निर्णय योग्य मात्र अमंलबजवाणीत दिसाळपणा
सध्या महाराष्ट्र एसटी महामंडळाविषयक कोणत्या बातम्या माध्यामध्ये येत आहेत, याचा आढावा घेतल्यास नागरिकांना एन एम सी सी विषयक समस्यांच्या बातम्यांनी माध्यमे भरून गेलेली आढळत आहेत नागरिकांनी मागणी नोंदवलेली असून देखील त्यांना कार्ड उपलब्ध न होणे, कार्ड तिकीट काढताना स्कॅन न होणे,तिकीट वापरबाबतचे लोकांचे अज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्य अडचणी आणि या साऱ्यामुळे कंडक्टर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सलतीचे तिकीट न देता पूर्ण तिकीट आकाराने यातून प्रवाशी आणि कंडक्टर होणारे वाद ज्याची परिणीती काही वेळा कंडक्टर असलेल्या कर्मचाऱयांनी प्रवाश्यास अर्ध्यताच उतरवायला लावणे या सारख्या बातम्या एसटी विषयक अत्यंत नियमित झाल्याचे सध्याचे चित्र आहे. यापूर्वी एसटीचे खासगीकरण करण्याच्या आलेल्या बातम्या तसेच अन्य राज्यात या प्रकारचे कोणतेही कार्ड आवश्यक नसताना महाराष्ट्रात होणारी सक्ती या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या वर सांगितलेल्या समस्या यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा मिळाल्याचे चित्र साधा महाराष्ट्रात दिसत आहे. समोरचा प्रवाशी महिला आहे हे ढळढळीत दिसत असताना अन वयाचा पुरावा...