पोस्ट्स

ओळख एका डॉनच्या जडणघडणीची

इमेज
                       दाऊद इब्राहिम कासकर ....... . मुंबईच्या पोलिस दलातील आचरणाने धार्मिक वृत्तीचा असलेल्या  कॉन्स्टेबल  इब्राहिम कासकर याचा मुलगा  अर्थात भारताला हवा असणारा डॉन दाऊद इब्राहिम . या दाऊदविषयी इंग्रजी भाषेत बरेच काही लिहून आलेले आहे . मात्र मराठी मुलखात जन्मलेल्या या डॉन विषयी मराठीत तसे कमीच लिहून आलेले आपणास दिसते .त्यातही मुळातील इंग्रजी भाषेतील  मजकुराचा मराठीत केलेला अनुवादाचं अधिक . याच अनुवादित मजकुराच्या मालिकेतील एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ज्यावर आधारित बॉलीवूडमध्ये शूट आऊट लोखंडवाला हा चित्रपट तयार आला ते पुस्तक अर्थात डोंगरी ते दुबई . मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले . ओघवती सहज सोप्या मराठीत अनुवादित झालेले हे पुस्तक  त्याच्या भाषाशैलीमुळे पाहिल्या बरोबरच मनाचा ठाव घेते               अनुवादकाचे मनोगत , अनुवादित पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाचे हितगुज अशी इतर अनुवादित पुस्तकात दिस...

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 5

इमेज
आज 16 एप्रिल 2020 रोजी आपली भारतीय रेल्वे 167वर्षाची झाली . त्या निमित्याने सर्वप्रथम समस्त रेल्वे कर्मचारी आणि समस्त भारतीयांना मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा . मित्रानो आपली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपकक्रम आहे हे आपण जाणताच . विविध प्रकारच्या एकंदरीत 17 प्रकारच्या प्रवाशाची वाहतूक करणाऱ्या गाड्या या  आपल्या रेल्वेकडून चालवल्या जातात . ( या सर्व गाड्यांची माहिती मी भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 3आणि 4 मध्ये दिलीच आहे .)या 17 प्रकारच्या गाड्यांमध्ये जरी काही  तांत्रिक अडचणीमुळे 24 कोचेस असली तरी ते सर्व एकाच प्रकारचे नसतात . त्यांचे विविध प्रकार त्याचा स्वरूपानुसार पडतात . आता ते पाहूया .  कोचेसच्या खाली कोणत्या प्रकारची चाकांची रचना आहे त्यानुसार त्यांची को -को प्रकारची रचना असलेले आणि बो -बो प्रकारची रचना असणारे अशी विभागणी करता येते . याचा प्रमाणे त्याच्याखाली डब्यातील पंखे चालवण्यासाठी जनरेटर आहे का ? डब्याचे  स्पेंशन कसे आहे यांनुसार आय सी एफ कोच आणि एल येऊ बी कोच असे दोन प्रकार पडतात .   पारंपरिक निळ्या रंगात...

ओळख एका हुकूमशहा सताधिकाऱ्याविषयीच्या पुस्तकाची

इमेज
                      "वाचाल  तर वाचाल, ' "एखाद्या व्यक्तींकडे असणारी ग्रंथसंपदा हीच खरी संपत्ती"  किंवा समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या प्रमाणे , "दिसामाजी काहीतरी ते लिहावे ,प्रसंगी अखंडित वाचित जावे ,शहाणे करून सोडावे जना" अशी आपणास वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी वचने आपणास ज्ञात आहेतच . मात्र अनेकजण आपल्या  दैनंदिन अश्या व्यस्त वेळापत्रकामुळे इच्छा  असूनदेखील आपली वाचनाची भूक भागवू शकत नाही, अश्या लोंकाना सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात मिळणारी सुट्टी देखील कोणत्या पर्वणीसारखीच भासणार ना ? मी देखील या पर्वणीचा सदुपयोग साधत माझे गेल्या कित्येक दिवसापासून शांततेत वाचेल म्हणून  काहीसे दूर ठेवलेले ज्येष्ठ  पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या " पुतीन - महासतेच्या इतिहासाचे अस्वस्थ  वतर्मान " या पुस्तकाचे वाचन केले .   या पुस्तकावर या  आधी बरेच  काही लिहून आले आहे .न्यूज18लोकमत  (त्या वेळेचे आयबीएन लोकमत ) या वृत्तवाहिनीवर...

