पोस्ट्स

गेली ती नाशिक पुणे रस्त्यातील रंजकता

इमेज
   आजचीच गोष्ट आहे. सहजच व्हाँटसपवर बघत असताना एका व्हाँटसप ग्रुपवर एक पोस्ट दिसली.पोस्टमध्ये मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर झालेले बदल आणि त्यामुळे प्रवाश्यातील मज्जा कशी संपली, हे सांगितले होते. पोस्ट वाचल्यावर मी सातत्याने प्रवास करत असलेल्या नाशिक पुणे रस्त्यातील गेल्या काही वर्षापासुन  झालेले बदल डोळ्यासमोरुन झरझर जावू लागले. ते आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .       नाशिक पुणे रस्त्यातील चंदनापरी घाटाची मज्जा  काही औरच असायची. तेथील वेडीवाकडी वळणे,  गणपतीची मुर्ती याची गंम्मतच काही और होती.  नाशिककडून येताना घाटातील अवघड टप्पा चांगल्या पद्धतीने पार पडल्याबद्दल आभार मानायला आणि पुण्याकडून येताना हा टप्पा चांगला  पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अनेकांचे हात सहजतेने जोडले  जात असे .मी गमतीने मनोमनी  घाटात घाट चंदनापुरी असे माझ्या मित्रांना म्हणत असे.चंदनापुरी घाटातून पुण्याकडे जाताना दिसणारे नेढे(डोंगराला पडलेले  भोक ज्यातून आरपार जाता येईल असे मोठे छिद्र ). तर पुण्याकडून नाशिकला येताना  अवघड वळणानंतर डा...

आत्महत्या एक दुर्लक्षीत जीवघेणी समस्या

इमेज
                 सध्या कोणतीही वर्तमानपत्रे चाळली असता त्यामध्ये आत्महत्येचा बातम्या दिसतातच . एखादे वर्तमानपत्र जर रोज डोळ्याखालून घातले तरी त्या वर्तमानपत्रात आलेल्या दिसतात . आणि या आत्महत्या करणाऱ्या लोकांचा वयोगट जर बघितला तर त्याचा वयोगट प्रामुख्याने  तिशीच्या आतबाहेर असल्याचे आपणास सहजतेने दिसते . खरेतर हे वय काही करून दाखवण्याचे मात्र या वयात हि माणसे आपली जीवनयात्रा संपवतात . मात्र एखाद्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रचंड खाल करणारी आपली पारंपरिक माध्यमे ज्या प्रमाणात  प्रकाश टाकायला हवा  त्या प्रमाणात प्रकाश टाकत नाहीत . असे माझे निरीक्षण आहे .(माझे निरीक्षण परिपूर्ण आहे अशा माझा मुळीच दावा नाहीये ) त्यामुळे या नवमाध्यमाद्वारे त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन             तर मित्रानो अकबर आणि बिरबलाची माकडिणीचीगोष्ट आपल्याला माहिती असेलच एकदा बिरबल अकबर फिरायला गेल्यावरत्यांना  एका मोकळ्या हौदात एक माकडीण आपल्या पिल्लासोबबत खेळताना दिसते,   हे  बघून ...

वंदन दुर्लक्षीत रघूनाथरावांना

इमेज
    आपल्या मराठी लोकांचा इतिहासाकडे नजर टाकल्यास मराठी भाषिकांचा इतिहास दोन रघूनाथरांवांशिवाय पुर्ण होणे अशक्यच. त्यातील एकाला खलनायक असुनही अमाप प्रसिद्धी मिळाली. दुसऱ्या रघूनाथरावांचे कार्य अतूलनीय असून देखील जिवंतपणी आणि मृत्यूनंतर देखील त्यांचा वाटेला उपेक्षाच आली. खलनायक असणारे रघूनाथराव म्हणजे रघूनाथराव पेशवे.तर अत्यंत गौरवास्पद कार्य करुन देखील उपेक्षीत राहिलेले रघूनाथराव म्हणजे गणिताचे प्राध्यापक असणारे श्रेष्ठत्तम समाजसेवक रघूनाथराव धोंडो कर्वे.1888 जानेवारी14 ही त्यांची जन्मतारीख ,म्हणजेच आज 2021 साली त्यांची 133 वी जयंती. त्या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा .         ज्या काळात महिलांचे देखील आरोग्याचे काही प्रश्न असतात, कुटुंबनियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे, याची कल्पना करणे देखील सर्वसामान्य जनतेच्या गावीही नव्हते, अश्या काळात, या विषयांवर समाजात जागृती करण्याचे कार्य  त्यांनी केले. त्यासाठी प्रसंगी बंदीवास देखील भोगला. मात्र कितीही संकटे आली तरी आपल्या तत्वापासून कसुभरही ढळले नाहीत. अविरतपणे ते आपले कार्य करत राहिले. फक्त लोकांना समाजसुध...

