पोस्ट्स

अति तिथे माती किती खरे समजण्यासाठी वाचावे असे पुस्तक The evil eye of Chess

इमेज
          आपल्याकडे एक संस्कृत वचन प्रसिद्ध आहे ," अति सर्वत्र वर्जयते ", अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो . रोजच्या जीवनात आपण याचा अनुभव सुद्धा घेत असतो . आपल्या रोजच्या जगण्यात सर्वच क्षेत्राला हे तत्व लागू   होते . अगदी बुद्धिबळ सारख्या खेळात सुद्धा हे तत्व लागू होते . चमकलात ना ? हो बुद्धीबळ सारख्या खेळात देखील अति तिथे माती हे तत्व लागू होते . ते कसे लागू होते , हे समजण्यासाठी आपण आशिया खंडातील पहिले बुद्धीबळविषयक   ऍप   आणि संकेतस्थळ तयार करणाऱ्या श्री . विनायक वाडीले यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक " The evil eye of Chess" जे मी नुकतेच वाचले .           या पुस्तकात आठ अस्या जगविख्यात बुद्धीबळपटुंची ओळख करून देण्यात आली आहे की , ज्यात बुद्धीबळाविषयक मोठी गुणवत्ता अगदी ठासून भरली होती . मात्र मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे तत्व त्यांनी आचरणात न आणल्यामुळे त्यांचा अंत फारच हृदयदायक...

परग्रहवासीची अदभुत कहाणी,..प्रेषित...

इमेज
 पृथ्वीखेरीज अन्यत्र कुठे जीवसृष्टी आहे का? याबाबत मोठी उत्सुकता राहिलेली आहे.परग्रहवासीयांना बघीतले असल्याचे दावेही वारंवार करण्यात येतात.काही दिवसांपूर्वी मेस्किको या देशांमध्ये परग्रहवासीयांची दोन प्रेते सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. उडत्या तबकड्यामधून परग्रहवासी आपल्या  पृथ्वीवर वारंवार  येत असल्याचे सातत्याने  सांगितले जाते.परग्रहवासी या विषयावर हॉलीवूडमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील  चित्रपट  येवून गेले आहेत. इंग्रजी आणि मराठीत यावर मोठ्या प्रमाणात लिहले गेले आहे, जे मुख्यतः माहितीपर आहे. इंग्रजीमध्ये हा विषय साहित्याचा कलाने सुद्धा लिहिला गेला आहे.मात्र आपल्या मराठीचा विचार करता साहित्याचा अंगाने तूरळकच लिहले गेलेले आहे. मराठीत जे काही तूरळकच साहित्याचा अंगाने लिहले आहे,त्यातील एक प्रमुख पुस्तक म्हणजे, डॉ.जयंत नारळीकर यांनी लिहलेली प्रेषित ही मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित कांदबरी. जी मी नुकतीच वाचली.  सूमारे सव्वाशे पानांची ही लघू कांदबरी विविध प्रकरणांमध्ये विभागली गेली आहे. या कादंबरीत एका प्रगत जीवसृष्टीतील एक मुलगा एका अपघातामुळे एकटाच...

अतिशय रंजक भाषेत विश्वाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक A brief history of Time

इमेज
आपल्या रामायण आणि महाभारत अस्या पौराणिक मालिकांमध्ये अनेकदा " मे समय हुं !" असे म्हटले गेल्याचे आपण बघितले असेलच . तर समय किंवा ज्याला आपल्या मराठीत वेळ म्हणतात , ही संकल्पना आपल्याला मुळातून समजावून घेयची असेल तर , आपण वाचायलाच हवे असे पुस्तक म्हणजे , जेष्ठ खगोलभौतिकी शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी मुळातील इंग्रजी भाषेत लिहिलेले , मात्र ज्याच्या मराठी भाषेत देखील अनुवाद झाला आहे , असे   "A brief history of Time". या पुस्तकाचा मराठीत   अनुवाद झाला असला तरी मुळातील पुस्तक वाचण्याचा आनंद काही औरच . तो आनंद मिळवण्यासाठी मी नुकतेच मूळ इंग्रजी भाषेतील पुस्तक वाचले .      अत्यंत सोप्या इंग्रजी   भाषेत हे पुस्तक लिहिले आहे . तसेच या पुस्तकात जी माहिती देण्यात आली आहे . तीची मांडणी देखील रंजकतेने करण्यात आली आहे . त्यामुळे ज्याला खगोलभौतिकी या विषयाचे फारसे ज्ञान नाही , असी व्यक्ती देखील हे पुस्तक वाचून खगोलभौतिकी या विषयात बऱ्यापैकी पारंगत होवू शकते ....

