पोस्ट्स

मानवी भूगोलाच्या निकषावर भारताची प्रगती आणि मी

इमेज
                सध्या भारताच्या प्रगतीविषयी विविध दावे केले जातंय . त्यातही बहुसंख्य  ठिकाणी पक्षीय राजकारण केलं जातंय . त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मान्य  होईल अश्या मार्गाचा विचार केला असता शात्राचा विचार करणे संयुक्तिक  होईल असे वाटून मी हा लेखन प्रपंच करत आहे .  " मानवी भुगोल" या भुगोलाचा उपशाखेच्या सिध्दांतांवर भारताच्या प्रगतीचे मुल्यमापन केल्यास भारताच्या प्रगतीचे खरेचित्र समोर येते. असे मला वाटत असल्याने त्यावर मी केलेले हे विवेचन आहे.             मानवी भूगोलाची उपशाखा असलेल्या लोकसंख्या भूगोलाच्या लोकसंख्या सिद्धान्तानुसार लोकसंख्या वाढीचे ५  टप्पे असतात . पहिल्या टप्यात खूप लोक जन्माला येतात आणि तितकेच लोक विविध आजारांनी मृत होत असतात. दुसऱ्या टप्यात देशाची स्थिती सुधारली असल्याने   कमी लोक साथीच्या आणि अन्य रोगांनी मारतात  मात्र जन्माला अधिक लोक येतात परिणामी देशाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते देशाच्या साधन संपत्तीवर प्रचंड ताण येत...

एक राष्ट्र एक निवडणूक निव्वळ अशक्यच

इमेज
सध्या एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर विचारमंथन सुरु आहे . माझ्या मते ही संकल्पना राबवतांना येणाऱ्या खर्चाबाबत फक्त भाष्य केले जाते  जे या प्रश्नाची फक्त एकच बाजू दशर्वते . प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात , त्यातील दुसऱ्या बाजूचा लेखाजोखा मांडण्यासाठी लेखनप्रपंच आपल्या कडे ईव्हीएम यंत्रामार्फत निवडणूका घेतल्या जातात . सध्या भिन्नभिन्न वेळी निवडणूका घेत असल्याने एकच इव्हीएम यंत्र वारंवार वापरता येते . एकत्रच निवडणूका घेत असल्यास किती ईव्हीएम मशीन  लागतील, आणि एकदा वापरल्यावर परत पाच वर्षांनीच त्याचे काम, येवढी यंत्रे सांभाळयाची ती कशी ? आणि आपल्याकडील एका ईव्हीएम मशीनमध्ये एका वेळी फक्त सोळा नावे अंतर्भुत करता येतात . देशातील पक्षांची आणि अपक्षांची यादी बघता यावर कात्री लावल्याशिवाय एका इव्हिएम वर सर्व नावे येणे अशक्यच, म्हणजे लोकशाहीच्या तत्वावरच घाला घालावा लागणार . म्हणजेच ही संकल्पना कितीही स्त्युत असली तरी राबवतांना अनेक अडचणी येणार . त्यावर तोडगा काढल्याशिवाय ही संकल्पना राबवणे धोक्याचे ठरेल यात शंका नाही

मी आणि माझे वाचन ऑगस्ट १३, २०१८

इमेज
मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल. काही दिवसापुर्वी मी पेपर स्टाँलला भेट दिली असता जाणवले की काही कार्टुन काँमिक्सचा अपवाद वगळता बहूतेक बालसाहित्य बंद झालंय .रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय . पुढे माध्यमिक शाळेत असताना शाळेतील ग्रंथपालांनी माहितीपर पुस्तकांची गोडी लावली त्यामुळे माझे ज्ञान समृद्ध होण्यास मदत झाली . मी लहानपणी नाशिक येथील सार्वजनिक वाचानालयाचा बालविभागाचा सक्रिय सभासद होतो.

स्मरण दिग्गजांचे

इमेज
                     वर्षातील काही दिवस विलक्षण असतात. १३ ऑगस्ट  सुद्धा अश्या विलक्षण दिवसांपैकी एक दिवस. हा  दिवस मराठी साहित्य विश्वात  दोन  साहित्यकीकांच्या मुळे विशेष महत्वाच्या आहे. पाहिले म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अणि दूसरे म्हणजे बालकवी १३ ऑगस्ट हा  दिवस या दोघांचा  जन्मदिवस.                 एकाने आपल्या काव्यप्रतिभेने जनसामन्यानां आनंद दिला तर दुसऱ्याने आपल्या अलौकिक प्रतिभेने भल्या भल्या लोकानां भुरळ घातली . एकाने आपल्य प्रतिभेने लोकांना आनंद सर्व  सृष्टीमध्ये असल्याची जाणीव करू दिली . निसर्गाचे सौंदर्य आपल्या प्रतिभेने लोकांना दाखवले.  तर दुसऱ्याने मानवाच्या रोजच्या जगण्यातील विसंगती अचूक टिपुण तीला .आपल्या बुद्धि चातृर्याने वेगळा साज चढवला      . माझ्याकडून या दोन्ही साहित्यिकाना विनम्र अभिवादन  स्मरण दिग्गजांचे 

