पोस्ट्स

नरक चतूर्दशी विशेष

इमेज
          आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात नरक चतूर्दशी . आजच्या दिवशी पहाटे लवकर  सुर्योदयापुर्वी उठून सुवासिक उठणे तेल आदी लावून स्नान करण्याची प्रथा आहे .आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या  नरकासुराचा वध केला  , अशी आख्याईका आहे या बाबत श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे की,   प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला , ‘ आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील ,  त्याला नरकाची पीडा होऊ नये. ’  कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही  ‘ नरक चतुर्दशी...

जिएसटी संकलन किती खरे किती खोटे !

इमेज
          केंद्र सरकारकडून 2 नोव्हेंबर रोजी जीएसटी संकलन सुरु झाल्यापासूनच दुसऱ्या क्रमांकाचे जीएसटी संकलन ऑक्टोबर महिन्यात झाल्याचे जाहीर करण्यात आले . ज्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळातील अर्थव्यवस्था मूळ पदावर येऊन वेगाने विकासाच्या मार्गावर धावत असल्याचे सांगण्यात येत आहे . जे अर्धसत्य आहे . जीएसटी संकलन वाढले आहे,  हे मान्य केले तरी यातील वाढ वस्तूच्या मागणीत वाढ झाल्याने अधिक वस्तू विकल्या गेल्याने नाही तर  वस्तूच्या मूळ किमतीत  वाढ झाल्यानेआणि जीएसटी विक्री किमतीवर आकारला जात असल्याने आहे .  हे आपण सिलेंडरच्या किमतीद्वारे सहजतेने समजून घेऊ शकतो    एलपीजी सिलिंडरची ऑक्टोबर २०२० ची जिएसटी सोडूनची किंमत ५६५ रुपये ७१ पैसे तर ऑक्टोबर २०२१ ची किंमत ८४१ रुपये ९० पैसे ५६५.७१ रुपयांचा ५ टक्के जीएसटी २८.२८ रुपये. ८४१.९० रुपयांचा ५ टक्के जीएसटी ४२.०९ रुपये. किमतीत वाढ २९० आणि जीएसटीची वाढ १३.८१ रुपये. सिलिंडरच्या खपात कुठलीही वाढ न होता किंमती वाढल्याने जीएसटीच संकलन वाढलेले आपणस दिसत आहे काही अर्थतज्ञांच्या मते जुलै २०१७ च्य...

धनत्रयोदशी विशेष

इमेज
  बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात , ज्याच्या बाबतीत दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा ,असे म्हटले जाते , त्या दिवाळीचा आज पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी . त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवशी वैद्यकशास्त्राची देवता असलेल्या धन्वंतरीची पुजा करुन आपल्या चांगल्या आरोग्याची मनोकामना केली जाते. धन्वंतरीकडे ,दिर्घायूसाठी प्रार्थना केली जाते .काही समाज घटकात आज धनाची देवता असणाऱ्या कुबेराचे पुजन केले जाते.  दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्यौेकी एक म्हणजे  या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा, राणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही. तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो. त्यावेळी यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने-चांदी, मोहरांनी त्...

जखमेवर मीठ !

इमेज
                १ नोव्हेंबर २०२० रोजी कर्नाटक राज्याच्या ६५वा स्थापना दिवस झाला . त्यानिमित्याने कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना बेळगाव निपाणी भालकी या शहरातील आणि आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आपल्या संबोधनात त्यांनी महाराष्ट्र सीमाप्रश्न संपल्याचे आणि बॉम्बे कर्नाटक या प्रादेशिक भागाचे कित्तूर कर्नाटक असे नामकरण करत असल्याचे जाहीर केले . एकाचवेळी राज्याच्या संस्थापक दिनाला कोरोना संसर्गाची भीती न बाळगळता कार्यक्रम केले . मात्र मराठी भाषिकांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावे या साठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावच्या कार्यक्रमला परवांनगी नाकारली . कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अत्यंत अत्याचार करण्यात येतात . त्यांना त्यांच्या इच्छेविरुध्द्व सक्तीने कन्नड भाषेत व्यवहार करण्यास भाग पाडले जाते . त्यामुळे तेथील जनता महाराष्ट्रात येण्यास आसुसलेली आहे .  भागाचे नाव बदलून या भागाशी असणारी महाराष्ट्राची नाळ पूर्णपणे तोडण्याची पूर्ण तयारी केल्याच...

