पोस्ट्स

सिंहावलोकन २०२२ सार्वजनिक वाहतूकव्यवस्था

इमेज
            इंग्रजी नववर्ष सुरु होण्यसासाठी आता मोजकेच दिवस बाकी आहेत . या सरत्या २०२२ वर्षाचा विचार करता सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा विचार करता , अनेक बदलांचे वर्ष ठरले , कोणत्याहीउ देशाच्या प्रगतीत त्या देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे आपल्या भारताचा विकासाचा अभ्यास करताना हे बदल अत्यंत महत्त्वाचे ठरतात . चला तर मग जाणून घेउया हे बदल     आपल्या भारतात दोन प्रकारची सार्वजनिक   वाहतूक आहे त्यातील पहिली म्हणजे   सर्व भारतभर पसरली आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणारी आपली भारतीय रेल्वे तर दुसरी आहे वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारी त्या त्या राज्याची स्वतंत्र अशी सार्वजनिक परिवहन सेवा ज्यास सर्वसाधारणपणे एसटी असे संबोधनात येते . सरत्या २०२२ वर्षात दोन्ही प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणत बदल झाले पहिल्यांदा आपण रेल्वे या सर्व भारतभर पसरलेल्या वाह...

सिंहावलोकन २०२२ नैसर्गिक आपत्ती

इमेज
ग्रेनीयन वर्ष २०२२ संपायला आता मोजकेच दिवस राहिलेले आहेत या सरत्या वर्षाचा विचार नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने केला असता आपणास या वर्षात आपणास अनेक नैसर्गिक आपत्ती आल्याचे दिसून येते या आपत्तीचे आपण हवामान बदलामुळे आलेल्या आपत्ती आणि पृथ्वीच्या भूगर्भातील विविध घटकांच्यामुळे मानवास सामना करावयास लागलेल्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण केल्यास दोन्ही भागातील नैसर्गिक आपत्तीचा मानवास या वर्षात मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला असल्याचे आपणस दिसून येते वर्षाची सुरवातच पृथीच्या भूगर्भातील घडामोडीने आलेल्या नैसर्गिक आपत्तीने झाली तर आता वर्षाची अखेर हवामान बदलामुळे होणाऱ्या संकटामुळे मानवावर आलेल्या आपत्तीने होत आहे चला तर जाणून घेऊया वर्षभरात मानवास सामोरे जावे लागणाऱ्या नैसर्गिक आपत्तीविषयी .प्रथम पृथ्वीच्या अंतरंगातील घडामोडींमुळे आलेल्या संकटाविषयी बोलूया वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यात पॅसिफिक महासागरातील रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील एक ज्वालामुखीचा मोठ्या प्रमाणत उद्रेक झाला या उद्र्कामुळे या ज्वालामुखीच्या जवळ असणाऱ्या टोंगो या देशात मोठ्...

सिंहावलोकन २०२२ क्रीडा,

इमेज
       सरते २०२२ हे वर्ष क्रीडा जगताचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . जागतिक स्तराचा विचार करता अनेक वाद प्रतिवाद , टीका यावर्षी क्रीडा जगतात झाले एका संघाच्या  समर्थकांनी दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांशी प्राण जाईल इतक्या टोकाची मारामारी करण्याची घटना देखील यावर्षी जगाने अनुभवली . जगातिक स्तरावर मनाचा समजल्या जाणाऱ्या आणि काही वर्षांच्या अंतराने होणाऱ्या दोन स्पर्धा यावर्षी झाल्या .  एक भारतासाठी अत्यंत महत्वाची मात्र क्रीडा जगतात फारशी महत्वाची न मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत  एक धक्कादायक पराभवाला भारताला सम्रोरे जावे लागले ते या बघता हे वर्ष भारतासह जगसाठी अत्यंत वादळी ठरले         या वर्षाची सुरवातच मुळी झाली राफेल नदाल , रॉजर फेडरलसह ३० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या आणि जानेवारी २०२२ ची पुरुष खेळाडूंची जागतिक क्रमवारी बघता पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवाक जेकोविच यास त्याने कोव्हीड १९ चे लसीकरण पूर्ण न केल्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या वेळापत्रकातील पहिली स्पर्धा असणाऱ्या ऑस्ट्रेलियन ...

सिंहावलोकन २०२२ जग (राजकीय आणि आर्थिक ) सार्क देश वगळून

इमेज
   चालू ग्रेनीयन वर्ष संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे गेल्या वर्षभरात जगात काय घडले यांचा धावा घेतल्यास अनेक घडामोडी घडलेल्या दिसतात ज्यामध्ये रशिया युक्रेन यांच्यात झालेल्या इराण या देशात महिलांना बुरखा   घालण्याचा सक्तीविरोधात झालेले आंदोलन , अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्यावरून झालेले आंदोलन , अमेरिकेत बंदूक बाळगल्याच्या अधिकारावरून रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रेक्तिक पक्षाच्या सदस्यांमध्ये आणि त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये सत्तासंघर्ष , अमेरिकेत झालेल्या त्यांच्या सभागृहांच्या निवडणुका ( मिड टर्म निवडणुका ) तसेच फ्रान्समध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुका , काझकिस्तान   देशात सरकारविरोधात महागाईच्या मुद्यावरून झालेले दंगे . युनाटेड किंग्डम या देशातील पंतप्रधानचे सत्तांतरण विसाव्या शतकाच्या राजकारणावर मोठा प्रभाव असलेल्या युनाटेड किंगडमच्या   राणीचा अर्थात क्वीन एलिझाबेथ यांचा   मृत्यू तसेच शीतयुद्धची समाप्तीस क...