समानता अशक्यच

इमेज
भारतात सध्या आरक्षण किंवा अन्य मार्ग वापरून समानता आणण्याची स्पर्धा सुरु आहे. माझ्या मते  जे कदापि शक्य नाही . महाभारपासूनच्या काळापासूनच जरी विचार केला तरी , आपणास समाजात विषमताच दिसते , अश्वथामा असो किंवा कृष्णाचा मित्र असणारा सुदामा असो आपणास गरीबी दिसते , याच मार्गाने विचार केल्यास आपणास आपणास दिसते की समाजात सधन अणि कमकुवत वर्ग हे रहणारच जगाच्या सुरवातीपासून हे वर्ग अस्तिवात आले  . अणि जगाच्या अंताबरोबरच हे भेद  लयास जातील. सर्व मानव जात  सामान ही कल्पना म्हणून योग्य असली तरी ही कल्पना प्रत्यक्षात येणे अवघड आहे .  अणि ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर मनुष्याला काहीच काम नसल्याने मनुष्य कही काम न केल्याने लायस जाईल . मनुष्यात भेद आहे म्हणून तर मनुष्य काम करतो

मान्सुम का थांबला ?

इमेज
सध्या आपल्यातील प्रत्येक जन मान्सुमची वाट बघत आहे . हा मान्सुम सध्या अंदमान बेटावर घोघावतो आहे. त्यामुळे सर्वांच्या मानत एकच प्रश्न येत आहे . मान्सुमचे वारे का थांबले त्याची चर्चा करण्यासाठी हा उहापोह हे समजावून घेण्यासाठी आपणास काही संकल्पना माहिती असणे अत्यावश्यक आहे . (1)सध्या सूर्य उत्तर गोलार्धात स्थिर असल्याने . पृथ्वीचा उत्तर गोलार्ध जास्त तापतो . तर दक्षीण गोलार्ध कमी तापतो  . (2)पाणी आणि जमीन यामध्ये पाणी लवकर तापते .जमीन उशिरा तापते. (3)वारे नेहमीच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात . सबब सध्याचा कालावधीत उत्तर गोलार्धात वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहत असतात . (4)तापलेल्या भागातील हवा वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि तिथे कमी दाबाच्या प्रदेश तयार होण्याची शक्यता असते . (5) निसर्गाची सदैव सर्वञ सारखा दाब राहील असे वातावरण ठेवण्याची प्रवृती असते त्यामुळे एखाद्या ठिकाणी कमी दाबाचेक्षेञ निर्माण झाल्यास सभोवतिलची जास्त दाबाच्या हवेकडुन संबंधीत पोकळी भरण्याचा प्रयत्न केला जातो . पृथ्वीचा स्वांगभ्रमणामुळे (पृथ्वी स्वत:भोवती पश्चीमेकडून पुर्वेकडे  फिरते त्यास स्वा...

टोल नाका जीव वाचण्याचे साधन मे २७, २०१६

इमेज
दिनांक 25 मे रोजी  पहाटे मुंबई  पुणे एक्सप्रेस हायवेवर पुण्यातील नामवंत बांधकाम व्यवसाईक दि एस कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला त्यात त्यांचा चालकाचा जागीच मृत्यू झाला .याच महामार्गावर भक्ती बर्वे आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला होता (आज भारतात सर्वाधिक मृत्यू हे हार्टफेल आणि रस्ते अपघात या दोन कारणाने होत आहेत . ) या अपघातामागे रस्त्याचा उभारणीतील दोषांचा उहापोह माध्यमांव्दारे होत आहेत . रस्ते उभारणीतील हे दोष दुरुस्त होतीलच पण त्याला काही कालावधी द्यावाच लागेल लगेच करायचे उपाय लक्षात घेतल्यास आपणास टोल नाक्याचे महत्व दूर्लक्षून चालणार नाही , आपणास दोन टोल नाक्यातील अंतर माहिती असतेच ते अंतर सूरक्षीत पणे पार करण्यासाठी किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकतो . समजा तो कालावधी य आहे आता आपल्याला एकच करायचे .ते म्हणजे एका टोलनाक्यावरुन दूसर्या टोरलनाक्यावर जाण्यासाठी क्ष रुपये टोल  असेल तर य कालावधीत पोहचणार्या वाहनांना टोल मधून काही प्रमाणात सवलत द्यायची तर य कालावधी पेक्षा कमी काळात हे अंतर पार करण्यार्या वाहनांना क्ष या रक्कमेच्या चार ते पाच पट टोल भरायला लावल्यास लोक आप...