पोस्ट्स

चित्रपटश्रुष्टीचे काळे सत्य मांडणारा चित्रपट ,कागज के फुल!

इमेज
कालचीच गोष्ट आहे,सध्याचा महाराष्ट्राचा राजकारणाविषयी मित्राशी बोलताना जब्बार पटेल यांनी निर्मिती केलेल्या आणि मात्तबर अभिनेत्यांचा अभियननाने सजलेल्या  सिंहासनाचा विषय निघाला .आमचे बोलणे नंंतर थांबले, माझे मन मात्र वास्तवदर्शी चित्रपटाचा विषयी विचार करण्यात गढून गेले . आपल्या चित्रपटश्रुष्टीत वास्तवदर्शी चित्रपटांची मोठी संख्या आहे. सध्या अस्या चित्रपटांची संख्या वाढलेली दिसत असली, तरी वास्तवदर्शी चित्रपटांचा यादीत  कृष्णधवल काळातील चित्रपट असलेल्या "कागज के फुल" या चित्रपटाचा समावेश करावाच लागेल. किंबहूना गुरुदत्त  फिल्म प्राडक्शनची निर्मिती असलेल्या "कागज के  फुल " या चित्रपटाचा समावेश केल्याशिवाय ही यादी पुर्ण होवूच शकत नाही. एखादा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक सातत्याने यशस्वी चित्रपट देत असताना चित्रपटश्रुष्टी त्याचाशी किती अबदीने वागते, मात्र एखादा अयशस्वी चित्रपट त्याचा हातातून घडल्यावर एकेकाळी डोक्यावर घेणारी चित्रपट श्रुष्टी त्याचाशी किती तूसडेपणाने वागते. एकेकाळचा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक चित्रपटातील छोट्याशा भुमिकेसाठी कसा नागावला जातो. त्याने स्वतःच्या अनुभवात...

बातम्यांमधील चीन (भाग 2)

इमेज
चीन, आपल्या भारताबरोबर बांगला देशानंतर सर्वाधिक  लांबीची सीमा असणारा , आर्युवेदासारखीच प्राचीन वैद्यकीय उपचार पध्दती असणारा, मुळच्या सोलापूरच्या असणाऱ्या डाँक्टर डाँक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी ज्या देशात आपली वैद्यकीय सेवा दिली तो देश , प्राचीन भारतीय ज्ञानाचे भारतीय सोडून ज्या भाषेत  प्रथमतः भाषांतर झाले, ती चीनी भाषा ज्या देशाची आहे. आपल्या प्रवासवर्णनाद्वारे ज्यांनी भारताची समृद्धी जगासमोर आणली, अश्या प्रवाश्यांचा देश म्हणजे चीन . तर हा चीन सध्या विविध घडामोंडींमुळे गेल्या पंधरवाड्यापासून चर्चेत आला आहे. यातील काही घडामोडी मी या आधीच्या लेखात सांगितल्या आहेत..आता बघूया पुढच्या घडामोडी. तर मित्रांनो, चीनचा  गिलगीट- बाल्टीस्तान, अफगाणिस्तान या भागाला लागून असलेला प्रांत म्हणजे झिंकीयांग (याचा उच्चार काही ठिकाणी सिंकीयांग पण करतात) अर्थात पुर्व तूर्कस्थानात मुस्लिम बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या मुस्लिम बांधवांवर चीन प्रचंड प्रमाणात अत्याचार करत आहे, अशी भुमिका घेवून युरोपीय युनियन आणि  युनाटेड किग्डंम (या युनाटेड किंग्डमला आपल्याकडे इंग्लड असे म्हणतात , मु...

