पोस्ट्स

नवे आव्हान पेलण्यासाठी सक्षम होते आहे आपली यस्टी!

इमेज
मी महाराष्ट्र एसटीमध्ये कार्यरत नसलो तरी, एसटीचा चाहता मात्र आहे. एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेत, महाराष्ट्रातील नागपूर  या प्रशासकीय विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व महाराष्ट्र तसेच गुजरात आणि कर्नाटकचा काही भागात फिरलो आहे. माझ्या या आवडीमुळे मी काही एसटीप्रेमी लोकांच्या व्हाँटसप आणि फेसबुक गृपमध्ये आहे. या गृपवर सध्या  आपल्या महाराष्ट्र एसटीच्या पुण्याचे  उपनगर असलेल्या दापोडीत  असणाऱ्या  वर्कशॉपमध्ये  BS 6 मानकांच्या TATA 12 मीटर चेसिसवर बांधलेल्या पहिल्या वहिल्या संपूर्ण स्लिपर 2 बाय 1 नाँन एसी गाड्यांचे फ़ोटो यायला लागलेत. एसटीचे हे पाउल मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. याबद्दल लेट पण थेट या न्यायाने एसटी प्रशासन कौतूकास पात्र आहे.    या आधी आपल्या महाराष्ट्र एसटीत खाली बसण्याची सोय आणि वरती झोपण्याची सोय असलेली नाँन एसी खिडक्यांमधून हवा जाण्यायेण्याची सोय असलेली स्लिपर+सिटर ही बससेवा होती. (लाल आणि पांढरा पट्टा असणाऱ्या बसेस) पुर्णतः स्लीपर असी सेवा नव्हती.जी कमतरता आता पुर्ण झाली आहे. तसे बघायला गेलो तर राजस्थ...

पंडित नेहरू थोरच

इमेज
     नुकतेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समाजकार्य असणाऱ्या एक ज्येष्ठ छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी एक विधान केले ज्या विधानामुळे महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणत वादंग उठला . त्या विधानामुळे भारताच्या आतापर्यतच्या वाटचालीत पंडित नेहरूंचे योगदान नक्की किती ?या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली त्याविषयीची वस्तुस्थिती सांगण्यासाठी हे लेखन पंडित नेहरू थोरच      तर मित्रानो , पंडित नेहरूंच्या कार्यकाळात पंडित नेहरूंच्या काही चुका झाल्या हे मान्य केले तरी त्यांचे योगदान पूर्णतः नाकरण्यासारखे नाही . दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात ९० देश वसाहतवादातून स्वतंत्र झाले या देशांनी लोकशाहीची वेगवेगळी स्वरूपे स्वीकारली . काही देशांनी अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारली तर भारतासारख्या काही देशांनी इंग्लडच्या धर्तीवर लोकशाहीची पद्धत जिला वेस्ट मिनिस्टर पद्धत म्हणतात ती स्वीकारली आज त्यानंतर सुमारे ७० ते ७५ वर्षांनी त्या त्या देशातील लोकशाहीची स्थिती आणि भारतातील लोकशाहीची स्थिती याचा आढावा घेतल्यास आपणस आपणस अनेक देशातील लोकशाही जवळप...

पंतप्रधान मोदींना प्रदान होणार लोकमान्य टिळक पुरस्कार*

इमेज
    पंतप्रधान, नरेंद्र मोदी या नावाभोवती विलक्षण वलय आहे. अनेकांना त्यांच्याविषयी  उत्सुकता आहे, जी दिवसोंदिवस कमी होता वाढतच आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्य जगाने अनुभवले आहे. त्या आधी गुजरात या भारतातील  क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावर असलेल्या राज्याचा सर्वांगीण केलेला विकास देखील सर्वांनी बघीतला आहे. मात्र या खेरीज पंतप्रधान मोदी यांचे कर्तृत्व मोठे आहे. सक्रीय राजकारणात येण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी केलेले कार्य देखील मोठे आहे. या काळात त्यांनी काही काळ पुण्यात देखील कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर,  त्यांना देण्यात येणारा लोकमान्य पुरस्कार विशेष महत्तावाचा आहे. पुणे शहराची नाळ ओळखणाऱ्या, एका निस्पृह समाजसेवकाचा पुणे शहराने केलेला तो गौरव आहे.       पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकमान्य टिळक दोघेही प्रखर देशभक्त . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर  भारताची बाजू प्रखरपणे मांडताना आपण त्यांना वारंवार बघतोच.लोकमान्य टिळक यांनी अँनी बेझंट यांच्या सहकार्याने सुरु केलेल...

फक्त 17कमी !

इमेज
फक्त 17 कमी!  शीर्षक वाचून चमकलात ना? कस्यासाठी 17कमी?, असा प्रश्न तूमच्या मनात निर्माण झाला असेल तर सांगतो , फक्त 17कमी ही बाब, भारताच्या बुद्धीबळ गँडमास्टरच्या संदर्भात आहे. भारताचे हा मजकुर लिहीत असताना 83ग्रँडमास्टर झाले आहेत. अजून १७ ग्रँडमास्टर झाल्यावर भारतात ग्रँडमास्टरांच्या संख्येचे शतक होईल. आपल्याकडे 100 या संख्येचे विशेष महत्त्व आहे. वयाची 100वर्ष पुर्ण करोत, किंवा एखाद्या खेळाडूने 100वा सामना खेळो त्याकडे विशेष बाब म्हणून बघण्यात येते आणि 83 या संख्येत 17 मिळवले की 100 ही संख्या तयार होते.म्हणून म्हटले अजून 17 बाकी आदित्य सामंत हे भारताचे 83वे ग्रँडमास्टर ठरले आहेत.   त्यांनी 28व्या अबू धाबी मास्टर्समध्ये पहिला GM नॉर्म आणि 3ऱ्या एल लोब्रेगॅट इव्हेंटमध्ये दुसरा नॉर्म मिळवला.बील मास्टर टूर्नामेंट ओपनमध्ये शानदार कामगिरीसह, ते भारताचा 83वा जीएम बनले 8 फेऱ्यांनंतर आदित्य यांचे सहा गुण झाले आहेत आणि ते सध्या बिएल मास्टर्सच्या पुढील फेरी खेळत आहेत. मात्र त्यामुळे परिणामावर काही फरक पडत नाही कारण त्यांनी ग्रँडमास्टर नॉर्मसाठी अगोदरच आवश्यक आवश्...

