पोस्ट्स

महाराष्टाचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23

इमेज
    महाराष्ट्र भारताच्या२७  राज्यांपैकी क्षेत्रफळाने ३ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य . देशाला अनेक बाबतीत दिशाग्दर्शन करणारे, समाजसुधारणेचा मोठा वारसा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष 2022-23चा आर्थिक पाहणी अहवाल 8 मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळासमोर मांडण्यात आला. आपल्या संसदीय प्रणालीनूसार अर्थसंकल्पाचा आदल्या दिवशी तो मांडण्यात येतो  9 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहेत त्याचा एक दिवस आधी म्हणजे 8  मार्चला तो राज्याचे  अर्थमंत्री देवेन्द्र फडणविस  यांनी विंधनसभा आणि विधान परिषद या  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तो सादर केला  हा अहवाल मागच्या वर्षाची अर्थव्यवस्थेबाबत भाष्य करत असल्याने हा मागच्या वर्षाचा असतो. तर अर्थसंकल्प पुढील वर्षाचे प्रतिनिधित्व करतो . बुधवारी  मांडला गेलेला आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक वर्ष2022 2-23  साठी होता तर गुरुवारी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प 2023-24 या आर्थिक वर्षासाठी असेल   या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अर्थव्यवस्थेचा गेल्या आर्थिक वर्षातील प्रवाश्...

पाकिस्तनमधील राजकारण कोणत्या वळणावर ?

इमेज
     पाकिस्तानातील राजकारण कोणत्या वळणावर ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या प्रकाराच्या बातम्या सध्या पाकिस्तानमधून येत आहेत . पाकिस्तानमधील केंद्रीय सत्तेचा विचार करता प्रमुख आणि जवळपास एकमेव म्हणावे  असे विरोधी पक्षनेते पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत तसेच खैबर ए पख्तुन्वा आणि  देशातील महत्त्वाच्या प्रांत असलेल्या पाकिस्तनी पंजाब या प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका होण्याबाबत   ज्या बातम्या येत आहेत ते बघता येत्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडणार हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट आहे .          पाकिस्तानी संविधानुसार प्रांताच्या विधानसभा विसर्जित झाल्यावर ९० दिवसात त्या ठिकाणी निवडणुका घेणे बंधनकारक असताना  दोन्ही प्रांताच्या विधानसभा विसर्जित होऊन ४५ दिवस होता आले असतांना अजून पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडून याबाबत काहीच पाऊले उचलली जात नसल्याने निवडणुकीचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे निवडणुक आयोगाच्या निष्कियतेबाबत न्यायालायने ताशेरे ओढल्...

आतातरी हवामानबदल हा मुद्दा चर्चेत येणार का?

इमेज
        सध्या उत्तर महाराष्ट्र बेमोसमी पावसाचा तडाखा सहन करतोय.या तडाख्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यथावकाश या नुकसानीचे पंचनामे होऊन   शेतकऱ्याना  योग्य तो मोबदला देखील मिळेल . मात्र गेल्या काही वर्षातील मार्च महिन्यातील घडामोडी बघता हा पाऊस काही नवीन घडामोडी राहिला नाहीये हा लेख वाचणारे सुद्धा सध्या पडणाऱ्या पावसाचा व्हिडीओ किंवा यावरील एखादे व्यंगचित्र फेसबुकवर अपलोड करून पुढील २०२४ या वर्षी फेसबुक मेमरी द्वारे त्यांचा अनुभव घेऊ शकतात किंवा मागील काही वर्षात ज्यांनी याविषयी फेसबुकवर काहीतरी अपलोड केले आहे ते याचा अनुभव घेतच असतील     मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या समस्येचा आपण अनुभव घेत असून देखील आपल्याकडून या समस्येला तोंड देण्यासाठी काही ठोस कायमस्वरूपी उपाययोजना केल्याचे चित्र समोर येत नाहीये दरवर्षी शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्पुरती मलमपट्टी केली जाते मात्र जगभरात ज्या प्रमाणे सरकारे हवामानबदला या विषयावर बदलली त्याप्रमणे आपल्या देशात काहीही होत नाही मागील वर्षी २०२२ मध्ये  मे महिन्यात ऑ...

पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा पाय खोलात

इमेज
       पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्यांकडे नजर टाकल्यास , अर्थव्यवस्थेचा पाया  दिवसोंदिवस खोलात जात असल्याचे  दिसून येत आहे / आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळण्यासासाठी तेथील केंद्रीय सत्ता नैसर्गिक इंधनाचे दर सातत्याने वाढवत असताना वाढती महागाई नियंत्रांत आणण्यासाठी तेथील मध्यवर्ती बँकेने तेथील व्याजदर  ३ ५ने वाढवले आहेत ज्यामुळे तेथील व्याजदर २५ % झाले आहेत त्यामुळे पाकिस्तानात कोणी बँकेचे कर्ज घेऊन व्यवसाय करणे निव्वळ अशक्यप्राय झाले आहे आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून निधी मिळवण्यासाठी या प्रकारचे पाऊल टाकल्याचे सांगण्यात येत आहे २ मार्च रोजीअमेरिकी डॉलरचा भाव २८५ पाकिस्तानी रुपया होता जो २ मार्च या एकाच दिवसात १९ रुपयांनी वाढला इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले त्यावेळी अमेरिकी डॉलरचा भाव १७८ रुपये होता इम्रान खान यांच्या साडेतीन वर्षात अमेरिकी डॉलर पाकिस्तानी रुपयाचा विचार करता ५० रुपयांनी वाढला होता तर इम्रान खान हे प्रमुख विरोधी पक्षनेते असतांनाचा १० महिन्यात पाकिस्तानी रुपया अमेरिकी डॉलरचा तुलनेत १०७ पाकिस्तानी रुपयांनी घ...

आता तरी बेक्सिट पूर्णपणे यशस्वी होईल का

इमेज
आजपासून सुमारे अडीच वर्षांपूवी समस्त युरोप खंड  आणि युनाटेड  किंगडम (इंग्लंड ) यांच्यामध्ये मोठा कळीचा मुद्दा झालेल्याबेक्सिटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येत आहे .  आणि याला कारणीभूत ठरला आहे ज्या  मुद्यामुळे बेक्सिटची बोलणी बराच काळ चालली युनाटेड किंग्डमच्या तीन पंतप्रधांना  सत्ता सोडावी लागली तोच मुद्दा अर्थात बेक्सिट नंतर नॉर्दन आर्यलँड  हा  युनाटेड किंगडममधील भाग आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड  या देशातील  संबंध कसे राहतील ? या दोन्ही भागात  गुड फ्रायडे अग्रीमेंट या १९९९ साली करण्यात आलेल्या करारानुसार निश्चित करण्यात आलेले संबंध पूर्ववत राहतील का?  हाच . २७ फेब्रुवारी २०२३ साली युनाटेड किंग्डम या देशाचे पंतप्रधान ऋषी सुनाक आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात या मुद्द्यांवर  करार करण्यात आला या करारामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे      यामुळे सुमारे ३ दशक मोठ्या प्रमाणत हिंसाचार बाघितलेला नॉर्दन आयर्नल्ड पुन्हा एकदा २५ वर्षांनी संघर्षाचा केंद्रबिंदू झा...

भारत जगाचे आशास्थान

इमेज
भारत जगाचे आशास्थान झाल्याचे वारंवार सिद्ध होताना सध्या दिसत आहे ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण अमेरिका खंडातील  एल साल्वाडोर या देशाच्या  परराष्ट्रमंत्री श्रीमती अलेक्झांड्रा हिल टिनोको या भारत भेटीवर येऊन काही दिवस उलट नाहीत तोच त्याच भागातून दुसऱ्या देशाचं अर्थात गयाना या देशाचे उपराष्ट्रपती  डॉ. भरत जगदेव २० ते २५  फेब्रुवारी या दरम्यान  भारताच्या दौऱ्यासाठी आले होते  आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या आमंत्रणावरून त्यांनी हा दौरा केला    डॉ. जगदेव 22-24 फेब्रुवारी 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे TERI (द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत सहभागीझाले होते आपल्या या दौऱ्यात गयानाच्या उप्राष्ट्र्पतींनी आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपले उपराष्ट्रपतीजगदीप धनखर  आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंक , आपले पेट्रोलियम मंत्रीनरेंद्रसिंग तोमर  आदींशी   ट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कृषी, कृषी प्रक्र...

भारत जगातील उभारती महासत्ता

इमेज
भारत आगामी काळातील उभारतीम महासत्ता आहे याचा प्रत्यय सध्या वारंवार येत आहे दक्षिण अमेरिका ,ओशियाना आफ्रिका मध्यपूर्व आशिया , मध्य आशिया .युरोप आदी जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे भारतात वाढलेले दौरे याचीच साक्ष देतात . गेल्या व ते अडीच वर्षांपासून असा एखादाच आठवडा असेल ज्यावेळी भारतात कोणत्यातरी देशाचे राष्ट्रप्रमुख आले नाहीत . किंवा भारताच्या परराष्ट्रमंत्री ,सरंक्षण मंत्री अन्य कोणत्यातरी देशांच्या अधिकृत दौऱयावर गेले नाहीत जगातील दोन देशातील संबंध हे फक्त आणि फक्त फायद्यावर चालतात आपला फायदा असल्याशिवाय कोणताही देश दुसऱ्या देशाबरोबर परोपकारी भूमिकेतून संबंध प्रस्थापित करत नाही याचा विचार करता जगात बळकट झाल्याचे दिसून येत आहे आणि हेच स्थान अजून बळकट कारण्यासासाठी चेक रिपब्लिकन या मध्य युरोपातील भूवेष्टित देशाचे परराष्ट्र मंत्री जॅन लिपावस्की २६ फेब्रुवारी-ते १  मार्च  दरम्यान भारताला अधिकृत दौऱ्यावर  येणार आहेत. त्यांच्यासमवेत संसद सदस्य, विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम विभागाचे उपमंत्री आणि उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसाय...