पोस्ट्स

यात्रिगण कृपया ध्यान दे ........

इमेज
          "यात्रिगण कृपया ध्यान दे ट्रेन नंबर 123456 सोयीसुविधा एक्सप्रेस थोडीही देर मै प्लेटफ्रॉम क्रमांक दों पर आनेवाले है !", अश्या प्रकारचा उद्घोषणा आपण रेल्वेस्टेशनवर अनेकदा ऐकतो . मात्र लवकरच त्याचे स्वरूप बदलले जाण्याची नितांत शक्यता आहे . आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे . केंद्र सरकारचा रेल्वेबाबतचा एक निर्यय . रेल्वेच्या साधन सामुग्रीचा वापर करत खाजगी उद्योजकांना आपली स्वतःची रेल्वेसेवा सुरु करू देण्याचा निर्णय .  कदाचित त्यामुळे आपणास सुपरिचित  असलेली उद्घोषणा "May have attentions  pleas , train number  123456 "Suwidha Express will be arrived on platform number 2 . या उद्घोषणेमध्ये खाजगी रेल्वे चालकांचा समावेश होऊ शकतो . त्यामुळे सध्या ज्या प्रमाणे विमान प्रवास होतो , त्याप्रमाणे नागरी हवाई प्राधिकरणाच्या मार्फत उभारण्यात आलेल्या विमानतळ आणि अन्य सोइ सुविधा वापरत खाजगी विमान कंपन्या सेवा देतात तसे चित्र उभे राहू शकेल .यामुळे भारतीय रेल्वेचा तोटा भरून निघून सध्या प्रचंड तोट्यात असंलेली भारतीय रेल्वे नफ्यात येईल असे कारण सरक...

नाम साधर्म्यच्या निमित्याने

इमेज
                                कालचीच गोष्ट आहे. एका व्याख्यानाच्या निमित्याने मी एका सभागृहात बसलो होतो . व्याख्यान भारतीयांनी भारतीयांसाठी भारतात आयोजित केले असल्याने ते भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणार , हे ओघाने आलेच . व्याख्यान कोणत्या विषयाविषयी,  होते ? व्याख्यानात वक्ता काय,  बोलला? या विषयी आपणास नंतर कधीतरी सांगेल . मला तुमचे लक्ष वेधायचे आहे . ते अन्य एका मुद्यावर . तर भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणाऱ्या या व्याख्यानाला मी  मात्र आमंत्रण पत्रिकेवर सांगितल्याच्या दहा  मिनटे आधी आल्याने  थोडा  वेळ घालवण्यासाठी शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलणे सुरु केले . संबंधित व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या तालुकयातील एका गावाची रहिवासी होती . मात्र संबंधित व्यक्तीने तिची ओळख सांगताना अहमदनगर अशी सांगितली . मी नुकतीच अहमदनगर शहराला भेट दिली असल्याने , त्यांना अधिक बोलत करण्यासाठी मी तुम्ही माळवाडी परिसरातील का ? तुम्ही भिंगारला परिसरात राहता का ? तुम्ही तेली चौकात र...

पर्यटनाच्या निमित्याने ......

इमेज
                          आपण अनेकना सांगताना बघतो की ,  मी पर्यटनाच्या निमित्याने  अनेक भागांमध्ये , शहरात फिरतो . मात्र एका प्रश्नाचे ते अजिबात उत्तर देत नाहीत, तो म्हणजे पर्यटन करतात , म्हणजे  ते नक्की काय करतात ? ते ज्या नव्या प्रदेशाना भेटी देतात , तिथल्या लोकांमध्ये सहभागी होतात? तेथील स्थानिक परिवहन व्यवस्थेने फिरतात की ? की तेथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात ? मी स्वतः अनेकदा विविध राज्यांच्या परिवहन सेवा जसे गुजरात राज्य परिवहन महामंडळ , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळ वगैरे . आदींनी फिरतो . मी संबंधित ठिकाणी फिरण्यासाठी प्रामुख्याने सध्या बसेस वापरतो . तसेच बसेसमध्ये शक्यतो खिडकीची जागा घेण्याचा माझा कल असतो . प्रवास रात्रीचा असेल तरी मी प्रवासात शक्यतो झोपत नाही . रात्रीच्या अंधारात काय बघतो ? असा सहप्रवाशांच्या प्रश्न असतो . मात्र मी खिडकीची जागा शक्यतो सोडत नाही . मला मी ज्या शहारत जातो, तेथील ऐतिहासिक स्थळांपेक्षा स्थानिक परिवहन सेवांमार्फत फिरा...

"युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " आजच्या काळात वाचायलाच हवे असे पुस्तक

इमेज
                   सध्या आपल्या भारतात सर्वाधिक चर्चीला जाणारा विषय कोणता असेल ? याचा धांडोळा घेतला असता आपणास चीनमार्फत जगात पसरलेला कोरेंना व्हायरस याचा विचार करावाच लागतो .  व्हॉटसपव्दारे या विषयी विविध प्रकारची माहिती सांगितली जात आहे . त्यात काही प्रमाणात खोटी माहिती देखील सांगण्यात येत आहे .  या पार्श्वभूमीवर या विषयाची  मराठीत शास्त्रीय स्वरूपाची माहिती देणारे लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचे " युद्ध जीवांचे -जैविक आणि आणि रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य आजार " या पुस्तकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते . जैविक युद्ध आणि रासायनिक हल्ल्यासारख्या किचकट आणि काहीसा कंटाळवाणा  विषय या पुस्तकामध्ये अत्यंत सहजसोप्या ओघवत्या भाषेत मांडला आहे . पुस्तकाची भाषा काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी असल्याने पुस्तक खूपच रंजक झाले आहे .              पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पध्द्तीने न करता पारंपरिक पद्धतीने केली आहे . पुस्तकाची रचन...

महाराष्ट्र एसटीला पोखरणारी वाळवी

इमेज
                      आपल्या सर्वांची लाडकी एसटी नुकतीच एका दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. एसटीला होणारा तोटा, एसटीला राज्य सरकारला द्यावे लागणारे विविध कर, अन्य प्रवासी  वाहतूकदारांकडून असणारी स्पर्धा आदी मुद्द्यांवर या निमित्याने पुन्हा एकदा विचारमंथन सुरु झाले . या  पार्श्वभुमीवर मला महाराष्ट्र एसटीच्या संदर्भात मला नुकतेच आलेले अनुभव ज्याचा माझा मते एसटीच्या तोट्याशी जवळचा संबध ते आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन          तर मित्रांनो मी नुकताच नाशिक ते अहमदनगर, नाशिक ते  संगमनेर आणि  संगमनेर ते संगमनेर तालुक्यतील विविध गावे अशा प्रवास केला.  या प्रवासादरम्यान मला आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कारभारातील अनेक विसंगती दिसल्या . जसे एकाच वेळी एकाच मार्गावर खूप जास्त प्रमाणात बस चालवणे. परिणामी कोणत्याही बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी न बसने , परिणामी काहिस्या रिकाम्या बस चालवल्यामुळे तोटा होणे . त्याच प्रमाणे बस रिकामी धावत असून देखील बस थांब्यावर ...

नैसर्गिक, ऐतिहासिक, आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका संगमनेर

इमेज
                                                    आपल्या महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक , ऐतिहासिक आणि आध्यत्मिक  गोष्टीनी समृद्ध अनेक स्थळे आहेत . ही स्थळे जर आपणास एकाच वेळी बघायची असल्यास, आपणास ज्या मोजक्या ठिकाणांना भेट देणे क्रमप्राप्त आहे, अश्या ठिकाणाची यादी केल्यास त्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यावेच लागेल, ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात वायव्य दिशेला असणाऱ्या संगमनेर तालुक्याचे              . या तालुक्यातील पेमगिरी या गावात आपणास ऐतिहासिक आणि नैसर्गिक गोष्टींचा मिलाफ बघायला मिळतो , तर त्याच संगमनेर तालुक्यात असणाऱ्या खांडेश्वर आणि निर्झरेश्वर या ठिकाणी आपणास आध्यत्मिक गोष्टीचा प्रत्यय येतो . मी नुकतीच अश्या  नैसर्गिक, ऐतिहासिक,  आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका असणाऱ्या संगमनेर तालुक्यात  माझ्या फेसबुक मित्रांच्या सहकार्याने नुकतेच फिरून आलो , त्यावे...

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस

इमेज
             आपल्या महाराष्ट्राला अत्यंत गौरवशाली इतिहास  लाभलेला आहे हे आपण जाणताच,  त्याचप्रमाणे अनेक भौगोलिक चमत्कार सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहेत . त्यामुळेच असेल कदाचित देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आपल्या महाराष्ट्रात आहेत, आणि हे सर्व जर आपणास एकाच वेळी बघायचे असेल तर .? आपणास महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला अर्थात अहमदनगर जिल्ह्याला भेट देणे क्रमप्राप्त आहे .  काय नाही,  अहमदनगर जिल्ह्यात ?संत ज्ञानेश्वर यांना लोकभाषेतून गीतेवरील भाष्य स्फुरले ते याच अर्थात अहमदनगर जिल्ह्यात अख्या भारताला सहकाराच्या मंत्र याच अहमदनगर जिल्ह्यातून देण्यात आला .  कोळशाच्या राखेतून उभारलेले भारतातील पहिले धरण  भाटघर धरण हे याच जिल्ह्यातील . एक महत्वाचा नैसर्गिक चमत्कार असणारे 4 एकरावरील वडाचे झाड याच जिल्ह्यातील . या  अश्या विविधतेने नटलेल्या जिल्ह्याचे मुख्यालय अर्थात अहमदनगर शहराची बातच काही और . एकेकाळचे उत्कृष्ठ शहरनियोजनाचा मापदंड ठरवणारे शहर म्हणजे अहमदनगर , आपल्या भारतातील सर्व प्रका...