पोस्ट्स

अमेरिकेच्या फायद्यासाठी, अमेरिकेकडून,अमेरिकेतर्फे लादण्यात आलेले युद्ध

इमेज
सध्या जगभरात अमेरीका- इराणचे युद्ध सुरू आहे, हे आपणस माहिती असेलच.इराणचा सर्वोच्च प्रमुख अयात्तूला खोमोनी हे त्यांच्या देशातील जनतेवर अत्याचार करत आहे‌ त्यावर अमेरिकेने एव्हढे मोठे युद्ध करायचे कारणच काय ?, जिनिव्हा शांती करारानुसार तो त्यांचा अंतर्गत प्रश्न समजून दूर्लक्ष का केले नाही.किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला का दाखल केला नाही? असे प्रश्न आपल्या मनात आले असतील तर सांगतो. अमेरिकेचे 'माझं ऐकत नाही, तूला संपवूनच टाकतो' हे धोरण कारणीभूत आहे त्यास.  स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्या देशात अशांतता निर्माण करुन तेथील सत्ताधिश हटवायचा तिथे आपल्या बाहुल्याला राज्याभिषेक करायचा, बाहुला ऐकायचे थांबला,की आपणच राज्याभिषेक केलेल्या बाहुल्याला हटवायचे आणि नवा बाहूल्याला राज्याभिषेक करायचा.जर नवा बाहुला सापडला नाही तर त्या देशाला स्वत:च्या दैवावर सोडुन देयचे. हा या धोरणाचा विस्तार म्हणता येईल. जगभरात अमेरिकेने हेच केले आहे. ईराक, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, व्हेनिझएला, आणि आता इराण हे त्यातील प्रमुख देश म्हणता येईल.ईराकचे सत्ताधिश सद्दाम हुसेनकडे जगाचा विनाश होईल,असी संहारक शस्त्रे आहेत,अस...

एक दिवस रावसाहेबांच्या शहरात

इमेज
मराठीतील एक ख्यातनाम सिद्धहस्त लेखक म्हणून आपण पु. ल. देशपांडे  यांना ओळखतो.  पु. ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ या लेखनासह त्यांनी आपल्या प्रतिभेने साकरलेली व्यक्तिचित्रे सुद्धा मोठ्या संख्येने प्रसिद्व आहेत.या व्यक्तिचित्रांपैकीच एक म्हणजे सहज बोलता बोलता  शिव्या देणारे, प्रचंड तिखट खाणारे मात्र आतुन अत्यंत प्रेमळ स्वाभाव असणारे बेळगावचे रहिवासी रावसाहेब. बेळगाव,  आपल्या मराठी भाषिकांची अस्मिता, जागृत ठेवणारे ठिकाण म्हणजे बेळगाव.तर या बेळगावला मी नुकतीच माझ्या 'एक दिवशीय भ्रमंती' या उपक्रमाद्वारे भेट दिली. त्यावेळी आलेल्या अनुभवांचे सार मंडण्यासाठी प्रस्तूत लेखन तर वाचक मित्र मैत्रींणोंनो, माझ्रा एकदिवशीय भ्रमंतीची सुरवात नेहमीप्रमाणे झाली ती रात्री अकरा वाजता, पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातून सुटणाऱ्या नॉर्थ ईस्ट कर्नाटक परिवहनच्या शिर्डी -बेळगाव नॉन एसी स्लिपर बसने. या बसने प्रवास करत पावणे सहाच्या सुमारास मी बेळगावच्या बसस्टँडवर पोहोचलो.बेळगावचे बसस्टँड मोठे असून या ठिकाणी ३७ प्लॅटफॉर्म आहेत.मी गेलो त्यावेळी नुकतेच उजाडत होते.माझ्या आतापर्यंतअनुभवानुसार परक्या...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १०(मला प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि समस्या )

इमेज
  मी एसटी बसचा वापर करतो , हे एव्हाना आपणास माहिती असेलच . एसटीच्या उपलब्धतेनुसार माझ्या पुर्वनियोजित कार्यक्रमात बदल देखील होतो हेही आपणास माहिती असण्याची शक्यता नाकारता येणार नाही . काही अत्यंत तूरळक घटनांचा अपवाद वगळता हे बदल खुपच किरकोळ स्वरूपाचे असतात . काही अत्यंत अपवादत्मक घटनेत मात्र हे बदल पुर्णत :180 अंशात माझी भटकंती 100 टक्के बदलणारे असतात . असाच एक फिरणे 100 टक्के बदलण्याचा अनुभव मला गेवराईच्या फिरण्याचा दरम्यान आला . माझे आजचे लेखन तो अनुभव आपणापर्यत पोहोचवण्यासाठ    तर मित्रांनो , पुणे शहरातून गेवराईला जाण्यासाठी मी पुणे ते आहिल्यानगर आणि तेथून पुढे अहिल्यानगर ते गेवराई असे नियोजन केले होते . मी नगरला जाण्यासाठी निवडलेली बस कर्नाटक ची असल्याने ती माळीवाडा किंवा स्वस्तिक बसस्टँडला न येता तारकपूर बसस्टँडवरुनच पुढे शिर्डीला जणार होती . त्यानुसार मी तारकपूर बसस्टँडला सकाळी साडेसहा वाजता आल्याने चौकशी खिडकी बंद होती . त्यामुळे तेथील एका कंडक्टरला गे...