पोस्ट्स

ड्रॅगनचे फुत्ताकार कोणाकडे ?

इमेज
      आपल्या मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून एक पोलिसी अधिकारी आणि एक मंत्री यांच्यातील वाद , एसटी कर्मचाऱयांच्या संपविषयी सांगितले जात असताना आपला प्रमुख शत्रू जो   आपल्याबरोबर मोठी सीमा देखील शेअर करतो अश्या चीन बाबततीन घडामोडी घडल्या . एक जागरूक सुजाण नागरिक म्हणून आपणास त्या माहिती  अत्यावश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया त्या घडामोडींविषयी          तर मित्रानो , सन १९५९ साली अरुणाचल प्रदेश आणि तिबेट सीमेवरील लांगजू या संरक्षण चौकीवर  चीनने आक्रमण करून ती चौकी आणि लगतचा काही भाग आपल्याकडे अनधिकृतपणे घेतला . ९६२ साली जेव्हा चिनी सैन्य अरुणाचल प्रदेशात घुसले होते,  तेव्हा एकतर्फी युद्धबंदीनंतर चिनी सैन्य पुन्हा माघारी  तेव्हा सुद्धा तो भाग आपल्याकडेच ठेवला.  त्या भूभागात चीनने १०० घरांचे एक छोटे गाव वसवले आहे,  असा उल्लेख अमेरिकी संरक्षण खात्यातर्फे अर्थात पंटेगॉनतर्फे चीनसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे या अहवालाच्या पान  क्रमांक १७६ वर हा उल्लेख करण्यात आला आहे .चीनने य...

एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

इमेज
    8 नोव्हेंबर ही तारीख एका महान मराठी साहित्यीकाची जयंती, म्हणून मराठी सारस्वतात परीचित आहे. पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे हे त्या साहित्यकाचे नाव. त्यामुळे मराठी साहित्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व सारस्वतांना मनःपुर्वक शुभेच्छा .      पु.ल. म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात. मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली नाही, तर तीन व्याख्याने, गांधीजी आदी गंभीर लेखन सुद्धा केले आहे. ज्यात त्यांनी अनेक राजकीय , सामाजिक प्रश्नावर ठोस भुमिका घेतली आहे. मात्र पु. ल. आणि आपल्या सर्वांच्या दुर्देवाने पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी साहित्याला जितकी अमाप प्रसिद्धी लोकप्रियता मिळाली, तितकी समाजमान्यता या लेखनास मिळाली नाही. समाजाने त्यांना कायम विनोदी लेखनाच्या कप्यातच बंदिस्त केले. त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या दोन चित्रपटांमध्येही त्यांवर फारसे भाष्य करण्यात आलेले नाही, असे माझे निरीक्षण आहे, असो       पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर शहरी सुशिक्षीत वर्गाला आवडतील, अस्या ...

उषकाल होता होता काळरात्र झाली

इमेज
         ऐंशीच्या दशकातील मराठीतील एक सर्वोत्त्कृष्ट चित्रपट म्हणजे सिंहासन .त्यातील एक सुप्रसिधद गाणे म्हणजे उषकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली .  हा चित्रपट जरी राजकारणावर आधारित असला तरी त्या गाण्यातील बोल खूपच उत्तम आहेत . सध्याच्या काळातील  भारतीय क्रिकेटची अवस्था बघितली तर हे गाणे आठवल्याशिवाय राहत नाही .       टी २० विश्वचषकाचा संभाव्य विजेता म्हणून बघितला जाणाऱ्या भारताचा प्रवास साखळी स्पर्धेतच संपुष्टात आला . त्यामुळे या गाण्यातील ध्रुवपद "उषकाल होता होता काळरात्र झाली " आठवल्याशिवाय राहत नाही या गाण्यातील दुसरी ओळ " जे कधीच नव्हते त्याची आश  का धरावी " हे वाक्य सुद्धा आपल्या भारतीय क्रिकेट संघाला चपलख बसते न्यझीलंड अफगाणिस्तानकडून हरल्यावर आपला उपांत्य फेरीत प्रवेश होणार  . जे होणे अशक्यप्राय होते तसेच झाले न्यझीलंडकडून अफगाणिस्तान मोठ्या फरकाने हारले आणि भाताच्या क्रिकेटच्या बाबतीत  " जे कधीच नव्हते त्याची आश का धरावी "हे वाक्य चपलख बसावे  अशी स्थिती निर्माण झाली . आपल्या भ...

अस्थिरतेच्या कड्यावर पाकिस्तान ?

