लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र - मंडालेच्या राजबंदी
आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे असतात , असे मानसशात्रात मानले जाते . या सर्व कंगोरेच्या एकत्रीकरणतुंन आपले व्यक्तिक्त्व घडते .एकाचवेळी सर्वांच्या सर्व कंगोरे सामोरे येतीलच असे नाही .किंबहुना येतच नाहीत. त्यामुळे एखाद्याला आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्तवाचे आकलन होईलच अस ठामपणे सांगता येत नाही . आपल्या सारख्या सर्वसाम्याची ही कथा तर स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या बहुआयामी प्रकांड पंडित तीक्ष्ण बुद्धीच्या व्यक्तिमत्वाविषयी ही बाब तर आणखी प्रखर होते. लोकमान्य टिळकांचीच गोष्ट करायची झाल्यास त्याच्या राजकीय सुधारणा आधी आणि सामाजिक सुधारणा नंतर याविषयी च्या मातांना महत्व देयचे की सामाजिक एकतेच्या माध्यमातून जातिभेद मिटत असल्याने सामाजिक सुधारणांच्या भाग म्हणता येईल अश्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, सार्वजनिक गणेशोत्सव यांचा विचार करत त्यांनी काही प्रमाणात सामाजिक सुधारणा देखील केल्या असे म्हणायचे असा प्रश्न निर्माण होतो . माझ्यामते या सारख्या प्रश्नाचे ऊत्तर हवे असल्यास आपणास या सारख्या थोर व...