पोस्ट्स

आता भारतभर एकच नंबर

इमेज
     काही दिवसांपुर्वी पर्यतची ही गोष्ट आहे. ज्यांचा भारतभर बदल्या होतात, अस्या व्यक्तींना त्यांचे वाहन प्रत्येक राज्यात नव्याने नोंदवावे लागत असे. वाहन नोंदवताना प्रत्येक राज्यात रोड टँक्स द्यावा लागत असे. वाहनाचे आयुष्य 15 वर्षाचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे एका राज्यात नोंदवलेले वाहन दुसऱ्या राज्यात नोंदवताना आधीच्या राज्यातून शिल्लक वर्षाचा रोडटँक्स परत मिळत असे.मात्र त्यासाठी विहीत केलेली प्रक्रिया इतकी किचकट होती, की सबंधित वाहनचालकाची अवस्था भिक नको पण कुत्र आवरं असी होत असे. परीणामी एकाच वाहनावर अनेकदा रोड टँक्स सबंधित मालक भरत असे. भारतीय वाहन कायदा 1986 नुसार आवश्यक असणाऱ्या या बाबींमुळे होणाऱ्या त्रासातून मोदी सरकारने वाहन मालकांची सुटका केली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी होणार आहे. ती आहे.        ज्या खासगी कंपनीचे क्षेत्र किमान चार राज्य आहे. त्या कंपनीचे कर्मचारी आणि शासकीय उच्चपदस्थ यांना भारत या नामावलीखाली आपले वाहन नोंदवता येणार आहे. हा लाभ यापूढे नोंदणी होणाऱ्या वाहनांवर लागू असणार आहे. या पुर्वी नोंदणी झालेल्या वा...

वंदन बंडखोर कवियत्रीला

इमेज
  ती काळाचा पुढे बघणारी आधूनिक स्त्री होती, ती ज्ञानपीठविजेती कवियत्री आहे. ती हिंदी , पंजाबी भाषेतील ख्यातनाम कवियत्री आहे. फाळणीपुर्व पंजाबात सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबात तीचा जन्म झाला होता , तारुण्याचा अवखळपणात तीला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सासरच्या मंडळींकडुन प्रचंड अत्याचार सहन करावे लागले, मात्र यातूनच तीची कविता समृद्ध होत गेली.ज्या काळात एखाद्या स्त्रीने विवाहाच्या बंधनात न अडकता परपुरुषाबरोबर राहण्याची कल्पना करणे कोणाच्या मनात येणार नाही, अस्या काळात आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषाबरोबर लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिली ती. मी बोलत आहे, हिंदीतील ख्यातनाम कवियत्री ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम यांच्याविषयी. 31 आँगस्ट हा त्यांचा जन्मदिवस  निमित्याने त्यांना विनम्र आदरांजली     त्या हिंदी पंजाबी भाषेतील ज्ञानपीठ मिळवणाऱ्या पहिल्या कवीयत्री होत्या  हिंदी चित्रपटातील उत्तमोत्तम गाण्याचे गीतकार असणाऱ्या शाहिर लूधीयानवी यांच्या बरोबरचे त्यांचे जीवन विशेष गाजले. मात्र त्यांची स्वतंत्र्य असी काव्यप्रतिभा होती . हे विसरुन चालणार नाही.  अम...

वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

इमेज
         भगवान श्रीकृष्ण यांची  जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात  साजरी  करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण  याना विविध रूपात पुजले जाते .  रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण  ,आदी स्वरूपातील कृष्ण ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा  इतिहासाच्या पौराणिक आणि  भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण  हे  जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा  मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात . माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली  भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग्रंथ नसून मानसिक आरोग्य  कश्या प्रकारे  उत्तम ठेवावे  हे सांगणारा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे .           ...

हत्या 238 वर्षापुर्वीची

इमेज
            आजपासून 238 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. स्थळ शनिवार वाडा पुणे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एका 18 वर्षीय तरुणाचा त्याचा काकांकडून मारेकरी घालवून हत्या केली जाते . हाच तो पेशवाईच्या इतिहासातील नारायण पेशव्यांची राघोबा दादाकडून करण्यात आलेली कुप्रसिद्ध हत्या . आज या इतिहासाला 238 वर्षे पूर्ण झाली आहेत आजपासून 238 वर्षांपूर्वी 1783 ऑगस्ट 30 या दिवसापूर्वी ही हत्या करण्यात आलेली होती या निमित्याने ध चा मा करणे म्हणजे मूळ गोष्टीत विरोधी जाणारी गोष्ट करणे या रथी वाक्यप्रचार रूढ झाली                    पेशवाईच्या अंताची पायाभरणी या गोष्टीतून सुरु झाली असे मानले तर गैर ठरू नये कारण यामुळेअल्पकाळासाठी  मिळालेले पेशवेपद दीर्घकाळ टिकावे यासाठी राघोबादादांनी वसईच्या इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले ज्यामुळे चिमाजी अप्प्पा यांनी पाणी पाजलेल्या वसईच्या इंग्रजांचा पेशव्यांचा राजकारणात प्रवेश झाल्या .पंचतंत्रातील दोन उंदीर आणि एका मांजरीच्या लोण्याच्या वाटपाच्या गोष्टीनीरूप याचा फायदा इंग्रजांनी घेतल...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग 10)