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

इमेज
                       मी नुकतीच म्हणजे वार रविवार, 15 मार्च 2020 रोजी गुजरातमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या बडोदा ( गुजराती उच्चार वडोदरा )या शहराला भेट दिली . त्यावेळी मला आलेले अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . माझ्या या प्रवासाची सुरवात झाली, ती नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी  शनिवारी . शनिवारी सायंकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने मी नाशिकहून सुरतला प्रस्थान केले आणि माझ्या बडोदा दौऱ्याची सुरवात झाली . दिंडोरी, सापुतारा वाजदा , चिखली मार्गे सुरतला पोहोचल्यावर , माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला . पंधरा वीस मिनिटे सुरतला घातल्यावर प्रवासाच्या दुसऱ्या टप्याला अर्थात सुरत ते बडोदा प्रवासाला सुरवात केली . मला नाशिकहून विनाथांबा बडोद्याला  जाता आले असते . मात्र मी तसे केले नाही , कारण तसे केले असते तर मला या दौऱ्यादरम्यान जो गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या अनुभव घेयचा होता , तो या मुळे घेता आला नसता . तर सुरतेहून रस्तेमार्गे 150किमीवर असणाऱ्या बडोदा (गुजराती उच्चार वडोदरा ...

अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे असणारा जिल्हा ........ जळगाव

इमेज
          आपण अनेकदा एखाद्या गोष्टीला एखाद्या विशिष्ट चष्म्यातूनच बघतो .  त्या गोष्टीला इतर अनेक पैलू  असू शकतात हे आपल्या गावीही नसते . उदाहरणार्थ जळगावला गेल्यावर पर्यटन स्थळे बघायची असल्यास जा अजिंठा वेरूळला वगैरे . मात्र जळगावला गेल्यावर अजिंठा आणि वेरूळ सोडून अनेक बघण्यासारखी स्थळे आहेत जसे साडेतीन गणपतींपैकी एक पूर्ण पूर्ण गणपतीचे स्थान असणारे पद्मालय, ( पुणे परिसरात असणाऱ्या अष्टविनायकांखेरीज महाराष्ट्रात गणपतींची साडेअकरा स्थाने आहेत.  ज्यामध्ये नागपूर परिसरात असणाऱ्या 8 गणपतीचा तसेच या साडेतीन गणपतींचा समावेश होतो ), तसेच उनपदेव आणि मनुदेवी या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या ठिकाणासह अमळनेर येथील भारतातील मोजक्या ठिकाणी असणाऱ्या मंगळाचे  मंदिर वगैरे . मी नुकतीच यातील अमळनेर येथील मंगळाच्या मंदिराखेरीज अन्य तीन ठिकाणी भेट दिली . त्या प्रसंगी मला जाणवलेले तेथील स्थानमहत्व तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन.           मी नेहमीप्रमाणे माझ्या प्रवासाची  सुरवात केली ती  शनिवारी रात्री . मी नेहमी महाराष्ट्र ...

मराठी दिन विशेष

इमेज
                 आपल्या भारतात,  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य , समस्त भारतातला रोजगार हमी योजनेची ओळख करून देणारे राज्य , भारताला सहकाराची ओळख करून देणारे राज्य , महिलांना  शिक्षण देण्याची सुरवात करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे . आणि अश्या प्रतगशील विचाराच्या राज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची ओळख आहे .. जगातील 15 कोटी लोकसंख्येची मातृभाषा असणाऱ्या या मराठी भाषेत नवनवीन विषयावरचे , आधुनिक ज्ञान यावे , मराठीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी , यावर काय करावे?  या बाबत गाठायचा आहे विचारमंथन करणे सोपे व्हावे या उद्देश्याने योजलेला दिन म्हणजे जागतिक मराठी दिन जो 27 फेब्रुवारी रोजी असतो . या दिनानिमित्य समस्त मराठी जनतेला खूप खूप शुभेच्छा .                   हा लेख लिहीत असताना म्हणजेच 26 फेब्रुवारी2020 रोजी मराठीची सद्यस्थिती काय आहे ? आतापर्यंत मराठीच्या उन्नतीसाठी कोणकोणती पाऊले उचलण्यात आली ? आणि याची फलनिश्चिती काय ? याचा मागोवा घेत...

वंदन क्रांतीकारी विज्ञानप्रेमीला

इमेज
                    आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची  जर आपण यादी केली  तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या  गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम  निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?  याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .                     सावरकरांनी आपल्या प्राचीन वारसा लाभलेल्या हिंदू धर्मातील कालसुसंगत नसणाऱ्या  चालीरीतींना  तिलांजली देत त्यास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवले . त्यासाठी त्यांन...