राष्ट्रीय भुगोल दिनाच्या निमित्याने -

इमेज
  भूगोल आपल्यापैकी अनेकांचा शालेय स्तरावरील नावडता विषय . . मात्र हा विषय आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त असणारा विषय आहे  . आपण भूगोल विषयाशी पूर्णपणे बांधली गेलो आहे . मराठवाडा हा मागास का आहे ? जागतिक राजकारणात काश्मीरचे महत्व मोठ्या प्रमाणवर का आहे ?  सिंगापूर या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती कशी काय केली ? अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणस भूगोलाच्या विविध उपशाखांच्या अभ्यासाने समजतात ,     भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography  ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography )वगैरे . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .     तो परत स्थापित व्हावा या साठी साजरा करण्यात येतो तो राष्ट्रीय हवामान दिवस . जो मकर संक्रांती च्या दिवशी साजरा करण्यात येतो . त्या निमित्यान...

मकर संक्रातीच्या निमित्ताने(भाग 2)

इमेज
  मकर संक्राती  हा सूर्याशी संबंधित सण असल्याचे आपणस माहिती आहेच . जो  14 जानेवारी  किंवा  15 जानेवारीला साजरा करण्यात येतो  सुर्याचे उत्तरायण आणि  मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो हे ही आपणास माहिती आहेच .त्यातील उत्तरायण आणि मकर संक्राती चा सहसंबंध आपण  याआधीच्या भागात बघितला . आता सूर्य मकर राशीत जातो म्हणजे जय होते ते बघूया ज्यांना उत्तरायण आणि मकर संक्रातीचा संबंदात माहिती वाचायची आहे ते या लेखाच्या खाली दिलेल्या लिंक वॉर क्लीक करू शकतात  तर मित्रानो , पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरते या लंबवर्तुळाचा दोन केंद्रांपैकी एका केंद्राच्या ठिकाणी सूर्य असतो हे आपणास माहिती असेलच (केप्लर चे नियम ) पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचे स्थान बदलते त्यामुळे काही दिवाशांनी पृथ्वीवरून दिसणारे आकाश बदलते . प्राचीन लोकांनी या वर्षभरत दिसणाऱ्या या आकाशाचे बारा भागात विभाजन केले आणि त्यास राशी असे नाव दिले . जसे मकर रास , कुंभ रास मीन रास वगैरे , पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिर...

मकर संक्रातीच्या निमित्याने ! (भाग 1)

इमेज
     14 जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण आहे. सुर्याचे उत्तरायण आणि  मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो. सुमारे हजार वर्षांपूर्वी सुर्याचा मकर राशीत प्रवेश होताना  उत्तरायण सुरु होत असे. मात्र पृथ्वीचा परांचन गतीमुळे यात फरक पडला आहे. सध्या 22 डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरवात होते.  तर दर 70 वर्षांनी मकर संक्रातीचा एक दिवस पुढे जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जन्माचा वेळी 12 जानेवारीला मकर संक्रांत हा सण येत असे, आता हा सण 14 किंवा 15 जानेवारीला येतो. हा फरक का पडतो?  हे सांगण्यासाठी आजचे लेखन .सुर्य अथवा इतर ग्रह एखाद्या राशीत जातो, म्हणजे काय ?(माझी माहिती खगोलशास्त्राच्या दृष्टीने असेल,ज्योतिषशास्त्रानुसार नसेल याची नोंद घ्यावी) माहिती मी याच लेखाच्या पुढील भागात देईल. तर  बघूया मकर संक्रांती आणि उत्तररायण यांचा सबंध उलगडणारी माहिती.         मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यास परीभ्रमण म्हणतात ,तर सुर्याभोवती फिरते, त्यास परीवलन म्हणतात. हे आपणास माहिती असेलच. याशिवाय पृथ्वीला अजून ए...

योद्धा संन्यासी

इमेज
म रगळलेल्या समाजाचा देश जो  स्वतःचे सत्व विसरलेला होता ,त्या देशाला गतवैभवाची आठवण करून देऊन स्वतःत आत्मविश्वास भरणारा , त्याला फिनिक्ष पक्षाप्रमाणे उभारी देणारा , जगातील अन्य देशांना स्वतःच्या देशाविषयी मनातील प्रतिमेत  नकारात्मक प्रतिमेपासून सकारात्मक बदलण्यास भाग पडणारा संन्यासी म्हणजे  स्वामी विवेकानंद , आणि त्यांचा देश म्हणजे आपला भारत देश .  १२ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख . त्याबद्दल त्यांना विन्रम आदरांजली . त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केली जाते .         स्वामीजींनी निव्वळ जगाला भारताविषयीची साप  गारुड्यांच्या देश ही प्रतिमा बदलून थोर ज्ञानाचा देश अशरायलाच लावली असे नव्हे तर , भारतातील गोरगरिबांची सेवा देखील केली . रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही त्याचीच प्रतीके . मी स्वतः रामकृष्ण मठातील युवक वर्गाचा फायदा घेतला आहे . खूप प्रेरणादायी अनुभव प्रत्येकवेळेस मला आला आहे  स्वामी विवेकानंदानी पाशात्य देशात भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली याची सुरवात झाली . ती सर्वधर्म परिषदेत त्यांनी केलेल्या...