गायकी क्षेत्रातील टँजिडी क्वीन गिता दत्त

इमेज
        जूलै महिन्याची 20 तारीख उजाडली की सिने चाहत्यांना  आठवण होते ती , गिता दत्त यांची .अविट गाण्याची प्रतिभा लाभलेली असून देखील , प्रतिभावन तसेच अत्यंत हळव्या मनाचा आपल्या पतीचा आग्रहास्तव त्याने निर्माण केलेले , दिग्दशीत केलेले अथवा त्याने अभिनेता म्हणून काम केलेले चित्रपट वगळता अन्यत्र फारसी  न गायलेली गायिका गिता दत्त .पतीच्या विवाह्यबाह्य  प्रेमप्रकरणाला कडाडुन विरोध करणारी गायिका म्हणजे गिता दत्त .एका प्रसिद्ध सिने अभ्यासकाचा मते  गीता दत्ता या गायीका क्षेत्रातील मिनाकुमारी आहे ज्याप्रमाने अंगी प्रचंड गुणवत्ता असूनही दुर्देवाच्या फेऱ्यात अडकल्याने मिनाकुमारी अभियानाच्या क्षेत्रात जास्त पुढे जाउ शकल्या नाहीत तोच प्रकार काहीसा गीता घोष चौधरी यांच्या बाबत घडला.             गीता दत्त यांच जन्म सध्याचा बांगलादेशातील फत्तेपुर या गावी एका जमिनदार कूटूबात झाला. 1942 च्या सूमारास त्यांच्या कुटुबियांनी मुंबईत स्थलांतर केले .त्यांच्या  सिनेकारकर्दीची सूरवात 1946 च्या आसपास होते. फारसे गायकीचे शिक्षण न घेता अंगभू...

कथा महाराष्ट्राच्या टायटॅनिकची

इमेज
आपल्या सर्वांना लंडन या शहरांतून न्यूयॉर्क या शहरांत जाणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या टायटॅनिक या जहाजाची गोष्ट माहिती असेलच या जहाजाच्या दुर्घटनेवर   तयार झालेला चित्रपट देखील आपण अनेकदा बघितला असेल .मात्र या टायटॅनिकच्या जहाज दुर्घटनेशी   साम्य असणारी दृघटना आपल्या महाराष्ट्रत देखील घडली होती मात्र दुदैवाने या घटनेला टायटॅनिक या दुर्घटनेच्या   तुलनेत खूपच कमी प्रसिद्धी मिळाली .   एस एस रामदास बोट दुर्घटना या नावाने ओळखली जाणारी या दुर्घटनेला   भारताच्या नौदल इतिहासात एक मोठा काळा डाग म्हणून ओळखले जाते किमान नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय समुद्रात जाण्यास अटकाव करणारा सध्याच्या निर्बध याच दुर्घटनेनंतर लागू करण्यात आला   १७ जुलै १९४७ ,  आषाढ महिन्याच्या अमावास्येला मुबई पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत  ६०० लोकांना  प्राणास मुकावे लागले होते मृतांमध्ये बहुसंख्य कोकणात राहणारे  लोक होते काही ब्रिटीश लोक सुद्धा यात मृत्युमुखी पडेल मात्र त्यांची संख्या कमी होते बहुसंख्य भारतीयच होते . २०२३  साली या दुर्घटनेला  ७६ ...

चंद्रयान 3 भारतीयांची अभिनंदनस्पद कामगिरी

इमेज
  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने 14 जुलैला देशाच्या प्रगतीत एका अभिनंदनस्पद कामगिरीची नोंद केली, हे एव्हाना आपल्याला माहिती झालेच असेल . सुमारे तीन वर्ष अथक प्रयत्न करत जगातील 210 देशांपैकी अत्यंत मोजक्या एका हाताची पाच बोटे सुद्धा त्यांची यादी करायला जास्त होतील, अशी कामगिरी अर्थात चंद्रावर यान पोहोचवण्याची भीम कामगिरी भारताने पुन्हा एकदा पार पाडली .  ज्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेची सुरवात,  दिवाळीत आपण उडवतो त्या प्रकारची, मात्र दिवाळीतील रॉकेटच्या पेक्षा मोठी रॉकेट उडवत, एका पडक्या चर्चमध्ये झाली.  रॉकेटचे विविध भाग शास्त्रज्ञानी सायकलवर एखादी मोळी बांधून वाहतूक करावी, त्या पद्धतीने वाहून आणले, या पद्धतीने झाली. त्या संस्थेने अमेरिका रशिया आदि विकसित देशच्या तुलनेत अत्यंत किरकोळ खर्च्यात चंद्राला गवसणी घालावी हे नवलच . ते देखील स्पेस वॉर सारख्या एखाद्या हॉलिवूडमधील चित्रपटाची निर्मितीसाठी लागलेल्या रककमेपेक्षा कमी खर्चात, चंद्रमोहिमेची आखणी करण्यात आली आहे, ही बाब आपण कायमच लक्षात घेयला हवी .        अन्य देशांच्या चंद्रमोहिमेत न आढलेले...