पोस्ट्स

ब....... बुद्धिबळाचा (भाग 4)

इमेज
          भारताची बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील  यशस्वी घोडदौड सुरूच आहे . ऑलम्पियाडमधील  रॉबिन राउंड (  जिंकला अथवा हरला तरी ठरलेले सामने खेळायला मिळणे ) पध्द्तीच्या अखेरच्या दिवशी भारताने  स्लोव्हानिया या देशाबरोबर तीन तीन अशी बरोबरी तर हंगेरी या पूलमधील बलाढ्य संघाला 4 विरुद्ध 2तर   मोल्डवोवा विरुद्ध 5  विरुद्ध 1  असा  सफाईदार विजय मिळवत आपल्या पूलमध्ये पहिले स्थान मिळवले , आणि मोठ्या दिमाखदारपणे नॉक आउट ( हरलं की बाहेर ) या फेरीत प्रवेश केला . या यशामुळे आपल्या डिव्हिजनमध्ये  पहिल्या सोळापैकी दहाव्या क्रमांकापर्यंत धडक मारली . भारत असलेल्या पुलमधून भारतासह हंगेरी ( क्रमांक 15)  या देशाने प्रवेश केला आहे .यापुढे  13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या युक्रेन आणि जर्मनी या देशातील विजेत्याबरोबर भारताची गाठ पडेल           भारताच्या शुक्रवारच्या डावाची सुरवात हंगेरी या देशाबरोबर झालेल्या डावाने झाली यामध्ये भारताने 4 विरुद्ध 2असे यश मिळवले भारताचे कप्तान विश्वनाथन आंनद या...

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

इमेज
  सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र गणपती बाप्पाची धूम चालू आहे . या गणेशोत्सवात गणपती दर्शनाचे विशेष महत्व आहे . आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे परिसरातील गणपतीची ठिकाणे प्रसिद्ध आहेत . मात्र आपल्या महाराष्ट्रात फक्त हीच गणपतीची ठिकाणे नाहीत . तर विदर्भात सुद्धा गणपतीची आठ ठिकाणे प्रसिद्ध आहेत . ज्याला वैदर्भीय अष्ट गणेश म्हणतात या खेरीस देवीप्रमाणेच गणपतीची साडेतीन ठिकाणे देखील आहेत . पहिल्यादा आपण विदर्भातील अष्टविनायकांची माहिती घेउया . वरदविनायक- टेकडी गणपती   विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचíचत प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते.मंदिर...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 3)

इमेज
         सध्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना दुधात साखर पडावी , अशी घोडदौड बुद्धिबळ ऑलम्पियामध्ये  भारताचा संघ करत  आहे.   8 सप्टेंबररोजी दोन संघाना पराभवाचे पाणी पाजून आणि एका संघाबरोबर बरोबरी करत स्वतःच्या पूलमध्ये दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या संघाने 9 सप्टेंबर रोजी त्याहून उत्तम कामगिरी करत स्वतःचा पूलमध्ये प्रथम स्थान मिळवले .भारतीय बुद्धिबळ संघाने  9 सप्टेंबर रोजी झालेल्या मॅचेसमध्ये तिन्ही संघांविरुद्ध विजयश्री मिळवत हंगेरीला मागे टाकत पूलमध्ये प्रथमस्थानावर  होण्याचा विराजमान होण्याचा मान मिळवला    .या स्पर्धेत चीनने दोन संघ उतरवले आहेत एक संघ चीन या नावाने खेळात आहे तर दुसरा संघ सेंझान चीन या नावाने खेळत आहेत त्यातील सेझान चीन या संघाविरुद्ध पाच विरुद्ध एक अशा सरळ विजय मिळवत भारताने या यशाला गवसणी घातली आहे .या सेझान चीन खेरीज अझरबैजान या देशाविरुद्ध चारदेशाविरुद्ध   विरुद्ध दोन आणि बेलारूस या देशाविरुद्ध साडेतीन विरुद्ध अडीच अशी कामगिरी करत भारतीय बुध्दिबळसंघाने ही  काम...

