वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा
भगवान श्रीकृष्ण यांची जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण याना विविध रूपात पुजले जाते . रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण ,आदी स्वरूपातील कृष्ण ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा इतिहासाच्या पौराणिक आणि भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात .माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग्रंथ नसून मानसिक आरोग्य कश्या प्रकारे उत्तम ठेवावे हे सांगणारा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे . भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मापासून त्यांना संकटाचा सामना करावा लागला तरी त्यांनी कधीही हार मांडली नाही .सध्या अत्यंत छोट्या छोट्या कारणांनी निराश होऊन टोकाचे पाऊल उचलणाऱ्या लोकांनी हा आदर्श घेयला हवा . भगवान गोपाळकृष्णचा बालपणीचा आदर्श घेऊन गोपाळकाला चा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाचे हे रूप देखील विचारात घ्यायला हवे . तर आणि तरच भगवान श्रीकृष्णचे भक्त म्हणण्यास ते पात्र ठरतील यात तिळमात्र शंका नाही .
टिप्पण्या