पोस्ट्स

सिंहावलोकन २०२१ भारत आणि जग

इमेज
       सरते वर्ष २०२१ भारतासाठी खूपच महत्त्वाचे ठरले या वर्षी मॉरिशस , युनाटेड किंग्डम , रशिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्याबाबत भारताला अनुकूल अश्या अनेक घडामोडी घडल्या त्यामुळे  या सरत्या वर्षात भारताचे  पररराष्ट्र धोरण खूपच यशस्वी ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी स्थिती निर्माण झाले आहे              वर्षाच्या सुरवातीलाच    आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी  आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता य...

सिंहावलोकन २०२१, भारत आणि जागतिक परिषदा,

इमेज
           या वर्षी २०२१ साली भारताने अनेक जागतिक परिषदांमध्ये महत्वाची भूमिका बजावली . ज्यामध्ये  हार्ट ऑफ आशिया , जी ७ , शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन , अशियन बिमस्टेसक , कॉप २६ , अश्या अनेक  परिषदनाचा समावेश होतो या परिषदनमध्ये इतर वर्षांप्रमाणंच याही वर्षी भारताने या परिषदनमध्ये    महत्त्वाची भूमिका मांडली जी भारताच्या वसुधैव कुटुबकम या तत्वाशी मेळ खाणारी होती या परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने झाल्या            काझकिस्तान या देशातर्फे एस सी ओ च्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते    कझाकिस्तानचे नूर सुलतान हे या बैठकीचे अध्यक्ष होते    या बैठकीचे हे २०वे वर्ष होते . ज्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व  भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरयांनी केले  गातील सर्वात मोठी पादेशिक संघटना असलेल्या शांघाय कॉ ऑपरेशन या संघटनेची स्थापना २००१ साली आहे भारत या संघटनेच्या निरीक्षक म्हणून २००५ पासून काम करत होता तर सन २०१७ पासून या संघटनेच्या भारत पा...

सिंहावलोकन २०२१ भारत आणि भारताचे शेजारी

इमेज
            सन २०२१ हे वर्ष आणि भारत  भारताच्या शेजारील देश यांच्या विचार करता अत्यंत महत्त्वाचे ठरले यावर्षी भारताच्या शेजारील देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या ईशान्य भारताबरोबर मुख भूमीचा अधिक सक्षम संपर्क स्थापित व्हाया म्हणून बांगलादेश आणि म्यानमार बरोबर झालेले करार ,नवरात्रीदरम्यान बांगलादेशातील हिंदूंवर झालेले हल्ले . मालदीव या देशात झालेले भारतविरोधी आंदोलने , अफगाणिस्तानातील तालिबानचा उदय , चीन बाबतच्या संबंधात वाढलेली कटुता , भूतानमध्ये त्यांच्या अंतर्गत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उघड झालेला भारतीय नागरिकाचा समावेश,  नेपाळच्या राजकारणी लोकांची भारत विरोधी वक्तव्ये आणि नेपाळचा विकासाबाबत भारतने उचलली पाऊले  ,श्रीलंकेमध्ये भारतीय प्रकल्पना झालेला विरोध आणि पाकिस्तानशी असणारे तणावाचे वातवरण या बाबींचा अभ्यास आपणास  २०२१ साली भारत आणि त्याच्या शेजारील देशांमाबरोबरचे संबंध बघताना करावा लागेल .      नेपाळचे हंगामी पंतप्रधान के पी ओली शर्मा यांनी २० जून २०२१  मध्ये त्याच्या घरी आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार...

मालदीवमधील भारतविरोधी सूर

इमेज
            मालदीव भारताच्या पश्चिमेला असणारे सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणारे १ हजार बेटावर वसलेले राष्ट्र. आशिया खंडातील क्षेत्रफळाने अत्यंत कमी असणाऱ्या देशांच्या यादीत क्रमांक २ वर असणारे  (पहिल्या क्रमांकावर कतार तर तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर) अरबी समुद्रात वसलेले राष्ट्र . जागतिक हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक म्हणजे मालदीव . . बांगलादेशच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्क या संघटनेतील भारताचा सहकारी म्हणजे मालदीव श्रीलंकेने आक्रमण केल्यावर ज्या देशाला भारतीय नौदलाने स्वतंत्र केले तो म्हणजे मालदीव  तर अश्या मालदीवमध्ये २०१३ ते २०१८ या काळात देशाच्या अध्यक्षस्थानी राहिलेल्या अब्दुला यामिन यांच्या नेतृत्वात भारतविरोधी आंदोलन सुरु आहे त्यांचे समर्थक मालदीवमध्ये  ठिकठिकाणी  घेऊन शर्टावर Get Out India असे लिहून Get Out India असे फलक घेऊन मालदीवमध्ये उभे आहेत.  मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष  हे त्यांच्या भारतविरोधी आणि चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जातात मात्र मालदीवचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष...

उरल्या फक्त आठवणी... त्या काळरात्रीच्या

इमेज
  ख्रिसमसची सुट्टी आनंदीत घालवण्यासाठी ते समुद्रकिनारी आले होते. मात्र हा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार आहे, याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. हवामान खात्यातर्फे  कोणत्याही वादळाची पुर्वसुचना देण्यात न आल्याने ते आनंदाने समुद्राचा लाटांशी खेळत होते. मात्र याच समुद्राचा लाटा आपल्या प्राणांचे हरण करणार आहेत, याबाबत त्यांना  काहीच माहिती नव्हती. जपानमध्ये या प्रकारचे संकट नवीन नसले तरी , ते ज्या प्रदेशात समुद्रात मज्जा करत होते, त्या प्रदेशात या प्रकारचे संकट आल्याचा कोणताही ज्ञात इतिहास नव्हता. त्यामुळे ते बिनधास्त समुद्राच्या लाटांशी खेळत होते. ते ज्या ठिकाणी होते. तिथे नुकतेच उजाडले होते. त्यामुळे सर्व जण निवांतपणे समुद्रकिनारी फिरत होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. हे त्या संकटावरुन दिसून येत आहे .       कारण कोणाच्या ध्यानीमनी नसताना जागतिक प्रमाणवेळेनूसार रात्री 12 वाजून 58 (जिथे ही घटना घडली त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 58 मिनीटे { भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 28 मिनीटे}) मलेशियाचा उत्तर बेटाच्या पश्चिमेला ...

22 वर्षे विमान अपहरणाची

इमेज
           प्रत्येक माणसाच्या आणि देशाच्या वाटचालीत काही कटू दुःखद प्रसंग येतच असतात . आपल्या भारताच्या वाटचालीत सुद्धा आजपासून एकवीस वर्षांपूर्वी असाच  कटू प्रसंग आला होता , तो होता इंडियन एअरलाईन्स या कंपनीच्या आयसी 814 या काठमांडू ते दिल्ली येथे जाणाऱ्या विमानाचे लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेले अपहरण हा होय . . यामध्ये रुपेण कटियाल या प्रवासाचा बळी गेला आणि आपण आपल्या तुरुंगात असलेल्या हाफिज सय्यद या दहशतवाद्याला सोडून दिले . याच हाफिज सय्यद याने पुढे भारतीय संसदेवर हल्ल्याची योजना आखली . सुदैवाने त्या  नंतर आपल्या एकाही विमानाचे अपहरण झालेले नाही . त्या वेळेस केंद्रात माननीय अटलबिहारी यांचे सरकार होते . काठमांडू  येथून 24 डिसेंबर1999 ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण भरलेल्या या विमानाचे अपहरण करण्यात आले होते . यातील प्रवाशी सात दिवसांनी दिल्लीत परतले . आपण बाजूच्या नकाश्यात याचा मार्ग बघू शकतात . यातील काळ्या ठिपक्याच्या स्वरूपात जो मार्ग दिसत आहे तो आहे विमानाच्या मूळ मार्ग तर लाल रेषेत...

महारष्ट्रातील रेल्वे बदलतीये .....

इमेज
          सध्या भारतातील रेल्वे झपाट्याने कात टाकत आहे . त्याचाच परिणामस्वरूप महारष्ट्रातील रेल्वेसुद्धा विद्युतवेगाने बदलत आहे रेल्वे संदर्भात विविध प्रलंबित प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे यासाठी रेल्वेत प्रशासनिक बदल तसेच पायाभूत सोयीसुविधा उभारणे याचा समावेश होत आहे गेल्या पंधरवड्यात अहमदनगर - परळी रेल्वेमार्ग , कुर्डुवाडी लातुर रेल्वेमार्ग या मार्गाबाबत अनेक चाचण्या घेण्यात आल्या तसेच अंकाई औरंगाबाबाद , मनमाड औरंगाबाद आणि औरंगाबाद परभणी या रेल्वेमार्गाबाबत विविध प्रस्तावास मंजुरी तसेच मध्य रेल्वेचा सोलापूर विभागातील सुमारे २५० किमीचा मार्ग मध्य रेल्वेचा पुणे विभागांतर्गत वर्ग करण्याबाबतचा हालचालीस वेग देणे आदी घडामोडी महाराष्ट्राचा रेल्वेबाबत घडल्या .      आजपासून सुमारे  २५ वर्षांपूर्वी अर्थात १९९५-९६सालच्या रेल्वेअर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या मात्र निधीची अपुरी  तरतूद आणि इतर काही  बाबींमुळे फारसे काम न झालेल्या या सुमारे २८५ किमीच्या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे या मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या ६४ किमी मा...