गणेशाची साडेतीन पीठे

इमेज
  आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे म्हंटली की प्रामुख्याने  देवीची शक्तिपीठे आठवली जातात . मात्र आपल्या महाराष्ट्रात गणपतीची देखील शक्ती पीठे आहेत . सध्याच्या गणेशोत्सवाच्या  काळात त्यांची माहिती करून घेउया .या साडेतीन गणपतीच्या दर्शनाने मोठे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे . भगवान गणपतीने मयूरेश्वराच्या वध केला असता त्याचे शरीर ज्या ज्या ठिकाणी पडले  त्या त्या  ठिकाणी ही पुण्यक्षेत्रे निर्माण झाली अशी कथा सांगितली जाते .                                 मोरगाव  - 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा ...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 2)

इमेज
             सध्या ऑनलाईन पद्धतीने बुद्धिबळाचे ऑलम्पियाड सुरु आहे यामध्ये भारताचे प्रदर्शन खूपच उत्तम होत आहे. पारंपरिक माध्यमांमध्ये मात्र याविषयी फारसे बोलले जात नसल्याने या नव्या खुल्या माध्यमांचा वापर करत त्याविषयी आपणापर्यत माहिती पोहचवून बुद्धिबळपटुंचा आनंदात वाढ करण्यासाठी आजचे लेखन            तर मित्रानो , बुधवारी 8 सप्टेंबर रोजी भारताने पहिल्या डावात  इजिप्तचा पूर्णतः धुव्वा उडवला  इजिप्तचा सहा पैकी एकही खेडाळू भारताच्या  खेडाळुला पराभूत करने सोडाच, बरोबरी देखील करू शकला नाही इजिप्तच्या सहाही खेळाडूंनी भारतासमोर सपशेल नांगी टाकली ज्यामुळे भारताने इजिप्तविरुद्ध 6 विरुद्ध 0 असे निर्धोक यश मिळवले . तर दुसऱ्या डावात फ्रांसविरुद्ध विरुद्धच्या डावात भारताचा कप्तान विश्वनाथन आनंद यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी Etienne Bacrot.विरुद्धच्या डाव बरोबरीत सोडवला . तर जागतिक मानांकात 21 व्या स्थांनी आणि  भारतातील क्रमांक दोनचे   खेळाडू नाशिकचे आयकाँन गँडमास्टर विदीत गुजराथी यांनी Yanni...

ब....... बुद्धिबळाचा

इमेज
                     आज भारतातील बहुतांशी   माध्यमे  इंग्लंड बरोबरची क्रिकेटची टेस्ट मॅच,  एका क्रिकेटरचा घटस्फोट आणि पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल च्या वार्तांकनात मग्न असताना भारताची जगाला देणगी असलेल्या एका पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या खेळाची  अर्थात बुद्धिबळाची अत्यंत प्रतिष्ठेची  स्पर्धा अर्थात बुद्धिबळाचे ऑलम्पियाड सुरु आहे .25ऑगस्ट रोजी रशियात त्याचे दिमाखदार उदघाटन झाले  25 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे ..  कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टाळला नसल्याने ही  स्पर्धा ऑनलाईन पध्द्तीने खेळवण्यात येणार आहे   www.chess.com  या संकेतस्थळावर आपणास हि विनामूल्य बघता येईल . तसेच chess डॉट कॉम च्या युट्युब चॅनेलवर आणि flowचेस या ऍपवर   देखील आपण या स्पर्धेच्या आस्वाद घेऊ शकता आजमितीस  या विषयी  लिहिताना (8 सप्टेंबर ) लिहताना भारताची स्थिती खूपच उत्तम आहे मात्र असे असे असून देखील दुर्दैवाने  भारतीय माध्यमात या विषयी हवे तितके बोलले जा...

वन्यसंपदा धोक्यात !

इमेज
               आपल्याकडे विविध राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या देण्यात  माध्यमे रंगून गेलेली असताना, जागतिक स्तराच्या विचार करता वन्यसंपदा धोक्यत असल्याचा दोन बातम्या मला बीबीसी बघतांना आढळल्या . बीबीसीच्या बातम्यांचा सूर  काहीसा भारतविरोधी आणि पाकिस्तानला साह्य करणारा असला तरी   (याचमुळे अनेकजण बीबीसीचे पूर्ण स्वरूप ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कंपनी च्या ऐवजी बुलशीट ब्रॉडकॉस्टिंग कंपनी असा अपरोधिक करतात ) तरी विज्ञान विषयक त्यांचे वार्तांकन खूपच सोप्या मात्र माहितीपूर्ण भाषेत असल्याने मी बीबीसी नेहमीच बघतो असो               तर सांगायचं मुद्दा असा की, जर आताच काही कार्यवाही ना केल्यास   ऑस्ट्रोलीय या देशातील 26 प्रकारच्या बेडकाच्या जाती 2040 पर्यंत पूर्णतः नष्ट  होऊ शकतात अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली  ऑस्ट्रोलीय या देशात एकूण 240 प्रकारच्या बेडकाच्या जाती अढळतात असत त्यातील चार प्रकारच्या बेडकाच्या जाती या आधीच नष्ट झालेल्या आहेत तर  26 प्रकारच्य...