्तानात नव्याने निवडणूका घेण्यात याव्यात अशी इम्रान खान यांची प्रमुख मागणी आहे  त्यासाठी  या वर्षाच्या (२०२२) एप्रिल महिन्यात झालेल्या सत्ततरणातरानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला मोठे यश मिळत आहे .याचा दाखल दिला आहे आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे इम्रान खान त्यांचे आंदोलन कधी सुरु करतात ?  या विषयी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणत उत्सुकता होती   त्यास सकारात्मक प्रतिसाद देत...

हवामानाचा मुद्दा कधी येणार आपल्या अजेंड्यावर ?

इमेज
     अजून किती वाईट स्थिती आल्यावर आपल्या अजेंड्यावर हवामान बदलाचा मुद्दा येणार आहे ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा अहवाल नुकताच India's environment think tank Centre for Science and Environment तर्फे प्रसिद्ध करण्यात आला या   अहवालानुसार   १ जानेवारी २०२२ ते ३०सप्टेंबर २०२२ या वर्षातील २७३ दिवसांपैकी २४१ दिवशी बदलत्या हवामानाने भारतीयांना आपले रंग दाखवले आहेत या २७३ दिवसात बदलत्या हवामानामुळे २ हजार ७५५ व्यक्तींना   आणि ६९ हजार पाळीव प्राण्यांना प्राणास मुकावे लागले . बदलत्या हवामानामुळे ४० हजार घरे उद्धवस्त झाली तसेच १८ लाख हेकटर जमिनीवर याचा परिणाम झाला असेही या अहवालात सांगण्यात आले   आहे भारतात बदलते हवामान हा प्रश्न कितीं गंभीर स्थितीवर आला आहे ,  याचा हा ढळढळीत पुरावाच म्हणावा लागेल     अहवाल सादर करताना , त्याचे लेखक रजित सेनगुप्ता आणि किरण पांडे म्हणाले की , २०२२मध्ये २७३ दिवसांपैकी २४१ दिवस भारताने अत्यंत हवामाना...

राज्यांच्या स्थापना दिवसांच्या निमित्याने

इमेज
        वर्षातील काही दिवस हे मोठे विलक्षण असतात .  त्या दिवशी अनेक घडामोड घडल्या असल्याने त्या दिवाशांना विलक्षण महत्व आलेले असते . आपल्या भारताचा विचार केला असता १ नोव्हेंबर हा त्या दिवसांपैकीच एक . आपल्या भारतात असणाऱ्या  , तामिळनाडू , केरळ , कर्नाटक , आंध्रप्रदेश छत्तीसगढ , मध्यप्रदेश , राजस्थान , पंजाब आणि हरीयाणा   ही ती  ९ राज्ये तर पड्डुचेरी ( जूने नाव पाँडेचरी ), अंदमान निकोबार , लक्षद्वीप , दिल्ली तसेच चंडीगढ या  ५  केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस एकच १नोव्हेंबर असतो . आपल्या भारतात २८ राज्ये आहेत त्यापैकी ९    राज्ये म्हणजेच सुमारे १/३ राज्ये आणि ८ केंद्रांशासीत प्रदेशांपैकी ५ म्हणजेच जवळपास निम्या केंद्रशासित प्रदेशांचा दिवस हा १ नोव्हेंबर असतो             आपल्या भारतात प्रशासनाच्या सोयीनुसार राज्याची निर्मिती किंवा विलय केला जातो . त्यासाठी संविधानाच्या पहिल्या भागात तरतुदी करण्यात आल्या आहेत संविधानाची कलमे सांगायच...