पोस्ट्स

कर्तारपूर गुरुद्वारा,कलम 370 समस्येची अप्रकाशित बाजू

इमेज
सध्या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केलेल्या भारतीय संविधानातील कलम 370आणि कलम 35A ची जोरदार चर्चा सुरु आहे .  या  सर्व  चर्चांमध्ये  मुख्यतः जोर आहे तो काश्मीरमधील भविष्यकालीन विकास आणिरद्द करण्यात आलेल्या कलमाबाबत असणारी पाकिस्तानची भूमिका  . पाकिस्तानच्या विचार करता आपल्या भारतात फक्त व्यापारी संबंध  आणि क्रीडा संबंध लक्षात घेतले जातात. मात्र भारत आणि पाकिस्तान यांचा विचार करता या दोन  बाबींबरोबरच अजून एक गोष्ट लक्षात घेण्यास हवी मात्र ती काहीशी दुर्लक्षली जाते ती म्हणजे या दोन देशामध्ये संयुक्तरित्या सुरु असणारे विकास प्रकल्प .  या विकास प्रकल्पामध्ये कर्तारपूर या पाकिस्तानातील पंजाबमध्ये असणाऱ्या गावामध्ये उभारण्यात येणारा कर्तारपूर साहिब गुरुद्वारा आणि भारतीय हद्द या दरम्यान उभारण्यात येणार कर्तारपूर कौरीडॉर हा अत्यंत महत्वाचा आहे          शीख बांधवांचे पहिले गुरु , गुरु नानकदेवजी यांच्या आयुष्याची अखेरची वर्षे ज्या गुरुद्वारात गेली तो गुरुद्वारा  म्हणजे कर्तारपूर येथील...

विश्वासाह्य माध्यमांची व्याख्या

इमेज
                  भारतात घडणाऱ्या काही घडामोंडीवर मी फेसबुकवर भाष्य करणाऱ्या पोस्ट पेस्ट केल्या होत्या .त्यावर  प्रतिक्रिया देताना माझ्या फेसबुकवरील मित्रांनी मला एकांगी माध्यमांपासून दूर जात निष्पक्ष माध्यमांनी केलेल्या बातम्या बघण्याचा सल्ला दिला .त्यांनी मला काही माध्यमांची नावेही सुचवली . माझ्या मित्रांच्या मते निष्पक्षी असणारी माध्यमे मुळात एका विशिष्ठ विचारसरणीची असल्याचे मला आढळले .माझ्या मित्रांचा कल देखील त्या विशिष्ठ विचारसरणीकडे असल्याने त्यांनी त्यास निष्पक्ष असल्याचे प्रमाण पत्र दिले होते .                          माझ्या मित्रांना मी कोणत्या माध्यमाचा बातम्या बघतो, हे सांगितल्यावर त्यांनी ते एकांगी , भारताची प्रगती न बघवणार्या समुहाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे सांगितले .  मी बघत असणारी माध्यमे सरकारवर टिका करण्यात आघाडीवर आहेत . त्यामुळे त्यांना एकांगी असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले होते .                 ...

अवयवदान श्रेष्ठदान

इमेज
   जवळपास सर्वधर्मीयांमध्ये दानाचे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे . प्राचीन काळी जेव्हा ज्या गोष्टी त्यावेळच्या समाजाला ज्ञात होत्या . त्यातील सर्वाधिक समाजोपयोगी वस्तूंचे दान त्यावेळी करायला  सांगितले होते  . ज्यामध्ये धान्य , विविध वस्तू आणि आर्थिक वस्तू यांचा समावेश होता . समाज नेहमी प्रगतशील असतो , समाजाच्या जगण्याच्या पध्द्तीत कायम बदल होत असतो त्यानुसार दानाच्या गोष्टी देखील बदललेल्या आपणस दिसतात , . सध्याच्या विविध आरोग्याच्या समस्यासनी माणसे ग्रस्त असताना जर दान करायचे झाल्यास ते मानवी अवयांचे करणे अधिक संयुक्तिक आहे . मानवाने आज कितीही प्रगती केलेली असली तर हात पाय वगळता अन्य मानवी अवयव मानवास अद्याप तयार करता आलेले नाहीत . त्यामुळे  अवयवदानाचे   महत्व आयनोसाधारण आहे . हे महत्व समाजाला समजावे म्हणून संयुक्त राष्ट संघातर्फे १३ ऑगस्ट हा दिन आंतर राष्ट्रीय अवयदान म्हणून साजरा करण्यात येतो .                 आपण आपल्या शरीराचे मूत्रपिंड, फुफ्फुसे ,  हृदय ,  डोळे, ...

किती चटकन् कप्पाबंद करतो आपण ?

इमेज
माझ्या एका ब्लॉग  पोस्टवर एका मित्रांशी संभाषण करताना  एका महान व्यक्तिमत्वाच्य विषय निघाला . माझी पोस्ट ही  पत्रकारितेच्या संदर्भात असल्याने माझे मलाच आश्चर्य वाटले . कारण मित्राने  सांगतीतलेल्या व्यक्तीविषयी अनेकांना अत्यंत तटपुंजी माहिती असते . त्यांचे स्वातंत्रोत्तर भारताची उभारणी करण्याचे  कायदेशीर योगदान , एका समाज घटकांच्या बाबतीत त्यांनी उभारलेला लढा इतकीच त्यांच्याविषयीची सर्वसामान्यांना माहित  असते . मात्र  सर्वच मोठ्या व्यक्तींचे कार्य अनेक क्षेत्रात असते .  मात्र अनेकदा त्यांच्या ठराविक क्षेत्रातील कार्यालाच अधिक प्रसिद्ध  होते . त्यांचे अन्य क्षत्रटातील कार्य काहीसे झाकोळले जाते .         जसे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीतील योगदान आपणास माहिती असते . मात्र ते पत्रकार . अर्थतज्ज्ञ देखील होते , हि गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असते . महात्मा गांधी म्हंटले  की त्यांचे अहींसात्मक  आंदोलन आपणास माहिती सरते मात्र ty यांचे शिक्षणविषज्ञक कार्य आपणास माहिती नसते . लोकमान्य ...

