पोस्ट्स

होय प्रेमप्रकरणामुळेच

इमेज
केंद्रीय क्रुषीमंञी यांनी प्रेमप्रकरणामुळे आणी व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात ,असे विधान केले आहे .त्या विषयी इतर लोक संताप व्यक्त करत आहेत . पण माझ्या मते केंद्रीय क्रुषीमंञी योग्य तेच बोलले . शेतकरी प्रेमामुळेच आणी व्यसनाधीनतेमुळेच आत्महत्या करतो ,माञ शेतकर्याचे हे प्रेमप्रकरण काळ्या आईसी केलेले असते . कोणत्याही व्यक्तीशी केलेले नसते. आणी व्यसनाच म्हणाल तर जमीनीतुन धान्य पुरवण्याचे व्यसन त्याला असते . आपले धान्य पुरवण्याचे व्यसन न करता आल्या ने शेतकरी आत्महत्या करतो . तसे केंद्रीय मंञ्यांनी असे बोलण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाहिये , मागे लोकांनी नैसर्गिक विधी केल्याने उत्तराखंडाचे संकट आल्याचे विधान त्यांनी केले होतेच .असो आपल्या भारतात लोकशाही आहे . कोणी काहिही बोलू शकतो . तर सांगायचा मुद्दा अशा की आपल्या संविधानात कायद्याचा विषयांची विभागणी तीन भागात केली आहे . संघसुची तील विषयावर फक्त केद्र सरकार करू शकते, राज्यसुची वर राज्यसरकार कायदा करू शकते (अपवाद दिल्ली चा दिल्लीतील राज्य सरकार राज्यसुचीतील काही विषयावर कायदे करू शकत नाही , परीणामी केजरीवाल आणी नजीब जंग यांच्यात ...

बर झालं !

सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणार्या परीक्षार्थींना खुप खुप शुभेच्छा नाशकाच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी असणार्या क्रॉम्पटन ग्रीव्हचा जवळपाश 100 दिवस चालणारा संप अखेर काही तडजोडी करत संपला . आणी गेले काही दिवस गँसवर असणार्या नाशिकच्या औद्योगिक क्षेञाने सुटकेचा विश्वास टाकला . नाशिकच्या अंबड या उपनगराच्या औद्योगीक क्षेञातील ही कंपनी नाशिकच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी आहे . अंबड मध्ये या कंपनीवर आधारीत अनेक लघूउद्योग आहे . ज्यांना नाशिक महानगरपालिकेची फाळणी करण्याची मागणी आठवण असेल ,त्यांना हेही आठवत असेल की नाशिक महानगरपालिकेच्या आर्थीक स्ञोतासाठी अंबड किती महत्वाचे आहे . नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थिती कशी आहे ? हे आपण साधू महंताचा ध्वजारोहणाच्या वेळी ऐकलेच , तसेच त्याला त्यावेळच्या सर्वात महत्वाचा राजकीय व्यक्तीने कशी वागणूक दिली हे ही आपण बघीतलेच . मला त्या राजकरणावर काहीही भाष्य करायचे नाही . मला आपले लक्ष वेधून घेयचे आहे ते हा संप मिटणे नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थीती टिकण्यासाठी किती आवश्यक आहे याकडे . आणी हे उद्योग केवळ नाशिकला व...

