पोस्ट्स

अल्पसंख्यांकांचे हाल दाखवणारी कांदबरी लज्जा

इमेज
अल्पसंख्याकवाद आणि बहुसंख्यांकवादाचे राजकारण लोकांचे आयुष्य किती मोठ्या प्रमाणात उद्धवस्त करते ? यावर अनेक पुस्तके देखील प्रसिद्ध झालेली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुळच्या बांगलादेशी मात्र सध्या कलकत्त्यात वास्तव्यास असणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी लिहलेली लज्जा ही कांदबरी . जी माझ्याकडे अनेक दिवस पडुन होती. स्वतः च्या वैयक्तिक संग्राहात असून देखील काही कारणाने वाचली नव्हती .जी मी नुकतीच वाचली. कांदबरीत दंगलीचे वर्णन अंगावर काटे उभे करते. एखादा उन्माद कसे व्यक्तींची राखरांगोळी करतो. लोकांच्या भावना कस्या प्रकारे पेटवून राजकारणी व्यक्ती त्यांचे राजकरण खेळतात. राजकारणी व्यक्तींच्या या खेळामुळे सर्वसामान्य व्यक्ती त्यातही समाजात अल्पसंख्याक असलेला समाजघटक कसा भरडला जातो याचे दाहक वर्णन यामध्ये आहे.  कोणत्याही प्रकारची कट्टरता कशी वाईटच असते हे दाखवण्याचे  उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही सुमारे पावणेतीनशे पानांची ही कांदबरी असे म्हटल्यास वावगे ठरू नये.  कांदबरीचे कथानक भारतात ६ डिसेंबर 1992रोजी वादग्रस्त धार्मिक वास्तू पडल्यानंतर बांगलादेशात उसळलेल्या दंगलीच्या ...

अंतराळ आणि उद्योजकता

इमेज
              आपण अंधाऱ्या रात्री आकाशात नजर टाकल्यास आपल्यास अथांग अश्या स्वरूपात पसरलेल्या स्वरूपात तारे दिसतात ज्याला आपणाकडे अवकाश असे म्हणतात मानवाला फार अशं युगापासून या अंतराळाचे आकर्षण आहे या अंतराळातील विविध ताऱ्यांना आपल्या काल्पनिक रेषेने जोडत त्याचे विविध नक्षत्रात रूपांतरण केले आपण केलेला अभ्यास दुसऱ्या व्यक्तींना समजण्यासाठी त्या संदर्भात विविध कथा रचल्या त्यांचे पृथीवरून सातत्याने निरीक्षण केले त्याचा विविध नोंदी ठेवल्या अर्थात हे सारे पृथ्वीवरून सुरु होते पृथीच्या हवामानाचा परिणाम या निरीक्षणांवर होत असे मात्र   मनुष्यप्राणी गुहेत राहत असल्यापासून सुरु असणारा मानवाचा अंतरालाविषयी जाणून घेण्याचा विचार स्वस्थ बसत नव्हता सतराव्या शतकाच्या सुरवातीला दुर्बिणीचा शोध लागल्यावर या निरीक्षणात काहीशी सुसूत्रतत आली मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा मानवास समजू लागल्या जसे शनीचे कडे शनिपाश्चात असणारे सौरमालिकेतील ग्रह अनेक...

रेल्वेत हे देखील सुखावणारे बदल होत आहेत.

इमेज
सध्या आपल्या भारतीय रेल्वेच्या बातम्या बघितल्यास, सातत्याने वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत असल्याचे दिसते.मात्र वंदे भारत सोडून सर्वांना अमिमान वाटावा अस्या दोन घटना आपल्या भारतीय रेल्वेबाबत नुकत्याच घडल्या,त्या आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन.          तर मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीच्या बाबत अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ईस्टन फ्रेड डेडीकेडस्  कॉरीडॉर हे जवळपास पुर्णत्वाकडे गेल्याचे भारतीय रेल्वेकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ईस्टन फ्रेड डेडीकेडस् कॉरीडॉर हा मालवाहतूकीला गती देण्यासाठी रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या चार प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या दोन प्रकल्पांपैकी एक आहे.जो पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानापूर पर्यंत आहे .या प्रकल्पाचे काम विविध टप्यात सुरू होते.यातील काही टप्पे या आधीच पुर्ण क्षमतेने सुरु झाले होते.३०सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेकडून पंजाबमधील लुधियाना ते बिहारमधील सोननगर पर्यंतचा संपूर्ण १३७७ किलोमीटरचा टप्पा इलेक्ट्रीक इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात येवून पुर्ण क्षमतेने इलेक्ट्रीक इंजिनाचा वापर करत मालवाहतूकीसा...

मानसिक आरोग्य मुलभूत अधिकार

इमेज
  मन , मानवाच्या बहुतांश सर्व क्रियांवर प्रतिक्रियांवर नियंत्रण असलेला मात्र तरीही सहजपणे दाखवता न येणारा मनुष्याच्या अविभाज्य भाग . किंवा मनुष्याच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं मात्र ज्याविषयी फारच कमी बोलले जाते लिहले जाते तो घटक म्हणजे मन . मानवाच्या या अविभाज्य अत्यंत महत्त्वाच्या   घटकांवर , बोलण्याचा लिहण्याचा समाजात मन आणि त्यास होणारे विविध विकार याविषयी जनजागृती करण्याच्या दिवस म्हणजे   १० ऑक्टोबर अर्थात जगातील मानसिक आरोग्य दिन.   १९९२ पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो १९९२ पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस १९९४ पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो सन २०२३ची संकल्पना आहे Mental health is a universal human right”    उत्तम मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा वैश्विक मूलभूत अधिकार असे आपणास मराठीत म्हणता येईल         आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी जशी श...

सायबर क्षेत्रातील आपला वावर सरंक्षित होण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक

इमेज
   सध्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरनेट . माझ्या लहानपणी शाळेत असताना विज्ञान शाप कि वरदान असा विषय निबंधासाठी असे आता त्यांची जागा   इंटरनेट शाप [ कि वरदान   हा विषय घेतो कि काय असे वाटावे इतपर्यंत आपले आयुष्य इंटरनेटशी जोडले गेले आहे .  कोव्हीड १९ च्या साथरोगानंतर सुरु झालेल्या न्यू नॉर्मल या जीवन पध्द्तीची तर इंटरनेटशिवाय कल्पना करणे देखील अवघड    आपण फक्त सोशल मीडियासाठीच इंटरनेट वापरतो असे नाही तर रोजच्या दैनंदिन आयुष्यात एकमेकांना पैसे देण्यासाठी सुद्धा आपण फोन पे गूगल पे सारख्या माध्यमांचा वापर करतो . जी मुख्यतः इंटरनेटवरच कार्यरत राहतात . आजकाल फक्त प्रौढ जनताच नव्हे तर लहान मुले मुली सुद्धा इंटरनेट लीलया हाताळतात . या लहान मुला मुलींना इंटरनेटमधील चांगल्याच बाबी प्रामुख्याने लक्षात असतात मात्र या इंटरनेटच्या वापरातील धोके अनेकदा त्यांना माहिती नसतात या इंटरनेटच्या जगतात फसवणूक झाल्यास मोठ्या त्रा...