इमेज
               एखाद्याची अपयशाची मालिका झाली की ,  त्याच्या कडून स्वतःच्या अपयशाला साह्य होईल अश्या कृती नकळतपणे घडतात आणि त्याची अपयशाची मालिका अधिक वेगाने घडायला लागतात असे आपल्याकडे म्हणतात सध्या अमेरिकी प्रशासन याच अनुभवातून जात आहे . अमेरिका अफगाणिस्तानमधून पूर्णतः जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे त्या प्रमाणात अमेरिकेचे हे अपयश अजूनच ठळक होत चालले आहे . ज्याची अप्रत्यक्ष कबुली अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्लमिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेचा  आंतराष्ट्रीय विभाग म्हणून ओळखला जाऊ शकेल अशा गट म्हणजेच  खुरासन प्रॉव्हिन्स या गटाने  हल्ला केल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत केली . या पत्रकार परिषदेत त्यांची देहबोली हि पराभूत मानसिकता दाखवणारी होती .काबुल आतंरराष्ट्रीय विमानतळ ज्याला तालिबानच्या पहिल्या पाडावानंतर अफगाणिस्तानचे पहिले लोकनियुक्त राष्ट्रपती हमीद करझाई यांचे नाव देण्यात आले आहे . त्या विमानतळाच्या दरवाजवळ  आणि विमानतळाच्या जवळच असणाऱ्या हॊटेलच्या दरवाजवळ असे दोन ...

लाल चिखल !

इमेज
     मला शाळेत असताना मराठी या विषयामध्ये एक धडा होता, "लाल चिखल!"  या धड्यातील नायकाच्या वडीलांनी बाजारात विकण्यासाठी टँमोटो आणले असतात. त्यावेळी बाजारात अनेकांनी टामँटो आणलेले असल्याने टामँटोचे भाव पडतात. पडलेल्या भावामध्ये टामँटो विकण्यासाठी नायकाचे वडील तयार नसल्याने बाजार संपण्याची वेळ येते तरी त्यांचे काहीच टामँटो विकले जात नाही. परीणामी अत्यंत निराश होवून नायकांचे वडील ते पायदळी तूडवतात. त्याचा अक्षरशः चिखल करतात. टामँटोचा रंगामुळे त्याचा रंग असतो, अक्षरशः रक्ताचे पाणी करुन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे यथोचित मुल्य न मिळाल्यामुळे होणारी मनोवस्था यात मांडण्यात आली होती. शाळेतील या धड्याचा उल्लेख करण्याचे कारण गेल्या आठवड्याभरात नाशिक जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टामँटो या पिकाला मिळालेला अत्यल्प भाव .         गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन बाजार समितीत शेतकऱ्यांना टामँटो पिकासाठी  किलोला 2 ते 3 रूपये भाव  मिळाला आहे. नाशिकच्या टामँटोसाठी हक्काची बाजारपेठ असणाऱ्या पाकिस्तानशी व्यापार बंद ...

जरी एसटी वाल्यांचा अश्रू पुसायास आले!

इमेज
      हे लिहीत असताना आज (25आँगस्ट) महाराष्ट्रात राजकीय बातम्यांचा महापूर माध्यमातून वहात असताना महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग उद्याची चूल कशी पेटवायची? या विवंचनेत आहे.आपल्या महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाचे कर्मचारी अधिकारी हाच तो वर्ग. आँगस्ट महिना संपायला आला आहे. मात्र तरीही त्यांचे जूलै महिन्यांचे पगार झालेले नाहीत.कारण आपल्या एसटीकडे पगार करायला पैसेच नाहीत, आणि ही पहिल्यांदाच येत आहे, असे नाही, आपल्या एसटीवर ही सातत्याने येत आहे. काही डेपोच्या सेवा डिझेल नसल्याने बंद कराव्या लागत आहे. म्हणून म्हणावेसे वाटते जरी एसटी कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसायास आले, तरी जन्म काही कामास आला!      आपल्या एसटी महामंडळावर ईतकी विपन्नावस्था येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण जे मी सातत्याने मांडतोय ते म्हणजे इतर राज्यांच्या एसटी आपल्या महाराष्ट्रातील एसटीचे करत असलेले शोषण. पुर्वी अनेक गावातील भिंतीवर अमूक रोगाचा रुग्ण दाखवा हजार रुपये मिळवा अस्या जाहिराती असत त्याच प्रमाणे महाराष्टातील असा तालूका दाखवा जिथे इतर राज्यातील एसटी येत नाही, दहा हजार रुपये मिळवा असी य...