बातम्यांमधील चीन

इमेज
चीन आपल्या भारताच्या पुर्वेकडील देश . जगात लोकसंख्येचा बाबतीत दुसरा , क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसरा , जगात सर्वाधिक देशांबरोबर सीमा शेअर करणारा , तसेच भारताइतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश म्हणजे चीन . हा देश गेल्या पंधरवाड्यात बऱ्याचा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता . त्याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन . तर मित्रांनो , गेल्या पंधरवाड्यात टेस्ला या इलेक्ट्रिक वाहनाची निर्मिती करणाऱ्या कंपनीला देशात नाकरलेला प्रवेश , सौदी अरेबिया या देशाबरोबर केलला वीज निर्मितीचा करार , तसेच अमेरीकेच्या अलास्काया राज्यात केलेली चर्चा यामुळे चीन चर्चेत आला   होता .   भारताचा पाकिस्तानपेक्षा धोकादायक शत्रू चीन आहे , त्यामुळे त्याचा संदर्भातील गोष्टी आपणास माहिती असणे आवश्यक आहे . त्या माहिती करुन घेण्यासाठी आजचे लेखन   तर मित्रानो टेस्ला या कंपनीच्या गाड्या चीनच्या लषकरी आस्थापने तसेच चीनच्या लष्करच्या रहिवासी क्षेत्रात वापरू नयेत असे चीन प्रशासनतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे . या...

एकमेका साह्य करु

इमेज
" एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ", असे आपणाकडे सुप्रसिद्ध वचन आहे. मानवाने एकमेकांना मदत केल्यास सगळ्यांची प्रगती होते, असा या वचनाचा अर्थ आहे. हे वचन ऐकायला खुप छान वाटत असले, तरी आपल्या भारतीयांचे वागणे तसे नाहीये, असा निष्कर्ष एका जागतिक अहवालातून स्पष्ट होत आहे .  तर मित्रांनो,  युनाटेड नेशनच्या एका सहयोगी संस्थेमार्फत 20 मार्च 2021रोजी 7 निष्कर्षाचा आधारे जगातील आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली. या 7 निष्कर्षांपैकी एक निष्कर्ष होता, त्या देशातील नागरीकांना ते वैयक्तिक अडचणीत असताना स्वतःच्या मित्राकडून अथवा नातेवाइकांकडून मदत मिळेल याबाबत किती खात्री आहे. नागरीकांना या बाबत 0 ते 10 या मोजपट्टीवर गुण देयचे होते.0 गुण म्हणजे काहीच मदत मिळत नाही. 10 म्हणजे खुप खात्री आहे. या स्केलवर भारताचे प्रदर्शन खुप खुप वाइट आहे. 156 देशांच्या यादीमध्ये भारताचा या निकर्षावर  क्रमांक आहे 152 . {अहवालामध्ये प्रत्येक निकर्षावर आधारीत देशांची स्वतंत्र यादी देण्यात आली आहे} उरलेल्या 4 देशांमध्ये व्हेनुझ्युउला, हैती, दक्षीण सुदान , अफगाणिस्तान हे देश आहे. म्हणजेच आपण बघू शकता की, हे...

भारताचा वाढता डंका !

आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबर, एका उद्योगजकाच्या घराजवळ स्फोटके आढळण्याचा प्रकारात पोलीस दलातील काही लोक सहभागी असल्याची बातमी देण्यासाठी चडाओढ लागली असताना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत दुरग्रामी परीणाम करणारे बदल सुद्धा होत आहे. माझे आजचे लेखन त्यासाठी .      तर मित्रांनो गेल्या आठवड्याभरात तीन घडामोडींनी भारताचे परराष्ट्र सबंध नव्याने चर्चेत आले. त्यातील पहिली घडामोड म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासमोर चर्चैचा प्रस्ताव ठेवल्याचा दूसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी सुद्धा भारताबरोबर सबंध सुधारण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली. दुसरी घडामोड म्हणजे एकेकाळी भारतीय परराष्ट्र धोरणात अस्पृश्य समजलेल्या गेलेल्या इस्राइलबरोबर भारताने अँल्युमिनीयमचा वापर केलेली बँटरीच्या निर्मितीसाठी केलेले करार. तसेच तिसरी घडामोड म्हणजे जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताने ठेवलेल्या प्रस्तावाला अमेरीकेने मान्यता द्यावी यासाठी अमेरीकेच्या सिनेटमधील (आपल्या लोकसभा समकक्ष) सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांना सादर केलेला प्रस्ताव होय. आता बघूया या सर्...