पोस्ट्स

जोशीमठाच्या आपत्तीतून आपण घ्यावयाचे धडे

इमेज
                   उत्तराखंड राज्यातील जोशीमठ या शहरात भौगोलिक स्थितीमुळे झालेली आणीबाणीची स्थिती ऐव्हाना आपणास मोठ्या प्रमाणात माहिती झालेली असेल.विविध भुगर्भ शास्त्रज्ञांनी या आधी दिलेले सुरक्षेतेचे इशारे देखील आपणास माध्यमांमार्फत आपणास ठाउक असतील जोशीमठ येथील संकट भयानक आहेच ,यात शंकाच नाही. मात्र पुर्णतः जोशीमठ सारखेच नाही मात्र त्याच तीव्रतेचे संकट आपल्या महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे कोकणाचे .              कोकणचे भुगर्भ अत्यंत सुरक्षीत असले तरी  सयुंक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणीय संघटनेने कोकणच्या  पर्यावरणाचा समावेश पृथ्वीवरील अत्यंत संवेदनशील पर्यावरणात करण्यात केला आहे. कोकणात मोठे प्रकल्प नको असा अहवाल माधवराव चितळे आणि गाडगीळ समितीमार्फत आधीच देण्यात आला आहे. तरीदेखील काही प्रकल्प कोकणच्या माथी मारण्यात येत आहे. ज्यामुळे भविष्यात मोठी समस्या उभी ठाकली तर आश्चर्य वाटायला नको. उत्तराखंड राज्यात देखील या आधी देण्यात आलेले सुरक्षीतचे नियम पायदळी तूडवल्याचे परीणाम आपण बघत आहोतच. तोच धोका ...

हि तरुणाई प्रशासनातील आव्हाने पेलू शकेल ?

इमेज
राज्य लोकसेवा आयोगाच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या  परीक्षेद्वारे राज्य प्रशासनातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकारीवर्गाच्या पदावर  नियुक्तहोण्यासाठी प्रयत्नशील युवकांच्या  आणि युवतींच्या आंदोलनाने १३ जानेवारीचा संपूर्ण दिवस धगधगता ठेवला . ज्याचा जोर प्रामुख्याने पुण्यात होंता मात्र औरंगाबाद कोल्हापूर या  शहरांसह  राज्यभरात ठिकठिकाणी  याबाबतचे आंदोलन झाले .गेल्यावर्षी  २६ जूनच्या  सुमारास महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाने अभ्यासात केलेले बदल मागे घेऊन जुन्याच पद्धतीनेपरीक्षा घेण्यात याव्यात अशी उभा भावी अधिकाऱ्यांची (?) मागणी आहे आम्ही सुमारे  दोन वर्ष आधीपासून या परीक्षेचा अभ्यास करत आहोत . आम्हाला इतक्या  लवकर हे बदल स्वीकारत नव्याने अभयास करणे जमणार नाही तरी या बदलानुसार परीक्षा २०२५ पासून घेण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे          या भावी अधिकऱ्यांची मागणी लक्षात घेतल्यास एक  प्रश्न निर्माण होत आहे ज्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे  लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच .तर तो प्रश्न आहे  ...

जागतिक स्तरावर हवामान बदलावरून नव्या वादंगाला सुरवात

इमेज
         गुरुवार १२ जानेवारी रोजी युनाटेड अरब अमिरात ( युएइ ) या   देशाने केलेल्या एका घोषणेने जागतिक स्तरावर    हवामान बदलावरून नव्या वादंगाला सुरवात झाली आहे . चालू वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात   किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरवातीच्या आठवड्यात    युनाटेड अरब अमिरात या देशात होणाऱ्या Conference  Of Parties ( जे   आपल्या अद्यक्षरांवरून COP नावाने अधिक प्रसिद्ध आहे ) च्या अधिवेशनाच्या संदर्भात केलेल्या एका घोषणेने हा वाद सुरु झाला आहे युनाटेड अरब अमिरात या देशाच्या राष्ट्रीय तेल उत्पादक कंपनीचे कार्य्रकरी प्रमुख या COP २८ चे प्रमुख   असतील हीच ती घोषणा होय . कोल्ह्याच्या तावडीत बकऱ्यांची सुरक्षा देण्याचा हा प्रकार आहे / स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पर्यावरणाची हानी करणाऱ्या व्यक्तीच्या हाती पर्यावरणाच्या संरक्षणाची जवाबदारी कोणत्या अधिकारात देता येऊ शकते ? चोराच्या हाती खजिन्याचा किल्ल्या देण्याचा हा प्रक...

अर्थव्यवथा गाळात राजकारण जोरात

इमेज
       अर्थव्यवथा गाळात राजकारण जोरात  या  एकाच वाक्यात पाकिस्तानातसध्या  घडणाऱ्या घडामोडींचे वर्णन करता येऊ शकते अर्थव्यवस्थेच्या  दुरावस्थेमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता रोजच्या जगण्यासाठी अन्नास मोताद झाली असताना ,पाकिस्तानच्या गृहमंत्र्यासह विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीके ए इन्साफ या पक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष यासह सर्व राजकारण्यांचे लक्ष मात्र पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत रंगणाऱ्या राजकारणाकडे लागले आहे देशात असणाऱ्या चार राज्यांपैकी एका राज्यात दहशतवादी कृत्याने उच्चांक गाठला असताना .अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईस आलेली असताना  त्यावर बोलायचे सोडून देशातील एका राज्याच्या विधानसभेबाबत होणाऱ्या राजकारणाबाबत देशाचा गृहमंत्री माध्यमांना प्रतिक्रिया देत सुटला आहे या प्रतिक्रियांमध्ये त्या राज्यात  सत्ताधिकारी मात्र केंद्रीय सत्तेचा विचार करता विरोधी पक्ष असलेल्या पक्षाने लोकशाहीचे  सर्व संकेत पायदळी तुडवल्याचा आरोप करत आहे आहे देशाच्या   प्रगतीत ६० ते ६५ % वाटा चालणाऱ्या राज्यामध्ये  मोठ्या प्रमाणत राजकीय अस्...

राष्ट्रीय भुगोल दिनाच्या निमित्याने -

इमेज
भूगोल आपल्यापैकी अनेकांचा शालेय स्तरावरील नावडता विषय . . मात्र हा विषय आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त असणारा विषय आहे   . आपण भूगोल विषयाशी पूर्णपणे बांधली गेलो आहे . मराठवाडा हा मागास का आहे ? जागतिक राजकारणात काश्मीरचे महत्व मोठ्या प्रमाणवर का आहे ?    राजस्थान आणि गुजरात या राज्यातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात व्यवसायात का आहेत ? पंजाबला धान्याचे कोठार म्हणून का ओळखले जाते   ? सिंगापूर या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती कशी काय केली ? सध्या मोठ्या प्रमाणत चर्चिला जाणारा जोशी मठाचा प्रश्न मुळात का निर्माण झाला अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणस भूगोलाच्या विविध उपशाखांच्या अभ्यासाने समजतात ,       भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल ( political geography   ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military   geography ) वगैरे . मात्र शालेय ...