परंपरावाद्यांविरोधात एका महिलेने केलेल्या बंडाची कहाणी,--गार्गी अजून जिवंत आहे.

इमेज
    सध्या आपल्या भारतात सर्वत्र नारी शक्ती विधेयकाबाबात चर्चा सुरु आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी  एका स्तंभात अर्थात विधीमंडळात त्यामुळे महिला वर्गाचा सहभाग त्यामुळे नक्कीच वाढेल. आज असे कोणतेही क्षेत्र नसेल ज्यामध्ये महिलावर्ग पुरुषांना खांद्याला खांदा लावून सक्षमतेने काम करत नसेल. अगदी एखाद्या माणसाचे निधन झाल्यावर स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कार विधीचा देखील अपवाद याला नाहीये‌. उत्तर प्रदेश सारख्या अजूनही जाती भेद उच्च निच्चता मोठ्या प्रमाणात पाळले जाणाऱ्या राज्यातील इलाहाबाद या शहरात देखील आपणास हे कार्य करणारी एक महिला कार्यरत आहे. हे मला समजले ते मी पुर्वी  वाचलेले असुन देखील सध्या पुन्हा एकदा  वाचत असलेल्या एका पुस्तकामुळे . "गार्गी जिवंत आहे", हे त्यांचे नाव. .राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकामुळे मला ही माहिती समजली.     हे पुस्तक प्रसिद्ध होवून बराच काळ लोटला आहे, त्या अर्थी हे पुस्तक जून्या या वर्गवारीत मोडते.माझे देखील हे पुस्तक पहिल्यांदा वाचले त्यास कैक वर्षे लोटले, मात्र स्वतः कडे असून देखील या बाबत लिहले नव्हते, जे आत...

स्वामी विवेकानंद यांची पत्रे...मनाला नैराश्यापासून दूर ठेवणारे पुस्तक

इमेज
समर्थ रामदास स्वामी यांनी मन या अवयवाचे मानवी आयुष्यातील महत्व स्पष्ट करताना  सांगितले आहे की, "मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण" जे अत्यंत खरे असल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले देखील असेल.मात्र आपल्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या या मनाला प्रसन्न कसे करायचे याचे उत्तर आपणास हवे असेल तर त्याचे उत्तर अत्यंत सोपे आहे, ते म्हणजे,स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले साहित्य वाचायचे. आपण कितीही मोठ्या नैराश्यात असो, स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले कोणतेही पुस्तक वाचले की, नैराश्य आपल्यापासून कैक मैल दुर गेलेच पाहिजे. स्वामी विवेकानंद यांचे साहित्य रामकृष्ण मठाच्या नागपूर शाखेमार्फत मराठीत आणले गेले आहे. त्यामुळे भाषेचा प्रश्न देखील निकालात निघाला आहे, तसेच त्याची किंमत देखील अत्यंत कमी आहे, मात्र त्यातील विचारलं मोठे अनमोल आहे.स्वामी विवेकानंद यांनी लिहलेल्या भक्तीयोग, राजयोग,प्रेमभंग सारखी पुस्तके समजली तर मोठा ज्ञानसाठा आपल्यासाठी खुला होईल. मात्र ते जर जमले नाही तर स्वामी विवेकानंद यांनी लिहलेले पत्रांचे वाचन केले तरी आपल्याला कधीही न संपणार...