पोस्ट्स

सप्टेंबर ४, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणपती उत्सवाच्या निमित्ताने खास

इमेज
  वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो तुम्ही दहीहंडी उत्सवाच्या आंनद घेत असताना हा लेख वाचत असल्याची दाट शक्यता आहे कृष्ण भक्तीत रममाण झाल्यावर साधारणतः १२ दिवसांनी (जन्माष्टमी नंतर ८ दिवसानी पोळा आणि त्यानंतर ४ दिवसानी गणेश चतुर्थी या हिशेबाने) आपण बुद्धीची देवता गणरायाचे आगमन तितक्याच भक्ती भक्तिभावाने करू. (सध्याचा वादंग त्यावेळी मोठ्या प्रमाणात शांत झाला असेल) याची मला तरी खात्री आहे. या गणेशोत्वाच्या काळात आपण गणपतीच्या विविध मंदिरात त्याची मोठ्या श्रद्धेने पूजा करत असू. ही पूजा आपणास जास्तीत आनंदायी ठरो यासाठी गणपतीच्या विशेष प्रसिद्ध नसलेल्या साडेतीन स्थानची माहिती देण्यासाठी सदर लेखन. या सर्व ठिकाणी मी वेगवेगळ्या वेळी भेटी दिल्या आहेत सर्व ठिकाणी माझा अनुभव मन प्रसन्न करणारा होता. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच्या सुखकर्ता विघ्नहर्ता रूपाचे दर्शन मला सर्व ठिकाणी झाले. गणपती केवळ बुद्धीची देवता नाही तर प्रसंगी दात तूटला तरी चालेल भक्तांना त्रास देणाऱ्या असुरांचा संहार करणारी देवता देखील आहे या एकदंत गजाननाचे दर्शन मला सर्वच ठिकाणी झाले मला हे माहिती आहे कि अनेक वाचकांचा गणपतीची सा...