इमेज
    सध्या आपल्या महाराष्ट्रात राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या तसेच दिवाळीविषयक बातम्यां देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील पाकिस्तान अस्थिरतेच्या कड्यावर तर नाही ना ? असे वाटावे अश्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांतून वाचायला मिळत आहे .     पाकिस्तानने त्यांच्या देशातील राजकीय अस्थिरता लक्षात घेवून तैहरीके ए लब्बेक या संघटनेवरील बंदी हटवणे, त्यांना निवडणूका लढवण्याची परवानगी देणे, तसेच पाकिस्तानच्या तूरुंगातुन 2300 तैहरीके ए लब्बेक च्या कार्यकर्त्यांची मुक्तता करण्याची बातमी ताजी असताना पाकिस्तानमधील दूसरी दहशतवादी संघटना तैहरीके तालीबान पाकिस्तान (संक्षीप्त नाव TTP) या संघटनेबरोबर शांततेविषयक चर्चा सुरु केल्याची बातमी wionने दिली आहे. टी टी पी या दहशतवादी संघटनेची स्थापना 2007 साली झाली. स्थापनेनंतर काही वर्षातच आपल्या हल्यातून सर्वाधिक बळी घेणारी दहशतवादी संघटना म्हणून तैहरीके तालिबान पाकिस्तान (टी टी पी) ओळखली जावू लागली. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जर दहशतवादाचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्विकारत असल्याचे दिसून आल्यास आम्ही त्याचाशी च...

भाउबीज विशेष

इमेज
  आज दिवाळीचा शेवटचा दिवस अर्थात भाउबीज , भाउ आणि बहीणीचा नात्याचा हा दिवस आजच्या दिवशी पुरुषाने आपल्या पत्नीचा हातचे न खाता,आपल्या बहीणीचा हातचे खाणे शुभ मानले जाते.आजच्या दिवशी यमुना नदीने आपला भाउ यम यास ओवाळले होते . त्यामुळे प्रसन्न होवून आजच्या दिवशी जी स्त्री आपल्या भावाला ओवाळेल, त्या दोघांना दिर्घायू मिळेल, असा आशिर्वाद दिला .ज्यामुळे याला यमद्वितीया असे देखील म्हणतात.               कायस्थ समाजबांधव   या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठ...

बलीप्रतीपदा

इमेज
        आज बली प्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा , या दिवशी   पत्नीने पतीला स्नान घालण्याची प्रथा आहे . आजच्या दिवशापासून गुजराती बांधवांचे आणि व्यापारी वर्गाचे नविन वर्ष सुरु होते . हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे समजले जाणाऱ्या साडेतीन मुहुर्तापैकी एक पुर्ण मुहुर्त असणाऱ्या आजच्या दिवशी नविन वस्तू , सोने आदी खरेदी करण्याची प् कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो . हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतातया दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ' इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो ' असे म्हणतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे . शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके  शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात . काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते . शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्...

पेट्रोल दर कपातीचे वास्तव

इमेज
       धनाची पूजा करण्याचा सण असलेल्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने इंधनावरील एक्साईज ड्युटीमध्ये काही रुपयांची कपात केली . ज्यामुळे गेले काही दिवस उच्चांकाचे नवनवीन विक्रम करणाऱ्या इंधनाचे दर कमी झाले . केंद्रापाठोपाठ काही राज्य सरकाने सुद्धा  राज्यातील इंधनावरील कर कमी केले , ज्यामुळे त्या राज्यतील इंधनाचे दर अजूनच कमी झाले , आणि सर्वोत्तपरी ओरड सुरु झाली ,सर्वच राज्यातील सरकारनी त्यांच्या राज्यातील इंधनाचे दर कमी करावेत .        मात्र ही ओरड करणाऱ्या व्यक्ती एक गोष्ट विसरल्या त्या म्हणजे स्वातंत्र्यापासून सुरु  असणारी एक कुप्रथा ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून स्व पक्षाचे सरकार ज्या राज्यात आहे त्या राज्यांना केंद्राकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात झुकते माप देण्याचा आणि विरोधी पक्षाचे सरकार ज्या पक्षात आहे त्या राज्य सरकारला अनुदान देताना हात काहीसा आखडता घेण्याचा , त्यामुळे जेव्हा जेव्हा राज्य सरकारकडून वसूल  करून राज्याकडूनच वापरण्यता येणाऱ्या करांचा मुद्दा येतो तेव्हा केंद्र सरकारने तसे सांगण्याचा अवका...