पोस्ट्स

वंदन महान शास्त्रज्ञाला

इमेज
  मार्च महिन्याचा 14 वा दिवस अर्थात 14मार्च हा दिन भौतिक शास्त्रज्ञांसाठी आणि खगोल शास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्तवाचा आहे . याच दिवशी 2019 साली खगोल भौतिकीचा महान शास्त्रज्ञ स्टीफन हाँकिग्न आपल्यातून कायमस्वरूपासाठी निघून गेले      स्टिफन हाँकिग्न यांनी  खगोल भौतिकाच्या मंदिराचा कळस रचला , खगोल भौतिकाच्या मंदिराचा पाया आयझाँक न्युटन यांनी रचला , त्याचा भिंती आल्बट आइन्साटाईन यांनी रचल्या आणि यावरचा कळस रचला तो स्टिटिन हाँकिग्न यांनी असे म्हटल्यास वावगे ठरु नये. आयझँक न्युटन यांच्यानंतर 400वर्षांनी आलेल्या स्टिफन हाँकिग्न यांनी खगोल भौतिकीला वेगळ्या उंचीवर पोहोचवले. त्यांच्यामुळे खगोल भौतिकी शास्त्रात अनेक महत्तवाचे शोध लागले.      विश्वाची निर्मिती कशी झाली? त्याचा मृत्यू कसा होवू शकतो? कृष्णविवरांची निर्मिती कशी झाली? तसेच आइन्सटाइन यांच्या सापेक्षतावादावरील आधारीत संशोधन त्यांनी पुढे नेले. स्टींग थिअरीच्या संशोधनात त्यांचा मोठा वाटा होता.  हेग्स बोसाँन कण(देव कण /god partials) च्या संशोधनात देखील त्यांचा सिहांचा वाटा होता. स्टिफन हाँकिग्न य...

अकरा वर्षे महाप्रलयानंतरची

इमेज
ही गोष्ट आहे 2011 मार्च 11 ची. स्थळ जपान देश. स्थानिक वेळेनुसार दुपारी पावणे तीनचा सुमार (जागतीक प्रमाणवेळेनुसार सकाळी पावणे सहा वाजता/भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकरा ) कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जपानमध्ये तब्बल 9.1 रिक्टर स्केलचा भुकंप झाला. जपानमधील आतापर्यतचा सर्वात मोठा भुकंप म्हणून या भुकंपाची नोंद घेण्यात आली. यामुळे जपानचे उत्तरेकडचे बेट काही सेंटीमीटर अमेरीकेकडे सरकले. मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली. जपानच्या अनेक अणूविद्यूत प्रकल्पामध्ये त्यामुळे समस्या निर्माण झाल्या .फुकूसीमा या अणूविद्यूत प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाल्याने समस्येत वाढ झाली. या दुर्घटनेला शुक्रवारी ११ मार्च रोजी वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि आर्थिक नुकसान झालेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या नंतरच्या दहा वर्षात जपान पुन्हा एकदा अशरक्षः राखेतून उभा राहिला. नव्याने सुरवात करत भारताला बुलेट ट्रेन आदी विकासकामासाठी साह्य करत आहे. तसेच लष्करासाठी अमेरीकेवरील अवलंबत्व कमी करत स्वतःचे लष्कर उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेही जपानने या आधीही फिनिक्स पक्षाप्रम...

पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय ?

इमेज
               सध्या आपल्याकडील बहुसंख्य माध्यमे भारतातील पाच राज्यातील झालेल्या  निवडणुका ,  आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्याच्या आरोप प्रत्यारोपाचा बातम्या देण्यात मग्न असताना  पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय ? अशी शंका उत्पन्न व्हावी अश्या बातम्या सध्या विविध इंग्रजी माध्यमात येत आहे . पाकिस्तान आपले  शत्रू राष्ट्र आहे तसेच तो आपल्याबरोबर मोठी सीमा शेअर करतो आपली जम्मू , अमृतसर पठाणकोट आदी महत्वाची शहरे भारत पाक सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत त्यामुळे तेथील घडामोडी आपणस माहिती असणे आवश्यक आहे त्या साठीच आजचे लेखन              पाकिस्तानमध्ये हा मजकूर लिहीत असताना   पंतप्रधानपदी  इम्रान खान आहेत .पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.  पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर पाकिस्तानची १९६३ पर्यंतची राजधानी त्यांची सध्याची आर्थिक राजधानी असलेल्या कराची या शहरातून मोठी राजकीय रॅली पाकिस्तानची १९६४ पासूनची  राजधानी जी त्यावेळच्या पूर्व ...

अन्य एसटी वेगाने पुढे जात आहेत?आणि आपण!

इमेज
      एखाद्या व्यक्तीच्या परीस्थितीत प्रचंड बदल झाल्यास काय होतात तू , काय झालास तू ? असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गेल्या काही दिवसातील महाराष्ट्र एसटीविषयीच्या आणि आपल्या भारतातील इतर राज्यातील एसटीविषयक बातम्या ऐकल्या की , हे विधान आपल्या महाराष्ट्र एसटीला तर लागू पडत नाहीना ? असी दाट शंका येते.       एकेकाळी भारतातील इतर एसटी महामंडळाला महाराष्ट्र एसटी महामंडळाचा आदर्श होता. महाराष्ट्र एसटी सारखी सेवा आपल्या राज्यातील जनतेला देण्याचा प्रयत्न एसटीने करावा , असे केंद्राकडून इतर एसटीला सांगण्यात येत असे. आपल्या बसेसच्या रंगसंगतीशी मिळतीजूळती रंगसंगती आंध्रप्रदेश एसटी ठेवण्याचा प्रयत्न करत असे. आपल्या महाराष्ट्र एसटीने 1962 आणि 1965 च्या युद्धात शत्रूविरुद्ध लढण्यासाठी लष्कराला विक्रमी वेळात बस बांधून दिली होती. 1983 साली नवी दिल्लीत झालेल्या आशियाई खेळासाठी आलेल्या परदेशी खेळाडूंना आरामदायी प्रवास घडवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र एसटीकडून विशेष बसेस बांधण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या सर्वात आरामदायी बसेस म्हणून त्या ओळखल्या जात.आपण त्यांना हिरकणी किंव...

महाराष्टाचा आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२

इमेज
             महाराष्ट्र भारताच्या२७  राज्यांपैकी क्षेत्रफळाने ३ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य . देशाला अनेक बाबतीत दिशाग्दर्शन करणारे, समाजसुधारणेचा मोठा वारसा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष २०२१-२२चा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवार ११  मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळासमोर मांडण्यात आला. आपल्या संसदीय प्रणालीनूसार अर्थसंकल्पाचा आदल्या दिवशी तो मांडण्यात येतो ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहेत त्याचा एक दिवस आधी म्हणजे १० मार्चला तो राज्याचे  अर्थ राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी विंधनसभा आणि विधान परिषद या    विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात  तो सादर केला  हा अहवाल मागच्या वर्षाची अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत असल्याने हा मागच्या वर्षाचा असतो. तर अर्थसंकल्प पुढील वर्षाचे प्रतिनिधित्व करतो . गुरुवारी मांडला गेलेला आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक वर्ष २०२१ -२२  साठी होता तर शुक्रवारी  मांडण्यात येणारा अर्थसंकल्प २०२२ -२३  या आर्थिक वर्षासाठी असेल   या आर्थिक पाह...

कधी येणार आपल्या अजेंड्यावर हवामान बदल?

इमेज
             सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर रशिया युक्रेन युद्धाबाबतचे अत्यंत हास्यास्पद वाटाव्या अश्या बातम्या किंवा विविध  राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप  आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या बाबत असणाऱ्या बातम्यांचा महापूर आपल्याकडे आणत असताना आपल्या महाराष्ट्रातील एक खूप मोठा भूभाग बेमोसमी पावसामुळे त्रस्त झालेला आहे  आणि हा भूभाग या २०२२ या वर्षीच बेमोसमी पावसाने त्रासलेला आहे असे नाही गेल्या काही वर्षाच्या इतिहास बघितला तर आपणास महाराष्ट्रात अनेकदा बेमोसमी पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे .नारद भगवान विष्णूंना विचारताय .भगवान हे काय ? त्यावेसेस नारद मार्च एंडिंग आहे हिशोब पूर्ण करायला लागणारच ना ?असे उत्तर भगवान  विष्णू नारदांना देत आहेत  किंवा स्वेटर घालू कि रेनकोट?  असा प्रश्न मला पडलाय हिवाळा अधिक पावसाळा बरोबर हिवासाळा हा ऋतू असे अनेक व्यगंचित्र कोट्या आपण समाज  माध्यमांमध्ये अनेक वर्षांपासून करत आलेलो आहोत . मात्र तरीही समाजाच्या अजेंडयावर हवामान बदल हा विषय दिसत नाहीये . नाही म्हणायला काही प...

आगीतून फुफाट्यात श्रीलंका

इमेज
            जेव्हा एखाद्यवर एकामागून एक  अशी अनेक संकटे येण्यास सुरवात होते तेव्हा त्याची अवस्था  आगीतून फुफाट्यात पडण्यासारखी झाली आहे असे आपण म्हणतो .सध्या श्रीलंकेची अवस्था देखील काहीशी अशीच झाली आहे श्रीलंकेचे आर्थिक संकट दिवसोंदिवस अधिकच गंभीर होत असल्याने  श्रीलंका सध्या  आगीतून फुफाट्यात पडण्याचा अनुभव घेत आहे मार्चच्या सुरवातीपासून  श्रीलंकन सरकारने संपूर्ण देशात साडेसात तास हो साडेसात तासाचे लोडशेडिंग सुरु केले आहे सध्या श्रीलंकेत प्रचंड उन्हाळा असल्याने जलविद्युत बंद आहे . नैसर्गिक इंधने खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने नैसर्गिक इंधनाचे कंटनेर श्रीलंकन बंदरात उभे आहेत मात्र पैसे न दिल्याने कंटनेरमधील नैसर्गिक इंधने श्रीलंकेला वापरता येत नाहीये . परिणामी गेल्या २६ वर्षात झाले नाही असे ऊर्जा संकट श्रीलंकेत निर्माण झाले आहे तेथील नागरिक पेट्रोल पंपावर आता तरी पेट्रोल डिझेल मिळेल या आशेवर तासनतास आपली वाहने उभी करून बसले आहेत . तेथील मासेमारी नौकांना डिझेल मिळत नसल्याने श्रीलंकेतील मच्छव्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे जो ...