राज्यांच्या स्थापना दिवसांच्या निमित्याने

इमेज
वर्षातील काही दिवस हे मोठे विलक्षण असतात.  त्या दिवशी अनेक घडामोड घडल्या असल्याने त्या दिवाशांना विलक्षण महत्व आलेले असते . आपल्या भारताचा विचार केला असता १ नोव्हेंबर हा त्या दिवसांपैकीच एक . आपल्या भारतात असणाऱ्या २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशांपैकी ९ राज्य आणि ५ केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिवस हा १ नोव्हेंबर असतो . , तामिळनाडू, केरळ, कर्नाटक,आंध्रप्रदेश छत्तीसगढ, मध्यप्रदेश ,राजस्थान, पंजाब आणि हरीयाणा  ही ती 9 राज्ये तर पड्डुचेरी (जूने नाव पाँडेचरी),अंदमान निकोबार , लक्षद्वीप, दिल्ली तसेच चंडीगढ या केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस एकच १नोव्हेंबर असतो.          आपल्या भारतात प्रशासनाच्या सोयीनुसार राज्याची निर्मिती किंवा विलय केला जातो. आपले संविधान संघराज्य पद्धतीचे मात्र केंद्रीय सत्ता कहीसी प्रबळ करणारे आहे. अमेरीका या देशात विविध राज्यांनी स्व हितासाठी एकत्र येत संघराज्य स्थापन केले आणि अमेरीका हा देश तयार झाला. आपल्या भारतात तसे झाले नाही. पहिले देश तयार झाला मग त्याचे विविध राज्यात विभाजन करण्यात आले. आजमितीस भारतात 28 राज्ये आणि 8 ...

जळता पाकिस्तान

इमेज
         आखाती देशात सुरु  असणाऱ्या क्रिकेटच्या टी २० विश्व चषकात पाकिस्तान एकामागून एक सामने जिंकत असले तरी,  पाकिस्तानमधील अंतर्गत स्थिती अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे . पाकिस्तानी सरकारने बंदी घातलेल्या मात्र झालेल्या स्थानिक निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या "तैहरिके ए लब्बेक पाकिस्तान" या पक्षातर्फे पाकिस्तानच्या पंजाबची  राजधानी असलेल्या लाहोरपासून पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपर्यंत  लॉन्ग मार्च काढण्यात येत आहे . हा मजकूर लिहीत असताना (३० ऑक्टोबर ) हे  आंदोलक वझीराबाद या शहरात आलेले आहेत . शुक्रवार २९ ऑक्टोबर रोजी हे  आंदोलक गुजरानवाला या शहरातून वझीराबाद या शहरात पोहोचले  यापुढील वाटचाल पक्षाच्या शीर्ष नेत्यांच्या सांगण्यावरून होईल , अशी आंदोलनकांची भूमिका आहे "          तैहरिके ए लब्बेक पाकिस्तान" या संघटनेने केलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ते सौदी अरेबियाच्या दौऱयावरून परत येताच तातडीची पाकिस्तनच्या नॅशनल सिक्युरिट...

हवामान बदलाच्या नावाने ...... !

इमेज
                सध्या  शाहरुख खान याच्या मुलास अमली पदार्थाच्या  पुरवठ्याविषयी संबंधितांना विचारणा केल्याप्रकरणी नॅशनल क्राईम ब्युरो (NCB ) तर्फे  दाखल गुन्ह्याच्या संदर्भात विविध दावे प्रतिदावे आणि दिवाळी निमित्य होणाऱ्या गर्दीच्या बातम्या दाखवल्या जात असताना  जगभरात मात्र हवामानबदलाविषयी मोठ्या प्रमाणवर तसेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या २६ व्या अधिवेशनाच्या बाबत  चर्चा सुरु आहे . विविध देशांचे प्रमुख  हवामान बदलाविषयी काय कार्यक्रम असावा या बाबत मतप्रदर्शन करत आहे.   या विविध देशांच्या प्रमुखांमध्ये व्हॅटिकन सिटी या ख्रिस्ती बांधवांच्या साठी अत्यंत पुज्यनीय  असणाऱ्या देशाचे प्रमुख पोप फ्रॅंसिस यांच्या देखील समावेश आहे , बीबीसी रेडिओला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी जागतिक नेत्याना पर्यावरणाच्या या आणीबाणीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी आणि भावी पिढीला चांगले पर्यावरण राखण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा संदेश दिला आहे . तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या २६ व्या अधिवेशनासाठी...