आगरकरांचा वारसा चालवणारा पत्रकार रविशकुमार

इमेज
सध्याचा माध्यमांवर विश्वासाह्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना,  ज्याप्रमाणे अत्यंत  मिट्ट काळोखात एखादी मिणमिणती पणती मोठा उजेड देऊन जाते .आज जरी गडद काळोख असला तरी उद्या सोन्याची पहाट  होणार आहे  अशा विश्वास देते असेच एक नाव सध्या माध्यमात गाजते आहे . ते म्हणजे एन दि टी व्ही  या वृत्तवाहिनीवरील कार्यकारी संपादक , ज्येष्ठ  पत्रकार रवीश कुमार . कोणतीही पारिवारिक पाश्वभुमी नसताना बिहारसारख्या भारतातील अत्यंत मागास भागातून नवी दिल्लीत येऊन स्व कष्टातून पत्रकारितेत  स्वतःचे अढळ स्थान निर्माण  करणारा हा पत्रकार . या वर्षीचा आशिया खंडातील नोबेल समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगसेसे या 6 विविध क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या  पुरस्कारांपैकी पत्रकारिता या क्षेत्रात दिल्या गेलेल्या  मानकरी . म्हणजे रवीश कुमार .      सत्ताधिकाऱ्यांचा विरोधात कायम आवाज उठवून माध्यमांची जागल्याची भूमिका पार पडणारा पत्रकार इष्ट असेल ते करणारच  , योग्य असेल ते बोलणारच  याची आठवण करून देणारा पत्रकार म्हणजे रवीश कुमार . माझ्या आकलनानुसार दो...

काश्मीर , भुराजनैतिक स्थानामुळे बनलेले अग्नीकुंड

इमेज
सध्या आपल्या भारतात राष्ट्रीय स्तरावर एकच मुद्दा चर्चीला जातोय , तो म्हणजे काश्मीर . केंद्र सरकारतर्फे  सध्या काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात  सैन्य तैनात केलं जातंय . लवकरच काश्मीर संदर्भात मोठा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे बोलले जातयं . त्या पार्श्वभुमीवर काश्मीरच्या भु राजनैतिक स्थानाविषयी मी तूमच्याशी संवाद साधणार आहे . कोणत्याही प्रदेशाच्या बाबतीत हे भू राजनैतिक स्थान अत्यंत महत्वाचे असते . सिंगापूर या देशाची अत्यंत कमी कालावधीत प्रचंड प्रगती झाली . पाकिस्तानला अमेरिका सर्वोतपरी मदत करते . याला त्या त्या प्रदेशाचे भू राजनैतिक स्थानच कारणीभूत आहे . या  भू राजनैतिक स्थानाचा अभ्यास मानवी भूगोल या भूगोलाच्या मुख्य शाखेतील राजकीय भूगोल या उपशाखेत करण्यात येतो .             तर आपले काश्मीर भू राजनैतिक स्थानामुळे  अग्नीकुंड  बनले आहे. ज्यांना काश्मीरचे भोगोलिक स्थान माहिती आहे . त्यांना हे माहिती आहे  की पाकव्याप्त काश्मीर सह संपूर्ण काश्मीरचा विचार करता जगातील सर्वात मोठे मानवास  सहज वापरण्यासारखे पाणी य...

व्यक्तिस्वातंत्र्याचा मोठेपणा आणि संविधानाच्या हक्काचे हनन

इमेज
               आपल्या भारतीय संविधानात कलम १२ ते ३२ पर्यत व्यक्तीचे मूलभूत अधिकार दिले आहेत .कोणतीही व्यक्ती संस्था  दुसऱ्या व्यक्ती संस्थेबाबाबत या अधिकाराचे हनन करू शकत नाही . जर  अशा प्रयत्न केल्यास पीडित व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते . अगदी राष्ट्रीय आणीबाणीत सुद्धा यातील काही कलमाचा सरकार संकोच करू शकत नाही . कलम १५ हे यापैकीच एक . हे सांगायचं कारण म्हणजे नुकतीच जबलपूर येथे घडलेली एक घटना . या घटनेत एका मनोविकृत व्यक्तीने एका खाद्य सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून काही खाद्य मागवले . संबंधित कंपनीचा डिलिव्हरी बॉय अन्य धर्मियांचा असल्याने संबंधित मनोविकृत व्यक्तीने त्याच्याकडून अन्न स्वीकारण्यास नकार दिला . या मनोविकृत माणसास वाटले असेल , आपण आपल्या धर्मांचे पालन केले . मात्र संबंधित ,मनोविकृत व्यक्ती हे विसरली की स्व धर्माचे पालन करताना त्यांनी भारतीय संविधानात सांगितलेल्या मूलभूत हक्कच्या अधिकाराची गळचेपी केली आहे .           आपल्या भारतात घटनेला सर्वोच स्थान आहे . अन्य बाबी त्या पुढे गौण आह...