जगातील प्रत्येकाची इच्छा उघड करणारे गाणे


जगात एक गोष्ट सोडून सर्व गोष्टींना शेवट आहे.ज्या एकमात्र गोष्टीला अंत नाही, ती गोष्ट म्हणजे मानवी इच्छा. ज्याने या इच्छेवर नियंत्रण मिळवले, त्याने जग जिंकल्यातच जमा आहे,असे आपण सातत्याने ऐकतो वाचतो.या इच्छा वेगवेगळ्या असतात.कोणत्याही दोन व्यक्तींचा इच्छा सारखे असणे कधीच शक्य नाही.कोणाला पैसा हवा असेल कोणाला समाजातील आपले स्थान उंचावण्याची इच्छा असेल. जसे इच्छेला अंत नाही तसेच या इच्छेच्या प्रकाराचा  शेवट नक्की कुठे होतो हे सांगणे देखील तितकेच अवघड आहे,असे देखील आपण ऐकतो वाचतो

मात्र दोनच दिवसापुर्वी सहज विरंगुळ्यासाठी युट्युब वरील व्हिडीओ बघत असताना एक व्हिडीओ सजेशनमध्ये दिसला आणि इच्छेला आणि इच्छेच्या प्रकाराला देखील मोजता येईल अशी मर्यादा असल्याची जाणिव झाली.माझ्या वाचक मित्र-मैत्रीणींनो तो व्हिडीओ होता एका गाण्याचा. आज २०२६ साली जे गाणे रिलीज होऊन सुमारे १६+ वर्ष होऊन गेली आहेत अस्या त्या गाण्यात मला इच्छेचा अंत दिसला. ते गाणे होते, एकेकाळी अंगी असलेल्या कलेच्याऐवजी शरीरयष्टी आणि नागरिकत्वाच्या तसेच धर्माचा कारणामुळे विनाकारण चर्चेत आलेल्या अदनान सामी याचे 'मुझको तो लिफ्ट करा दे, थोडीसी तो लिफ्ट करा दे' हे गाणे 

सव्वा चार मिनीटाच्या या गाण्यात मनुष्याच्या इच्छेचे सार सहजसोप्या भाषेत मांडलेले आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या गाण्याची याखेरीज अनेक वैशिष्ठे आहेत.‌ कुठलेही द्वि अर्थी शब्द नाहीत, आक्षेपार्ह्य वाटतील असे अंगविक्षेप नाहीत.विनाकारणचे परदेशी शुटिंग नाही. मुंबईतील शुटिंग नाचणाऱ्या व्यक्तींनी
सर्वसामान्य घालतात तसेच कपडे घातलेले, संपुर्ण शरीर झाकणारे कपडे गाणे ज्यांच्यावर शुट झाले आहेत,अस्या व्यक्तींनी घातलेले, संगीत देखील कानठळ्मा बसवणारे नाही‌.सर्वच कसे मनाला प्रसन्न करणारे.

अनेकदा प्रार्थनेच्या स्वरुपात आपण देवाकडे मागत असलेले देणे देखील किती रंजकतेने मांडता येते, ही गाण्यामागची संकल्पना. ती देखील वेगळ्याप्रकारे  सादर करता येवू शकते,हे आपणास गाण्यातून दिसते. एक जण चहा पित बसला असताना, रस्त्यावरील एका कारमधून एक व्यक्ती रस्त्यावयील न्यूजपेपर विकत घेणाऱ्या पोराला मोठी नोट देऊन पेपर विकत घेताना बघतो.पेपर विकत घेतल्यावर त्या मुलाकडून राहिलेले पैसे परत न घेता,ती कार तशीच निघून जाते.चहा पिणाऱ्या व्यक्तीला याचे आश्चर्य वाटते.लोक इतके उदार होण्यापर्यत श्रीमंत आहेत.आपणाकडे मात्र काही नाही याची जाणिव होऊन चहा पिणारा व्यक्ती देवाकडे मला पैसे, दे.मला जग
फिरवून आण, अशी मागणी करतो.आणि गाणे सुरू होते.अत्यंत साधी कल्पना .या गाण्याण तो चहा पिणारा देवा तू सर्व जाणतोस.तू माझ्या इच्छा सहज पुर्ण करू शकतोस.तू अनेक ऐरागबाळ्याच्या इच्छा पुर्ण केल्या आहेस‌ .मी तूझी भक्ती देखील केली आहे,तरी माझ्या इच्छा पुर्ण करच,अशी विनंती या गाण्यातून केलेली दिसते. थोडक्यात तो देवाकडे सुखाची मागणी करतो.

जगातील प्रत्येकाला भलेही वेगवेगळ्या पद्धतीने मागत असेल,मात्र हवे तर हेच असते ना ? आणि म्हणूनच हे गाणे ठरते,जगातील प्रत्येकाची इच्छा उघड करणारे गाणे

मुळ गाणे ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/IU2ttJ73h2Y?si=dZUQVxu25roG_CY-


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास