पोस्ट्स

कांदयाने आणले डोळ्यात पाणी

इमेज
       भारतातील प्रमुख कांदा उत्पादक   क्षेत्र असलेला नाशिक जिल्हा सध्या चर्चेत आहे तो कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे . अवघा १०० रुपये भाव दर क्विंटल मागे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये . परिणामी अत्यंत मातीमोल भावाने कांदा    विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून देण्याकडे शेतकऱयांचा कल   आहे . या मागच्या कारंणाची   मीमांसा केली असता आपणास लक्षात येते की या मागची सर्व करणे मुख्यतः सुलतानी आहेत . गेल्या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांन   भरभरून कांद्याचे उपादान घेतले . मात्र सुलतानी संकटामुळे त्या कांद्याला बाजारपेठांचा उपलब्ध नाहीये परिणामी मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे .त्यामुळे भाववाढी मुळे शिला दीक्षित अश्या सारखा राजकरण्याना रडवणारा कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे                              ना...

महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्यातील एसटी एक तुलना

इमेज
                मी नुकताच पुणे नाशिक कर्नाटक परीवहन महामंडळाच्या व्होल्वो गाडीने  तर नाशिक पुणे गुजरात परीवहन महामंडळाच्या साध्या बसने  प्रवास केला. त्यासाठी मला  अनुक्रमे 460 आणि 260 रुपये लागले .  त्यावेळी आलेल्या अनुभवाचे हे कथन               महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या शिवशाही या बसचे नाशिक पुणे भाडे 410 रुपये आहे. याउलट अत्यंत कमी कर असल्याने कर्नाटकच्या व्होल्वाबस चे भाडे 460 रुपये आहेत. आता नाशिक पुणे शिवनेरी बंद आहेत. मात्र त्या जेव्हा चालू होत्या तेव्हा त्यांचे भाडे 600 रुपये होते. शिवनेरी बस बंद केल्यावर 18% भाववाढ करण्यात आली . त्यानुसार त्यांचे भाडे 108 रुपयांनी वाढून 708 रुपये झाले असते . मी गुजरातच्या बस डायव्हर यांच्यासी एकदा बोललो असता त्यानी सांगितले होते की "आम्ही महाराष्ट्रात ज्या  सेवा देतो  त्यांचे वेळापत्रक  महाराष्ट्र तयार करतो  जर आम्ही तयार केले तर तुमचे डब्बे मोकळे फिरतील...

संसद हल्याच्या निमित्याने

इमेज
आज १३ डिसेंबर २०१८ . आजच्याच  दिवशी १७ वर्षांपूर्वी   म्हणजे १३ डिसेंबर २००१ ला पाक पुरस्कृत जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या  अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर भ्याड हल्ला केला .  खासदारांच्या गाडीवर असणारे स्टिकर आपल्या गाडीवर  लावून आलेल्या अतिरेक्यांनी संसंसदेवर हल्ला केला ज्यात एका पत्रकार २ संसदेच्या कर्मचाऱ्यांसह ७ जवान  शहिद झाले. तर १८ जण जखमी झाले .  यावेळी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या सुरक्षा रक्षकांना यश मिळाले .तर एका अतिरेक्याने आत्मघातकी स्फोट करून स्वतःला उडवून दिले .   देशाच्या सर्वोच्च ठिकाणी करण्यात आलेल्या या हल्याने त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता कालांतराने या कटाची पाळेमुळे खणून काढत या काटातील सुत्र धार मूळचा  काश्मिरी   आणि दिल्ली येथील विद्यापीठातील प्राध्यापक अफजल गुरु  .याला पकडून नंतर फाशी देण्यात आले .                          ...

ख्रिस्तीबहुल राज्यातील हिंदुत्व

इमेज
              ११ डिसेंबर २०१८ रोजी भारतातील ५ राज्यातील विधानसभेच्या   निवडणुकीचे   निकाल   लागले  .  आणि   समस्त   वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत काँग्रेसची घोडदौड आणि भारतीय जनता पार्टी ची पीछेहाट यावर चर्चा सुरु झाल्या . मात्र या मध्ये किमान   मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सुटलेला मुद्द्यावर वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच                    या निवडणुकीत जवळपास १०० % लोकसंख्या   ख्रिस्ती धर्माच्या   असलेल्या मिझोराम मध्ये भारतीय जनता    पार्टी या हिंदुत्व या विचारसरणीवर असलेल्या पक्षाचा झालेला प्रवेश . काही जण म्हणतील मिझोराम मध्ये किती खासदार आहेत त्या राज्यातील घडामोडींचा देशाच्या राजकारणावर कितीसा तो परिणाम होणार ?      त्यांना मी सांगू   इच्छितो की , भलेही मिझोरामची राजकीय ताकद अत्यल्प असली तरी , त्यातील समाजजीवनातील हिंदूंचे ...

सुयोग्य व्यक्तीला मतदान, भष्ट्राचाराला मुक्ती

इमेज
माझ्या या आधीच्या दोन ब्लॉग पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यावर  फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये लोकप्रतिनिधींवर प्रचंड प्रमाणांत राग व्यक्त करण्यात आला होता . ते प्रचंड भष्ट्राचारी असल्याचा सर्वसाधारण सूर होता . या प्रतिक्रियांबाबबत विचार करताना " क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे " या वचनाला जागून काय करता येईल याबाबत विचार करताना मला सुचलेलले उपाय तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन         आजची निवडणूक प्रचंड प्रमाणात खर्चिक झाली आहे. मात्र सध्याच्या कायदान्वये मान्य असणारा  खर्च अत्यंत तुटपुंजा आहे ,  त्यामुळे लोकप्रतीनिधीद्वारे मान्य असणाऱ्या खर्चापेक्षा जो अतिरिक्त खर्च केला जातो त्यातून काळ्या पैशाची निर्मिती होते. हा काळा  पैसे निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अनुचित मार्गाचा अवलंब केला जातो , ज्यास आपण भष्ट्राचार असे म्हणतो . माझ्यामते हे दुष्ट चक्र भेदायचा असल्यास कायदान्वये मान्य  असणारा खर्च  सध्याचा तुलनेत वाढवण्यात यावा . उमेदवारांना जास्त पैसे का खर्च करावे  लागतात ,  याचा विचार केल्यास आपणास सहज लक्षात येते की निवडणु...

का हवा रॉबिनहूड

इमेज
माझ्या कालच्या नाशिक महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांच्या विषयी पोस्टवर फेसबुकवर झालेल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी ही पोस्ट आहे.कालच्या लेखाची  लिंक तुम्ही या लेखाच्या खाली बघू शकता . बहुतेक लोकांनी माझ्यावर मी राजकारणी लोकांची बाजू घेत असून प्रामाणिक पणाला तिलांजली देत असल्याचा आरोप केलाय . त्यांना मी सांगू इच्छितो की  मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही . त्यामुळे राजकारणी लोकांची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही . तर सपर्धापरीक्षेची  तयारी करणारा विद्यार्थी आहे. माझ्या फेसबुकवरील पोस्टचा सर्वसाधारण सुर मुंढेंच्या कडक शिस्तीला कंटाळून नगरसेवकांनी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केल्याने नाशिकचे भले करणारा अधिकारी नाशिक सोडून गेला त्यांना मी सांगू  इच्छितो की , ज्या प्रमाणे आत्मविश्वास (कॉन्फिडन्स ) आणि अति आत्मविश्वास९ओव्हर कॉन्फिडन्स ) यात फरक असतो त्याचा प्रमाणे कडकपणा आणि हेकेखोर पणा यात फरक असतो . मुंढेंचा कडकपणा हा अतिरेक होता आणि "अति सर्वत्र वर्जयत्ये "या संस्कृत सुभाषितांप्रमाणे तो त्याजच होता . माझ्या कालच्या लेखनावर दुसरा आक्षेप असा घेतला गेला...

मुंढे पर्वचा अस्त

इमेज
             ज्याचे कुणाशीच पटत नाही , अश्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातच दोष असतो . या अर्थाचे एक दासबोधात वचन आहे. हे सांगायचे कारण की नुकतेच माजी झालेले नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे . यांची झालेली बदली .                आपल्या भारतात लोकशाहीचे ४ स्तंभ आहेत . श्री तुकाराम मुंढे ज्या यंत्रणेचे भाग आहेत ती प्रशासन व्यवस्था ,त्यातीलच एक . मात्र त्यांचे त्यांनी जिथे इथे कार्य केले  त्या प्रत्येक  स्थानिक लोकप्रतिनिधींसी  व्यवस्थेशी त्यांचे खटके उडाले . जे माझ्या मते सर्वथा अयोग्य आहे. एका ठिकाणचे लोकप्रतिनिधी सडके असू शकतात . मात्र सर्वच लोकप्रतिनिधी चुकीचे हे सर्वथा ना पटणारेच आहे. भारताच्या ४ लोकशाही स्तभांपॆकी एका स्तंभाच्या हा पूर्णपणे अपमान ठरतो .                     भलेही तुकाराम मुंढे चांगले करण्यासाठी धडपड असतील मात्र कोणतेही कार्य करण्याची एक प्रक्रिया असते . जी नाशिक महानगरपालिकेत पाळली गेली नाही  द्योतक आहे ...