पोस्ट्स

31वर्षे अभिमानाची*

इमेज
आकाशातील उपग्रह ग्रह, तारे, तेजोमेघ, दिर्घीका यांच्या अभ्यासासाठी असणाऱ्या दुर्बिणी आपण आजकाल अनेकांकडे बघतो. .दुरवरुन येणाऱ्या प्रकाशाचे दृश्य स्वरूप त्या आपणास दाखवतात. मात्र एकुण प्रकाश लहरींपैकी फारच कमी प्रकाशलहरी आपणास दिसतात.  आपणास ज्या दुर्बिणी दिसतात त्या या दिसणाऱ्या प्रकाशलहीरीचे दृश्य स्वरूप असते .मानवी डोळ्यास न दिसणाऱ्या रेडिओ लहरीमध्ये गँमा किरण, एक्स रे, अल्टा साउंड किरण, आदींचा समावेश होतो. आपणास दिसणाऱ्या प्रकाशलहरींपेक्षा यांचे विश्व खुपच मोठे आहे. या लहरीच्या अभ्यासातून अनेक रंजक बाबी मानवास ज्ञात झाल्या आहेत. जसे कृष्णविवरांचे अस्तिव, लाल महाराक्षसी तारा ,श्वेतबटू तारा, न्युट्राँन स्टार वगैरै. या प्रकाशलहरींचा अभ्यासासाठी ज्या दुर्बिणी उभारल्या जातात. त्यांना रेडीओ दुर्बिणी उभाराव्या लागतात. या रेडीओ दुर्बिणी उभारणे त्यातून निरीक्षण करणे हे वैयक्तिक एकाचे कार्य नाही. त्यासाठी प्रचंड पैसा, जागा, मनुष्यबळ लागत असल्याने हे कार्य सरकारी पातळीवरच करण्यात येते .जगातील अनेक भागात अस्या सरकारी पाठबळ्यावर रेडिओ दुर्बिणी आहेत. आपल्या भारतातच नव्हे महाराष्ट्रात सुद्धा आह...

भारताचा दक्षिण अमेरिका खंडात वाढता डंका

इमेज
आपल्या भारताच्या जगभरात डंका सातत्याने वाढत आहे . जगभरातील कोणतेही क्षेत्र भारताच्या प्रभावापासून दूर राहिलेले नाहीये . पृथ्वीगोलाचा विचार करता भारताच्या पूर्णतः विरुद्ध असलेला दक्षिण अमेरिका खंड देखील त्यापासून सुटलेला नाहीये याच भागातील   गयाना ,   पनामा , कोलंबिया आणि डॉमिनिकन रिपब्लिक   या देशांना   आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर   परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून एप्रिलच्या शेवटच्या आटवड्यात   अधिकृत भेट देणार आहेत. या देशांना त्यांची ही पहिलीच भेट असेल.   गयानामध्ये,   21 ते 23   एप्रिल   या दरम्यान    परराष्ट्र व्यवहार मंत्री   अनेक मंत्र्यांशी संवाद साधणार आहे. ते त्यांचे समकक्ष यांच्यासमवेत संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्ष असतील. श्री ह्यू हिल्टन टॉड हे दोन्ही देशांमधील सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील.    हा    गयाना दौरा भारतासाठी   कौन्सिल ऑन फॉरेन अँड कम्युनिटी रिलेशन्स (COFCOR);या   15 सदस्यीय कॅरिबियन   देशातील (CARICOM))   परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच...

स्मरण एका भारत बदलणाऱ्या घटनेचे

इमेज
                 आज बुधवार 19 एप्रिल 2023 आजच्याच दिवशी 48 वर्षापूर्वी म्हणजे 1976 एप्रिल 19 रोजी एक चमत्कार घडला होता. एक विकसनशील देशाने युनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट रशिया या देशाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह आकाशात यशस्वी प्रक्षेपित केला होता. तो विकसनशील देश होता भारत. आणि त्या उपग्रहाचे नाव.होते आर्यभट्ट . आज भारत जगभरातील अनेकांचे उपग्रह स्वतःच्या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपीत करतो, भारताचे सुद्धा कित्येक उपग्रह आज अंतराळात भ्रमण करत आहेत. या सर्वाची मुहुर्तमेढ या गोष्टीने रोवली गेली होती. या ऐताहासिक घटनेच्या 48व्या वर्धापनदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा .                            मित्रांनो, त्यावेळी भारतात प्रचंड प्रमाणात भुकबळी जात होते. गरीबांची संख्या देखील प्रचंड होती. देशातील दूधाचे उत्पादन नगण्य होते. मासेमारीत देश जगाचा विचार करता प्रचंड मागे होता. अस्यावेळी काळाची पाउले ओळखून उचललेल्या पाउल किती गरजेचे आहे. हे आपण जाणतातच.      ...

बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची चुरस कायम

इमेज
    सध्या आपल्या भारतात आय पी एल चा ज्वर असला तरी जागतिक पातळीचा विचार करता समस्त जगताचा नजारा बुद्धिबळाचा विश्वविजेता कोण होणार ? याकडे लागलेल्या आहेत .विद्यमान विश्वविजेता   मॅग्नस कार्लसन यांनी त्यांना विश्वविजेता पदाची स्पर्धा खेळण्यात उत्सुकता नसल्याचे जाहीर केल्यावर पहिल्यादाच   होणारी ही स्पर्धा त्यामुळे विशेष ठरत आहे मागील विश्वविजेता पदाचा आव्हानवीर नेपोमनिशी आणि या वर्षाचा विश्वविजेतेपदाचा आव्हानवीर ठरवण्यासाठी झालेल्या कॅन्डीडेट स्पर्धेचा विजेता डिंग लिरेन यांच्यात ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे   काझकिस्तानमधील   अस्ताना शहरात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण १४ डाव खेळवण्यात   येणार असून खेळाडूंना जिंकल्यास एक गुण तर सामना बरोबरीत सुटल्यास अर्धा गुण देण्यात येणार असून जो खेळाडू सर्वप्रथम साडेसात गुणांची कमाई करेल त्यास विश्वविजेता म्हणून जाहीर करण्यात येणार आहे रविवार १६ एप्रिल सायंकाळचा विचार करता स्पर्धेत ६ डाव खेळण्यात आलेले असून दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी दोन विजय आणि दोन डावात बरोबरी असे एकूण ३-३ गुण झाले आहेत दोन्ही खेळाडूंचे स्पर्ध...

भारतीय रेल्वे नॉट आउट @170

इमेज
येत्या रविवारी 16तारखेला आपल्या सर्वांच्या भारतीय रेल्वेला 170 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतीय रेल्वेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा  ज्या तीन गोष्टींने  समस्त भारताला जोडुन ठेवले आहेत ,त्या म्हणजे बाँलीवूड, क्रिकेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे विस्ताराच्या बाबतीत अजस्त्र आहेच,मात्र 21 शतकातील विकसीत भारताचे प्रतिनिधित्व करत आधुनिक देखील होत आहे, वंदे भारत एक्सप्रेस (जूने नाव ट्रेन18) हे त्याचे जिवंत उदाहरण .या खेरीज रेल्वेच्या वाहतूकीत मोठा वाटा असणाऱ्या प्रवाश्यांचा विचार करत भारतातील सर्व प्रवाशी गाड्यांना प्रवाश्यात कमी धक्के देणारे तसेच दुर्दैवाने अपघात झालाच तर एकमेकांवर न चढणाऱ्या (ज्यामुळे प्राणहानी टळते) अत्याधुनीक एल एच बी कोचेसची भेट देत तसेच भारतीयांना जलद प्रवाश्याची अनभुती येण्यासाठी सेमी हायस्पिड प्रकारची सेवा देण्यासाठी देखील तयारी करत हम है तयार हाच अनुभव भारतीयांना देण्यासाठी स्वतः तत्पर करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.  वेगवेगळ्या18प्रकारच्या  प्रवाशी गाड्या( राजधानी , संपर्कक्रांती, दुरंतो,...

चीनच्या प्रगतीची कुळकथा सांगणारे पुस्तक "चिनी महासतेचा उदय - डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग"

इमेज
      चीन,भारता  इतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश , भारताच्या महासत्ता पडला अडथळा ठरणारा देश , भारताबरोबर सीमावाद असणारा आणि त्या वादाला वेळोवेळी ताजे करणारा देश म्हणजे चीन भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तानसह भारताच्या सर्व शेजाऱ्यांना आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी धडपडणारा देश म्हणजे चीन भारताबरोबर शांघाय को ऑपरेशन हे संघटन तसेच  ब्रिक्स संघटना  आदी विविध आंतराष्ट्रीय व्यासपीठवरील सहकारी.   स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या पहिल्या अमेरिकी दौऱ्यात ज्या २ देशांचा उल्लेखहे देश  निद्रिस्त ड्रॅगन  आहेत आणि हे  ड्रॅगन जागे होतील तेव्हा जगाची झोप उडवेल असा केला होता त्यापैकी एक देश म्हणजे चीन  (दुसरा देश जपान ) स्वामी विवेकानंद यांनी निद्रिस्त ड्रॅगन म्हणून उल्लेल्ख केलेला चीन हा खरोखर १९७८ पासून जागा झाला आणि तो आता खरोखर जगाची झोप उडवत आहे या दरम्यानचा त्याचा प्रवास सांगणारे पुस्तक म्हणजे निवृत्तीनंतर नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेले सनदी अधिकारी सतीश बंगाल यांनी लिहलेले आणि साधना प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तक...

जी २० आणि भारत

इमेज
     भारत या वर्षी जी २०चे अध्यक्षपद भूषवत आहे हे एव्हाना सगळ्यांना माहिती असेलच . या अध्यक्षपदाच्या कालावधीत विविध   स्तरावरील अधिकारी मंत्रीगण यांच्या देशभरातील वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या विविध परिषद देखील आता आपणास अंगवळणी पडल्या असतील . या विविध शहारत होणाऱ्या परिषदांमुळे भारताताची जगात एका वेगळी ओळख होत असल्याने आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसलो तरीही एक जवाबदार नागरिक म्हणून आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे ( स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीने एकवेळ स्वतःचे नाव विसरले तरी चालेल मात्र जी २० च्या परिषदेला विसरायला नको स्पर्धा परीक्षेत शहर आणि त्यांच्या विषय आणि आणि कोणत्या शहरात कधी परिषद झालीयावर पूर्व परीक्षेत हमखास प्रश्न येऊ शकतो   )   चला तर मग जाणून घेउया ७ एप्रिल पर्यंतच्या जी २०च्या परिषदा कोणकोणत्या शहरात झाल्या .       भारताला या परिषदेचे अध्यक्षपद मिळाले , १ डिसेंबर २०२२ ला . ते मि...