पोस्ट्स

मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा करणारे पुस्तक इंडस्ट्री 4.0

इमेज
आताच काळात आपले सर्व जीवन   तंत्रज्ञानाशिवाय चालणे अशक्यच आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही उठल्यापासून झोपेपर्यंत आपले सर्व जीवन हे तंत्रज्ञानाने व्यापून राहिलेले आहे . ऑफिसमधील काम असो किंवा ऑफिस सुटल्यावर आपण घरी येण्यासाठी वापरत असलेली साधने असो हि सर्व तंत्रज्ञानाचीच किमया असो जास्त दूर कश्याला जायचे आता तुम्ही हा जो मजकूर वाचत आहात ती पण तंत्रज्ञानाचीच किमया . जगात कोणतीही   गोष्ट कायमस्वरूपी नसते असे म्हणतात मात्र या गोष्टीला एक अपवाद आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास हो तंत्रज्ञाचा विकास पूर्वीपण होत होता आताही होत आहे आणि भविष्यलत देखील होता असेल भले त्याची गती कमी जास्त असेल मात्र तंत्रज्ञाचा विकास याला मरण नाही त्या अर्थाने तो अमर आहे              आता अश्या तंत्रज्ञाचा वापर करताना या गोष्टी कश्या प्रकारे कार्यान्वित होतात ? हे कळलेच पाहिजे हि अट हे तंत्रज्ञान वापरताना नसली तरी आपण जी ...

जगाचे वर्तमान मोठ्या प्रमाणात बदलवणाऱ्या घटनेचा सविस्तर वृत्तान्त "शोध दहशतवादाचा "

इमेज
सप्टेंबर 11सन 2001 ही फक्त अन्य तारखेसारखी तारीख नाही.वर्तमानात आपण ज्या समस्या अनुभवतोय.त्यातील अनेक घटनांचा मार्ग बदलण्याची घटना या तारखेस झाली. न्युर्याक येथील ट्वीन टॉवरवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची घटना म्हणून आता या प्रसंगाला आपण ओळखतो‌.या प्रसंगावर आतापर्यंत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लिहून झाले आहे. मात्र ते सारे इंग्रजीत लिहलेले आढळते.काही प्रमाणात अन्य भारतीय भाषेत या बाबत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आढळते. मात्र या लेखनाच्या मुळाशी गेल्यास मुळातील इंग्रजी लेखनाचा तो अनुवादच असल्याचे आपणास दिसते‌. या घटनेविषयी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेच्या वृत्तपत्रातील बातम्या,अमेरीकन प्रशासनाचा याबाबतचा अहवाल यांचा अभ्यास करत थेट इंग्रजी सोडून अन्य भारतीय भाषेत अभ्यासपूर्ण लेखन केलेले आपणास सहजतेने दिसून येत नाही. आपल्या मराठीमध्ये मात्र ही उणीव भरून निघाली.आणि याला निमित्त ठरले आहे अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेले "शोध दहशतवादाचा" हे पुस्तक .शोध दहशतवादाचा या पुस्तकाचे लेखन केले आहे, ज्येष्ठ पत्रकार के. पुरुषोत्तम महाले यांनी .     महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्तस...

नाशिककरांसाठी क्षण हा अभिमानाचा !

इमेज
  नाशिकने देशाला अनेक रत्ने दिली आहेत.आज अब्जावधींची व्यवसाय झालेल्या बॉलीवूडची उभारणी करणारे दादासाहेब फाळके, ब्रिटीशांना धडकी भरवणारे ज्येष्ठ  क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर सावरकर, उत्कृष्ट फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी,,ही त्यातील काही महत्त्वाची नावे.आता या नावात अजून एक नाव समाविष्ट झाले आहे.ते म्हणजे  सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे नाव.                  बुद्धीबळ विश्वात जागतिक स्तरावर अत्यंत मानाचे जवळपास पहिल्या क्रमाचे मानाचे समजले  जाणाऱ्या "न्यू इन चेस या नियतकालीकाच्या, मुखपृष्ठावर सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. आतापर्यंत न्यू इन चेस या नियतकालिकांमध्ये ज्यांचा फोटो मुखपृष्ठावर प्रसिद्ध होतो,अस्या खेळाडुने भविष्यात विश्वविजेते पदाला गवसणी घातण्याचा इतिहास आहे‌.तो बघता नाशिकचे भुमीपुत्र असलेले सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी हे भावी विश्वविजेते आहेत,हे सुर्याप्रकाश्याइतके स्पष्ट आहे, आणि असा खेळाडू आपल्या नाशिक शहरात राहतो ही समस्त नाशिककरांसाठी अभिमानाची...

भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होणार ?

इमेज
     या वर्षी भारतीय क्रिडाविश्वाचा विचार करता इतिहास घडला आहे. जगातील महत्त्वाच्या आठ बुद्धीबळपटुंचा सहभाग असलेल्या  कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूषांचा गटात तीन तर महिला गटात दोन बुद्धीबळपटू  हे भारतीय आहेत. विद्यमान विश्वविजेत्यांशी कोण लढत देणार ?हे कॅन्डिडेट् स्पर्धेद्वारे ठरते, हे लक्षात घेता,  भारतीय बुद्धिबळपटुंनी किती लक्षणीय कामगिरी केली आहे,हे लक्षात येते‌ .कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूष गटात आठ खेळाडू असतात या वर्षी या आठ खेळाडूंपैकी 3 म्हणजे 37.5 टक्के तर महिला गटात आठ खेळाडूंपैकी 2म्हणजे 25टक्के खेळाडू भारतीय आहेत.जगात सुमारे 190 देशात बुद्धीबळ खेळले जाते.त्याचा विचार करता आपल्या बुद्धिबळपटुंनी किती उत्तम कामगिरी केली आहे.हे लक्षात येते. वरील आकडेवारी बघता या वर्षी कोणता तरी भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होण्याची दाट शक्यता वाटते.ही अव्वल कामगिरी करणारे पुरुष बुद्धीबळपटु आहेत नाशिकचे सुपुत्र सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी, माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यांना एकाच वर्षात दोनदा हरवण्याचा पराक्रम करणारे ग्रँडमास्टर आर.प्रज्ञानंद , आणि ग्रँडमास्टर डी गुक...

ग्रामीण जीवनाची अनुभुती देणारे पुस्तक "दिसामाजी"*

इमेज
कोव्हिड 19च्या साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेकांनी या अनाहुतपणे मिळालेल्या या सुट्टीचा वेगवेगळा वापर केल्याचे आपणास आठवत असेलच. बहुसंख्य लोकांनी विविध आरोग्य विषयक उपचार करत यामध्ये स्वतः ला कोरोनापासून दूर ठेवले काही लोकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करत अनेक नवीन कला शिकून घेतल्या. काही जणांनी त्यांची करू करु असे म्हणत अनेक दिवस करायची राहुन गेलेली कामे या काळात केली. तर मुळचे कवी असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत भरवीरकर यांनी या सुट्टीचा वापर करत, समर्थ रामदास स्वामी यांची "दिसामजी काहीतरी लिहावे" ही शिकवण अंगी बाणवत ,  लेखन केले.कोणतेही लेखन जर पुस्तकरूपाने  प्रसिद्ध झाले तर ते चिरतरूण होते,हे माहिती असल्याने पुढे त्यांनी त्यांचे पुस्तक केले.ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित "दिसामजी" हेच ते पुस्तक. जे मी नुकतेच वाचले.     प्रशांत भरवीरकर यांचे सुरुवातीचे आयुष्य निफाड तालुक्यात गेले असल्याने, या लेखनाला ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी आहे.  सदर पुस्तकात ललितपर असे 45लेख आहेत. लेखांची भाषा आत्मपर आहे. सहज ओघवती असल्याने लेख कुठेही कंटाळवाणे झा...

महान समाजसुधारक स्वातंत्र्यवीर सावरकर

इमेज
६ जानेवारी १९२४ ही फक्त एक दिनांक नाहीये क्रांतिकारकाबरोबर समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानातून सुटका होऊन रत्नागिरीत स्थानबद्धतेत रवानगी होण्याच्या हा दिवस आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वातील एक दुर्लक्षित पैलू असणाऱ्या समाजसुधारक हा पैलू क्रांतिकारक या पैलूसारखाच समाजात तेजानेफडकण्याच्या हा दिवस यावर्षी या घटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहे       आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्याकडे नजर टाकल्यास लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यासाठी पेटलेले नेते दिसतात मात्र समज सुधांरणेबाबत लोकमान्य टिळकांची मते काहीशी प्रतिकूल होती सर्वप्रथम हे परकीय राज्य इथून निघून गेले पाहिजे   परकीय राज्य जाऊन स्वकीयांचे राज्य आल्यावर सामाजिक सुधारणा सहजतेने करता येईल आपले ध्येय परकीय सत्ता उलथून टाकणे हेच असले पाहिजे हे असे लोकमान्य टिळकांना वाटत असे . तर ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर याच्या मते भारतीय समजणे ब्रिटिशांच्या राजवटीचा फायदा घेत...