पोस्ट्स

संसदेच्या अधिवेशनातून (भाग २ )

इमेज
सध्या भारतात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे ब्रिटिश भारतात   लागू करण्यात आलेल्या १९३५ च्या भारतीय प्रशासन कायद्यानुसार अमलात आलेली तरतूद जी भारतीय संविधानाच्या ८५ व्य कलमात अंर्तभूत   आहे ,  या तरतुदीनुसार एका वर्षात किमान दोन संसद अधिवेशने होणे अत्यावश्यक आहे तसेच प्रत्येक अधिवेशनामध्ये ६ महिन्यापेक्षा अधिक कालावधी असू नये अशी तरतूद आहे मूळ १९३५ च्या कायद्यामध्ये संसदेचे प्रत्येक वर्षी एक अधिवेशन घेणे अत्यावश्यक होते पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर तयार करण्यात आलेल्या संविधानानुसार एका वर्षात किमान २   अधिवेशने घेणे आवश्यक आहे संविधानातील तरतूद २ अधिवेशनाची असली तरी   प्रत्यक्षात ३ अधिवेशने होतात फेब्रुवारीत होणाऱ्या अधिवेशनाला अर्थसंकल्पीय अधीवेशन म्हणतात तर पाऊस पडण्याच्या काळात होणाऱ्या अधिवेशनाला मानसुम   अधिवेशन म्हणतात तर हिवाळ्याच्या काळात होणाऱ्या अधिवेशनाला हिवाळी अधिवेशन म्हणतात   . सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सध्या होणारे अधिवेशन ...

संसदेच्या अधिवेशनातून

इमेज
  सध्या नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे सध्या सुरु असणारे संसदेचे अधिवेशन १७ व्या लोकसभेचे दहावे अधिवेशन आहे . कोणत्याही संसदेने आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यास त्या लोकसाभेची एकूण १५ अधिवेशने होतात त्या नुसार सध्या कार्यरत असणाऱ्या लोकसभेची अजून ५ अधिवेशने शिल्लक आहेत  आपल्या संसदीय प्रणालीनुसार प्रत्येक वर्षात ३ संसदेची अधिवेशने होतात जी पावसाळी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशने म्हणून ओळखली जातात . १९५२ रोजी आपल्या देशात पहिल्यांदा लोकसभा अस्तित्वात आली . तिचे पाच वर्षानंतर विसर्जन होऊन पुढील ५ वर्षांनी पुढील लोकसभा अस्तित्वात आली त्या हिशोबाने सध्या १७ वी लोकसभा कार्यरत आहे तर सध्या सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य असलेले खासदार देशासाठी महतवाच्या असणाऱ्या विविध प्रश्नावर सरकारच्या मंत्रालयाला प्रश्न विचारत आहेदेशासाठीअत्यंत महत्वाचे असणारे परराष्ट्र मंत्रालय देखील यातून सुटले नाहीये ७ डिसेंबरला अधिवेशन सुरु झाल्यापासून हा लेख लिहण्यापर्यंत ( १३ डिसेंबर सायंकाळ )राज्यसभेत  विचारण्यात आलेलं एकूण तेरा प्रश्न हे...

पाकिस्तान समस्येच्या चक्रीवादळात

इमेज
      सध्या आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तान एका प्रचंड मोठ्या समस्येच्या चक्रीवादळात सापडले आहे. आर्थिक संकट कमी की काय ?म्हणून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर प्रचंड प्रमाणात तणाव आहे. .  कोणताही देश जेव्हा त्याचे कर्जाचे हप्ते , तसेच आयातीचे शुल्क देवू शकत नाही, तेव्हा तो देश दिवाळखोर म्हणून जाहिर केला जातो. आजमितीस पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय कर्ज आहे. त्याचा पुर्ततेसाठी दर तीन महिन्यांनी पाकिस्तान मोठ्या प्रमाणात आपल्यकडील परकीय चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देश ,संस्था यांना देवून कर्जाची परतफेड करत असतो. त्याप्रमाणे 6डिसेंबर रोजी कर्जाचा हप्ता दिल्यानंतर पाकिस्तानकडे परकीय चलनाचा साठा जवळपास संपल्यातच जमा आहे. निर्यात जवळपास संपल्यातच जमा असल्याने नवे परकीय चलन मिळण्याचा मार्ग खुपच संकुचित आहे. ज्यामुळे पुढील  कर्जाचा हप्ता चूकवण्यासाठी परकीय चलन कुठुन आणायचे ?हा पाकिस्तानसमोरील मोठा प्रश्न आहे परदेशी माल पुरवठादारांना परकीय चलन न दिल्याने मोठ्या प्रमाणात विविध उत्पादने पाकिस्तानच्या बंदरात पडून आहेत. जेव्हा पाकिस्तानकडून  संबंधित परकीय माल पु...

भारताचे अशांत शेजार

इमेज
      पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचे . दोन शेजारी एक पूर्वेकडे आहे एक पश्चिमीकडे .कोणे एकेकाळी एकाच देशाचे भाग असलेले मात्र कालांतराने विविध कारणास्तव विभक्त होऊन दोन स्वतंत्र झालेले हे दोन देश   ते विभक्त होऊन आज ५० वर्षे झाल्यावर पुन्हा एकदा हे देश एका सामान कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते म्हणजे देशातील केंद्रीय सत्तेने सत्ता सोडावी या साठी प्रमुख विरोधी पक्षांनी आंदोलन आणि त्यास मिळणारा अभूतपूर्व पाठिंबा या दोन्ही देशातील आंदोलनाने विविध प्रकारचे हिंसक स्वरूप धारण केले आहे पाकिस्तनमध्ये या आंदोलनदरम्यान पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ,ज्यातून ते बचावले तर बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनात एका आंदोलकास १० डिसेंबर रोजी प्राणास मुकावे लागले दोन्ही देशातील केंद्रीय सत्तेच्या कालावधी दीड वर्ष बाकी असताना ते देशाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरले आहेत त्यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली . देशाचे परराष्ट्र धोरण स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार न करता अन्य देशाला अनुकूल ठरेल अश्या प...

भारतियांनो तुमची घटिका भरली

इमेज
भारतियांनो तुमची घटिका भरली आहे . हे सिद्ध करणारा अहवाल नुकताच जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे या अहवालानुसार येत्या नजीकच्या भविष्यकाळापासून मोठ्या तापमानाचा  भारतातला जगात सर्वाधिक फटका बसणार आहे यासह भारतात उन्हाळ्याचा कालावधी वाढणार आहे उन्हाळा लवकर सुरु होऊन उशिरा संपणार आहे . Climate Investment Opportunities in India's Cooling Sector या नावाचा हा अहवाल "India Climate and Development Partners' Meet या दोन दिवशीय परिषदेत मांडण्यात आला केरळ सरकारच्या सहकार्याने  जागतिक बँकेमार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तिरुअतनपूरम या शहरात ही परिषद झाली या अहवालात सांगण्यात आले आहे की, त्यात पुढे म्हटले आहे की, दक्षिण आशियाचा विचार करता या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे  ज्यामध्ये एक मनुष्य दिवसभरत  ८ तास काम करतो जर दोन माणसांनी प्रत्येकी ८ तास काम केले तर ते काम १६ तास होईल या पद्धतीने मोजल्यास   वर्षभरात  मनुष्य काम करू शकतील अश्या  १०१  अब्ज तासांपेक्षा जास्त तास काम होऊच या उन्हामुळे...