17 जूलै चा निमित्याने

इमेज
विब्लडन स्पर्धेत भारतीयांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन आणी आंध्रप्रदेश मधील राजमंद्री येथील चेंगराचेंगरीत म्रुत्युमूखी पडलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीचा द ुखात आपण सर्व जण सहभागी आहोत अशी मला म्हणजे अजिंक्य तरटे ला आशा आहे  17 जूलै हा जागतीक भुजल दिन म्हणुन ओळखला जातो (आता काहीजण असा एक दिवस साजरे करून काय होते ?अशा प्रश्न उपस्थित करतील त्यांना माझे म्हणजे अजिंक्य तरटे याचे असे सांगणे आहे की किमान पक्षी एक दिवस का होइना हे प्रश्न चर्चीले जातात काहीच नसण्यापेक्षा एक दिवस का होइना हे विषय चर्चीले जाणे हे माझ्या मते म्हणजे अजिंक्य तरटे चा मते चांगले आहे) जो सध्याचा काळातील अत्यंत महत्वाचा विषय आहे आणी सध्याचाऊ हवामान बदलाचा दुष्काळाचा काळात तर त्याचे महत्व अधिकच वाढणार आहे आपण विहीरीतून बोअरवेल मधून जे पाणी काढतो त्यास भुजल म्हणतात जगात शेतीतून अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी खुप जास्त प्रमाणात भुजल वापरले गेले परीणामी जगातील कित्येक भागातील भुजल संपले त्याची कमतरता झाल्याने अनेक दुषपरीणाम समोर आल्याने भुजलाचे महत्व जगाला समजण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले सध्या जगाती...

वंगळ भाशा कंची ?

इमेज
काल मिञांच्या बरोबर कटट्यावर बसलेलो असताना एक मिञ सहजच ग्रामीण भाषेत बोलू लागला  शुध्द भाषेत बोलत आहेस ?  आणी हे बघून आमच्यातील एक जणाने त्यास म्हटले काय अशुध्द भाषेत बोलत आहेस   आतापर्यतचे समस्त जीवन शहरात घालवणार्या या माझ्या मिञाने ग्रामीण भाषेला सरळ सरळ अशुध्द ठरवले होते , माञ दुर्दैवाने हे ठरवताना तो हे विसरला की इंग्लीश भाषेत सुध्दा (माझ्या मते इंग्लीश हे विशेष नाम आहे सबब त्याचे इंग्रजी असे भाषांतर करणे गैर आहे )पण अमेरीकन इंग्लीश आणी ब्रिटिश इंग्लीश असे दोन मुख्य (आणी कित्येक उप प्रकार ) प्रकार आहेत हे दोन प्रकार निमुटपणे मान्य केले जातात त्यात शुध्द आणी अशुध्द असे वर्गीकरण केले जात नाही मग मराठीतच असे वर्गीकरण का केले जाते ? ग्रामीण मराठीला अशुध्द म्हणून हिणवणार्या कडे बहूथा या प्रश्नांचे उत्तर नसते ते व्याकरणाचा आधार घेउन आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात माञ माझ्या मते व्याकरण वाक्यरचना कशी असावी ते शिकवते त्यात कोणते शब्द असावेत हे शिकवत नाही मराठीत कर्तरी प्रयोगाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास कर्ता +कर्म +क्रियापद अशी रचना करण्याचे व्याकरण सांगते खुप या शब्दा...

ए मेरे वतन की लोंगो जरा याद करो उनकी

सर्वप्रथम मँगसस्से पुरस्कार जाहीर झालेल्या भारतीयांचे अभिनंदन  सध्या एन डी टि व्ही सारख्या काही व्रुत वाहीन्यांचा अपवाद वगळता बहूतांशी व्रुत वाहीन्या भारतातील सर्व यक्षप्रश्न सुटले असून याकुबची फाशी हाच तो काय निव्वळ प्रश्न असल्यासारखे व्रूतांकन करत आहे . माञ त्यांचा कडुन हे दुर्लक्षले जात आहे की सध्या भारतातील काही भागात पुराने थैमान घातले असून काही भागात पाण्याचा दुर्भिक्षतेने धोक्याची पातळी गाठल्याने अनेकांचा तोंडचे पाणी पळाले आहे . म ागे अण्णा हजारेंचा ऐताहासीक अश्या जंतरमंतर येथील आंदोलना प्रसंगी देखील देशाच्या काही भागात पुराचे संकट होते ज्याकडे सध्या सारखेच दुर्लक्ष केले गेले होते. काही कालावधी करता हे मान्य केले की माध्यमांचे अर्थकारण हे याकुबच्या बातम्यांभोवती गुंफले गेले आहे .तरी त्यांनी या लोकांचा दुखात सहभागी व्हायला पाहीजे . त्याचप्रमाणे याकुब सारख्या घटनेत अधिक रस घेण्याची लोकांची ही मनोव्रूती का झाली (म्हणजेच पुराच्या घटनेत अधिक लोक अडकले असूनही त्या कडे दूर्लक्ष करणे ) याचा पण विचार करायला हवा ,असे मला वाटते . टाळी एका हाताने वाजत नाही . या तत्वावर माझा पुर्ण विश्...

मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर

काही व्यक्तीचे जरी नाव उच्चारले तरी अंगावर रोमांच उभे राहतात मान अभिमानाने ताठ होते छाती ताठ होते छञपती शिवाजी महाराज स्वातंञ्यवीर सावरकर ही काही त्यातील काही नावे स्वातंञ्यवीर सावरकरांच्या गुणांची जरी यादी करायची म्हटली तरी एखाद्याची झोप उडू शकते समाजसुधारक विज्ञाननिष्ट भाषातज्ञ ऊक्रूष्ट संघटक प्रखर देशभक्त समयसुचक सिध्दहस्त लेखक भविष्यसूचक बलोपासक त्यांचा गुणांची यादी प्रचंड आहे माञ मी पामर दुर्दैवाने येव्हढीच करु शकलो असो मला सावकरांचा ञुषीतुल्य व्यक्तीमत्वातील आवडलेल्या गुणातील एक गुण म्हणजे त्याचातील समाज सुधारक होय अंदमानातील त्या छळछावणीतून सुटल्यावर रत्नागिरीत (ज्या रत्नागिरीत ब्रिटीशांनी ब्रम्हदेशातील राज्याला तुरंगात ठेवले होते ) सावरकरांना स्थानबध्दतेत ठेवले होते त्या वेळेस त्यांनी मानवतेचे महान मंदिर असे ज्याला म्हणता येइल असे पतितपावन मंदिर उभारले थी त्यांचा समाजसुधारणेची सुरवात होती त्यानंतर त्यांनी समाजातील जाती प्रथेवर प्रचंड प्रमाणात आसूड ओढले माझ्या माहितीतील तरी डॉ बाबा साहेब आंबेडकरांनंतर स्वातंञ्यवीर सावरकर एकमेव क्रांतीकारक आहे ज्यांनी समाजसूधारणेला पण महत्व ...

स्वातंत्र्यवीर सावरकर भाग 2

50 वर्षानंतर  येत्या फेब्रुवारीत स्वातंञ्यवीर सावरकरांची 50वी पुण्यतिथी आहे . (सावरकरांचे देहावसन ज्याप्रकारे झाले त्याला विशिष्ट नाव आहे ते माझा आता लक्षात नाह ीये . माहितगारांनी सांगावे ही विनंती ) या पन्नास वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले . आज 2016 साली स्वातंञ्यवीर सावरकरांच्या कोणत्या ईच्छा पुर्ण झाल्या किंवा पुर्ण होण्याची शक्यता आहे याचा धांडोळा घेतांना मला वाटते की संपुर्ण स्वातंञ्यवीर समाजाने समजून घेतलेले नाहीत स्वातंञ्यवीर सावरकरांची विज्ञाननिष्ठा त्यांचा समाजसुधारणा आणी गोवंशा बद्दलची मते समजाने फारशी समजून घेतलेली नाहीत , असे मला वाटते . मी जेव्हढे स्वातंञ्यवीर सावरकरांविषयी वाचले आहे त्यातील फारच कमी साहित्य त्यांच्या रत्नागिरी येथील कार्यावर प्रकाश टाकणारे आहे (माझे वाचन परीपुर्ण आहे .अशा माझा दावा मुळीच नाही या उलट माझे वाचन बालीश वरवरवरचे आहे असे म्हणणेच संयुक्तीक ठरेल ) स्वातंञ्यवीर सावरकर म्हटले की अंदमानच्या सेल्यूलर मध्ये त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्ठांविषयीच लोकांना बोलतांना बघीतलंय . किंवा हिंदुत्वाविषयी बोलताना बघीतलंय हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत ...